“मराठी पाडवा" साजरा केला
महाराष्ट्र धर्म जागवला 

मराठी भाषा आणि मुंबई यांचा दुरावत चाललेला सबंध सहज जाणवत होता, गेल्या २ वर्षात मराठी अभ्यास केंद्राचे प्रा. दीपक पवार यांनी तो ठळकपणे महाराष्ट्र धर्माची पूर्वापार रुजलेली व्याख्या सांगत मराठी माणसासमोर आणला आहे.
हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आणि मराठी भाषेसाठी, इथल्या लोकांना जागे करण्यासाठी आज गुढीपाडव्याच्या दिवशी मराठीकरण आणि मराठी धर्म जागविण्यासाठी अशीच एक यात्रा संयुक्त महाराष्ट्र दालन शिवाजी पार्क दादर ते कामगार मैदान परेल पर्यंत काढण्यात आली होती. मराठी भाषेसोबत मुंबईतला मराठी माणूस टिकला पाहिजे या हट्टासाठी! मराठी अभ्यास केंद्र आयोजीत या यात्रेत आम्ही "मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई " संस्थेचे पदाधिकारी रवींद्र मालुसरे, विजय ना कदम, सुनील कुवरे, राजन देसाई, रमेश सांगळे, दीपक गुंडये, सुधीर हेगिष्टे असे सहभागी झालो. त्याचप्रमाणे ज्येष्ठ भाषा अभ्यासक डॉ प्रकाश परब, ज्येष्ठ अभिनेत्री चिन्मयी सुमित राघवन, माजी खासदार राजू शेट्टी, कम्युनिस्ट कामगार नेते कॉ प्रकाश रेड्डी, पत्रकार अलका धूपकर, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, मेधा कुलकर्णी, अनिल बोरनारे तसेच मेधा कुळकर्णी, सिरत सातपुते, महाराष्ट्र समन्वयक, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय राजकुमार तांगडे, नाट्य दिग्दर्शक हेमंत ढोमे, कलाकार, चित्रपट दिग्दर्शक विनायक कोळवणकर, नाट्य दिग्दर्शक शाहीर संभाजी भगत, डॉ. अनघा मांडवकर, अक्षरधर्मी गोधडी, प्राची हातिवलेकर, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना,
गोवर्धन देशमुख, मराठी एकीकरण समिती, महेंद्र गणपुले, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळ, श्री. रवींद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, विनय राऊत, महामुंबई शिक्षणसंस्था संघटना, मुंबई, जालिंदर सरोदे, कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, शिवनाथ दराडे,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, अनिल बोरनारे, मुंबई मराठी अध्यापक संघ, तानाजी कांबळे, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना दिगंबर बेंडाळे, महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, संजय डावरे, महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित व अनुदानित शाळा कृती समिती मुंबई, संदीप कांबळे, अध्यक्ष, युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र, धर्मेंद्र घाग, महाराष्ट्र सरंक्षण संघटना, महाराष्ट्र राज्य, प्रसाद गोखले, मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजे फेसबूक समूह, बाळासाहेब माने, मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य संतोष मगर, डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशन, भाऊसाहेब घाडगे, छत्र प्रतिष्ठान आणि मराठी गौरव प्रतिष्ठान सांगोला, डॉ. माधव सूर्यवंशी, मुख्य समन्वयक, शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटर या संस्था सहभागी झाल्या होत्या.
या स्वागत यात्रेमध्ये मराठी अभ्यास केंद्राने तीन महत्त्वाच्या विषयांवर विशेष भर दिला आहे. त्यामध्ये बंद पडत चाललेल्या मराठी शाळा, नोकरी- व्यवसायात मराठी माणसाला मिळणारे दुय्यम स्थान आणि रोजगाराच्या संधी, तसेच मुंबईसारख्या शहरात घरांच्या बाबतीत मराठी माणसाची होत असलेली कोंडी या मुद्द्यांचा समावेश होता. या तीनही विषयांचे दर्शन घडवणारा एक विशेष ‘चित्ररथ’ यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले. नव्या वर्षासाठी ‘दहा संकल्प’
मराठी नववर्षाच्या निमित्ताने केवळ गुढीपाडव्यापुरते मराठीप्रेम न दाखवता वर्षभर मराठीसाठी काय करता येईल, यासाठी केंद्राने ‘दहा संकल्प’ तयार केले आहेत. यामध्ये मराठी व्यावसायिकाला प्रथम पसंती, देवनागरीत सही करणे, फोनवरील संभाषणाची सुरुवात 'नमस्कार' अशी मराठीतून करणे, मराठी खाद्यसंस्कृतीला उत्तेजन देणे, वर्षातून किमान एक मराठी चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहणे, एक मराठी पुस्तक विकत घेणे, एक मराठी पुस्तक विकत घेणे, एक मराठी वर्तमानपत्र विकत घेणे, एक किल्ला पाहणे आणि किमान एक मराठी नाटक पाहणे अशा कृतीशील संकल्पांचा समावेश आहे.
- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष - मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई




0 टिप्पण्या