मराठीची खरी ताकद तिच्या बोलीभाषेत - उपमहापौर संजय घाडी
सुवर्ण महोत्सवी दिवाळी अंकाचा पारितोषिक वितरण समारंभ
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई यांच्या प्रतिष्ठित ५० व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत मनोरंजनकार का र मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक नवलाई दिवाळी अंकाला देण्यात आला. प्रभू कापसे यांनी पारितोषिक स्वीकारले.
यावेळी व्यासपीठावर उद्योजक अशोक पाटील, ऋतुरंगचे संपादक अरुण शेवते, चंद्रकांतच्या संपादिका श्रीमती निलिमा कुलकर्णी, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर, दादर सार्वजनिक वाचनालयाचे कार्याध्यक्ष मनोहर साळवी, मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे विश्वस्त विकास होशिंग, माजी नगरसेवक ऍड मनमोहन चोणकर, ऍड देवदत्त लाड, संजीव गुप्ते आदी मान्यवर उपस्थित होते. संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी संस्थेच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अशोक पाटील (सिनियर व्हाईस प्रेसिडेंट ऑपेरेशन्स लेखलर इंडिया प्रा.लिमिटेड ) यांनी आपल्या भाषणात जीवनाची सुरुवात महापालिका शाळेत मराठीमधून झाली मात्र आज आपला देश तांत्रिकदृष्ट्या सज्ज होण्यासाठी लागणाऱ्या प्रक्रियेत काम करण्याची मला संधी मिळाली आहे. तंत्रज्ञान आणि जगभरात फिरताना इंग्रजीसह इतर भाषांचा सामना करावा लागतो. मात्र जन्मापासून मराठी ही आपल्यात भिनलेली असते. "आई" आणि "मातृभाषा" या दोन गोष्टी माणसाच्या आयुष्यात कधीही बदलता येत नाहीत. ज्याप्रमाणे आई आपल्याला जन्म देते, तशीच मातृभाषा आपल्याला विचार करायला शिकवते. आज आपण पाहतो की, कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे अनेक मुले मराठी बोलताना अडखळतात किंवा मराठी बोलणे त्यांना कमीपणाचे वाटते. मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्या झाडाची मुळे खोल असतात, तेच झाड वादळात टिकून राहते. आपली मुळे आपल्या मातृभाषेत आहेत. जगातील अनेक विकसित देश जसे की जपान, जर्मनी, फ्रान्स हे आपली सर्व प्रगती त्यांच्या मातृभाषेतूनच करतात. मराठी भाषेत जी आपुलकी आहे, जी गोडी आहे, ती इतर कोणत्याही भाषेत नाही. साहित्यापासून विज्ञानापर्यंत सर्व विषयांचे ज्ञान आज मराठीत उपलब्ध आहे. आपण सोशल मीडियावर पोस्ट टाकताना, मेसेज करताना मराठीचा वापर वाढवला पाहिजे. आपली भाषा टिकली तरच आपली संस्कृती आणि परंपरा टिकती. त्यामुळे मराठीचा न्यूनगंड बाळगू नका, तर मराठीचा सार्थ अभिमान बाळगा. मराठी ही केवळ बोलण्याची भाषा नाही, ती संस्कारांची भाषा आहे. जेव्हा आपण वैयक्तिक पातळीवर हे बदल करू, तेव्हाच मराठी खऱ्या अर्थाने 'राजभाषा' होईल. मराठी ही केवळ कागदावरची भाषा न राहता ती लोकांच्या हृदयातील भाषा झाली पाहिजे.
एक छंद म्हणून अंदाजे १३५० प्रकाशनाचे ३५०० नवे-जुने वेगवेगळ्या दिवाळी अंकांचा संग्रह करून त्यातून महाराष्ट्र सारस्वताच्या प्रांगणात ११७ वर्षाच्या दिवाळी अंक परंपरेचा अमूल्य ठेवा जतन करणारे मनमाड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक अनिल शिनकर यांना ग्रंथालय चळवळीतील धुरीण दिवंगत दत्ता कामथे स्मृती ग्रंथसखा सन्मान पुरस्कार देण्यात आला,
याचबरोबर ललित सारख्या मराठी साहित्याचा वेध घेणाऱ्या मासिकात साहित्यिक रविप्रकाश कुलकर्णी हे गेली तीन दशके दरवर्षी दिवाळी अंकात काय वाचाल हा अभ्यासपूर्ण लेख लिहून दिवाळी सणाची चाहूल देत असतात. दिवाळी अंकांच्या परंपरेचा अभ्यासक म्हणून त्यांच्या गुणवत्तापूर्ण कामाची दखल घेऊन मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने त्यांना सुवर्णमुद्रा जीवन गौरव सन्मान पुरस्कार देण्यात आला.
संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या दिवंगत कामगार नेते वसंतराव
होशिंग स्मृती "वैभवशाली मराठी भाषेचे गद्दार कोण? या राज्यस्तरीय लेख स्पर्धेतील
यशस्वी प्रथम क्रमांक अर्णव चव्हाण, द्वितीय क्रमांक मयुर दातार, तृतीय क्रमांक गुरुदत्त
वाक्देकर आणि उत्तेजनार्थ म्हणून डॉ.गौतमी अनुप पाटील, सौ.सुनिती सु.काळे, निर्मला
गांगुर्डे यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला वृत्तपत्र लेखन, दिवाळी अंक संपादक साहित्य, पत्रकारिता आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि दर्जेदार दिवाळी अंक परंपरेच्या जतनासाठी गेली पाच दशके ही राज्यस्तरीय स्पर्धा संघाच्या वतीने सातत्याने आयोजित केली जाते. राज्यभरातून प्रकाशित होणाऱ्या विविध दिवाळी अंकांमधून यंदा ५० व्या स्पर्धेअंतर्गत उत्कृष्ट आशय संपादकीय दृष्टी, मांडणी आणि साहित्यिक गुणवत्ता या निकषांवर दिवाळी अंकाची म्हणून निवड करण्यात आली.
कार्याध्यक्ष रमेश सांगळे आणि कार्यक्रम प्रमुख दिगंबर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माजी अध्यक्ष प्रकाश नागणे, विजय कदम, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, राजन देसाई, पास्कोल लोबो, रामचंद्र जयस्वाल यांनी विशेष मेहनत घेतली. आभार प्रदर्शन कार्यवाह नितीन कदम यांनी केले.
संघाच्या
वतीने घेण्यात आलेल्या सुवर्णमहोत्सवी दिवाळी अंकांचा निकाल पुढीलप्रमाणे -
1) मनोरंजनकार'
का र मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक - नवलाई ( कार्यकारी संपादक- प्रभू कापसे
डोंबिवली )
2) चंद्रकांत
पाटणकर पुरस्कृत जगन्नाथ शंकरशेठ स्मृती उत्कृष्ट अंक -
सकाळ कोल्हापूर ( निखिल पंडितराव )
3) पांडुरंग रा
भाटकर स्मृती सर्वोत्कृष्ट धार्मिक अंक - संस्कारभक्तीधारा (विद्यावाचस्पती
कांचन सातपुते पुणे )
4) पास्कोल लोबो
पुरस्कृत गणेश केळकर स्मृती सर्वोत्कृष्ट साहित्यिक अंक - जडणघडण (डॉ सागर देशपांडे,
पुणे )
5) पु ल देशपांडे
स्मृती सर्वोत्कृष्ट अंक - तरुण भारत नागपूर (शैलेश पांडे,
नागपूर )
6) साने गुरुजी
स्मृती सर्वोत्कृष्ट मुलांचा अंक - लाडोबा (घनश्याम पाटील, पुणे
7) स्वातंत्र्यसेनानी
मनोहरपंत चिवटे स्मृती सर्वोत्कृष्ट आरोग्य विषयक अंक - वेदांतश्री (सुनील उंब्रजकर
पुणे )
8) आवाजकार मधुकर
पाटकर स्मृती सर्वोत्कृष्ट अंक- हंसा ( प्रिया बापट, गोवा )
9) मराठी विचारधारा
प्रतिष्ठान पुरस्कृत वसंतराव होशिंग स्मृती महिला संपादित उत्कृष्ट अंक - अंतरीचे
प्रतिबिंब - ( प्रज्ञा जांभेकर,मुंबई )
10) कृष्णराव
भानुसे स्मृती उत्कृष्ट अंक - कोकणसाद (संदीप देसाई, सावंतवाडी )
ऋतुरंग - अरुण शेवते,
मुंबई ( कवी वसंत बापट स्मृती पुरस्कार )
वसंत - दिलीप देशपांडे,
मुंबई (कवयित्री शांता शेळके स्मृती पुरस्कार
)
हंस - अभिराम अंतरकर,
पुणे ( साहित्यिक जी.ए. कुलकर्णी स्मृती पुरस्कार
)
चंद्रकांत आणि
धनंजय - श्रीमती नीलिमा कुलकर्णी,मुंबई ( गझलकार सुरेश भट स्मृती पुरस्कार )
आवाज - भारतभूषण पाटकर,
मुंबई ( साहित्यिक प्र.के. अत्रे स्मृती पुरस्कार
)
कालनिर्णय - जयराज साळगावकर,
मुंबई ( साहित्यिक रणजित देसाई स्मृती पुरस्कार )
धनुर्धारी - नंदकुमार सापळे
( जयंत नारळीकर स्मृती पुरस्कार )
नवाकाळ - रोहित पांडे,
मुंबई ( साहित्यिक शिवाजी सावंत स्मृती पुरस्कार )
दीपावली - अशोक कोठावळे,
मुंबई (साहित्यिक जयवंत दळवी स्मृती पुरस्कार
)
मेनका,माहेर,
जत्रा - सुमित टेकाळे, पुणे (कविवर्य ग.दि. माडगूळकर स्मृती पुरस्कार )
नवभारत - नीरज हातेकर,
वाई ( राजारामशास्त्री भागवत स्मृती पुरस्कार
)
ग्राहकहित - सूर्यकांत
पाठक, पुणे ( कवी शंकर वैद्य स्मृती पुरस्कार )
मिळून साऱ्याजणी - गीताली वि
मं., पुणे ( लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती
पुरस्कार )
आनंदघन - डॉ देविदास
पोटे, नवी मुंबई ( साहित्यिका दुर्गाबाई भागवत स्मृती पुरस्कार )
रंगवाचा - वामन पंडित,
कणकवली (साहित्यिक वि.वा. शिरवाडकर स्मृती
पुरस्कार )
सत्याग्रही विचारधारा - डॉ कुमार सप्तर्षी
पुणे ( साहित्यिक प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार )
अक्षर - मीना कर्णिक,
मुंबई ( यदुनाथ थत्ते स्मृती पुरस्कार )
एक संक्रमण - रॉकी लोपीस,
वसई (कवी नारायण वामन तथा रेव्हरंड टिळक स्मृती
पुरस्कार )
युगंधरा - सुनीता कावसानकर
- संभाजीनगर ( साहित्यिक बाबुराव बागुल स्मृती पुरस्कार )
ताऱ्यांचे जग - लता गुठे
- मुंबई ( श्री पु भागवत स्मृती पुरस्कार
)
कोकण मीडिया - प्रमोद कोनकर,
रत्नागिरी ( साहित्यिक ना.सी. फडके स्मृती पुरस्कार )
ठाणे नागरिक - सतीशकुमार
भावे, ठाणे ( माणिक गोडघाटे कवी ग्रेस स्मृती पुरस्कार )
मनातली जाणीव - सोनल खानोलकर
मुंबई ( साहित्यिक वि स खांडेकर स्मृती पुरस्कार
)
तारांगण - मंदार जोशी
मुंबई ( साहित्यिक व. पु. काळे स्मृती पुरस्कार )
श्री समर्थ विचार - रत्नाकर पाटील
अलिबाग ( साहित्यिका सरोजिनी बाबर स्मृती पुरस्कार )
इंद्रधनू - विजय पवार,
पनवेल ( साहित्यिक विजय तेंडुलकर स्मृती पुरस्कार
)
क्रिककथा - कौस्तुभ चाटे,पुणे ( साहित्यिक चिं.त्र्य.खानोलकर आरती प्रभु स्मृती
पुरस्कार )
चतुरंग अन्वय - महेश कराडकर,
सांगली ( साहित्यिका सुमती क्षेत्रमाडे स्मृती पुरस्कार )
अक्षरमुद्रा - दीपक चिद्दरवार,
लातूर ( कवी नामदेव ढसाळ स्मृती पुरस्कार
)
पुस्तक मैत्री - मयुरी भवारी,
आंबेगाव ( इतिहासकार न.र. फाटक स्मृती पुरस्कार
)
सह्याचल - अनंत काटकर,
परभणी ( साहित्यिक श्रीधर व्यंकटेश केतकर स्मृती
पुरस्कार )
शब्दपालवी - सुभाष कासार,कल्याण ( समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी स्मृती पुरस्कार
)
विद्यार्थीहित
-
चंद्रकांत वामनराव कुलकर्णी, पुणे ( कवी विंदा करंदीकर स्मृती पुरस्कार )
शब्दालय - सुमती लांडे,
श्रीरामपूर ( बलुतकार दया पवार स्मृती पुरस्कार )
रंगबावरी - रजनीश राणे,
मुंबई ( कथालेखिका गिरीजा किर स्मृती पुरस्कार )
अधोरेखित - पल्लवी अशोक
बनसोडे, वसई ( साहित्यिक अनिल अवचट स्मृती
पुरस्कार )
मोडी दर्पण - सुभाष लाड,
मुंबई ( इतिहासकार राजा राजवाडे स्मृती पुरस्कार
)
आश्रय -विनय गावकर,
गोवा कवी बा भ बोरकर पुरस्कार
बदलते जग - रावसाहेब पुजारी,
कोल्हापूर ( साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर स्मृती
पुरस्कार )
आनंद तरंग - पराग मा पोतदार,
पुणे ( साहित्यिक नरहर कुरुंदकर स्मृती पुरस्कार
)
परममित्र - स्वाती जोशी,
ठाणे ( कवी दिलीप पु. चित्रे स्मृती पुरस्कार
समिधा - सौ शैलजा सिंहासने,
कराड ( नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर स्मृती
पुरस्कार )
महावतार बाबाजी
दर्शन
- दिलीप साठे, मुंबई (कवी सोपानदेव चौधरी स्मृती पुरस्कार )
शब्दगांधार - डॉ अरविंद
नेरकर पुणे ( साहित्यिक गंगाधर पानतावणे स्मृती
पुरस्कार )
हेमांगी - प्रकाश कुलकर्णी
मुंबई ( कवयित्री इंदिरा संत स्मृती पुरस्कार
)
शब्दोत्सव - ऍड प्रीती
बनारसे -रेवणे, अमरावती ( कवी बा.सी. मर्ढेकर स्मृती पुरस्कार )
उत्कर्ष - नीलिमा जोशी
वाडेकर, पुणे ( साहित्यिका मालती बेडेकर स्मृती
पुरस्कार )
उद्याचा मराठवाडा - राम शेवडीकर,
नांदेड ( कादंबरीकार बाबा कदम स्मृती पुरस्कार
)
रणांगण - डॉ अविनाश
गारगोटे, नवी मुंबई ( साहित्यिक आनंद यादव
स्मृती पुरस्कार )
अंतर्नाद - डॉ धर्मेंद्र
मुल्हेरकर, नाशिक ( पं. महादेवशास्त्री जोशी स्मृती पुरस्कार )



























































1 टिप्पण्या
धन्यवाद दादासाहेब
उत्तर द्याहटवा