Ticker

6/recent/ticker-posts

~ वाढदिवस... परंतु संकल्पपूर्तीचा दिवस ~

 ~ वाढदिवस... 

परंतु संकल्पपूर्तीचा दिवस ~ 
आज माझा ६१ वा वाढदिवस 🍫आज सकाळीच ज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक दुर्गमहर्षी आदरणीय आप्पा परब यांच्या घरी गेलो... त्यांच्या पाया पडलो आणि "विजयगाथा पराक्रमाची" या माझ्या पुस्तकाची फायनल डमी कॉपी त्यांच्या हातात दिली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि पाठीवरचा मायेचा हात मला बरेच काही सांगून गेला. 
१९८५ पासून मी आप्पांच्या सातत्याने संपर्कात आहे. फक्त 'छत्रपती शिवाजी महाराज' या एका विषयाचा ध्यास घेऊन महाराजांचे विविध पैलू साकल्याने अभ्यासपूर्वक लिहून पुस्तकांच्या रूपाने आप्पा परब यांनी  इतिहास प्रेमी आणि वाचकांसमोर आणले आहेत. गेली ३ वर्ष मी आमच्या कुळाचाराचे दैवत असलेल्या सुभेदार नरवीर तानाजी आणि सूर्याजी मालुसरे यांच्या जीवन चरित्राचा मागोवा घेत ग्रंथलेखन करीत आहे. माझा मोठा मामा वै. केशवबुवा ह कळंबे यांनी आयुष्यभर निधन होईपर्यंत उमरठ येथील नरविरांच्या पवित्र समाधी आणि पूर्णाकृती पुतळ्याची पूजाअर्चा आणि दिवाबत्ती केली फुले वाहिली. न कळत्या वयापासून माझे आजोळ उमरठ असल्यामुळे मी हे त्याच्यासोबत पाहत होतो. उमरठ येथे होणारी पुण्यतिथी, अभिमान वाटेल अशी स्वातंत्र्यसेनानी अंबाजीराव मालुसरे यांनी  सांगितलेली कुळकथा, आप्पानी उलगडलेली इतिहासाची अनेक पाने...मी हे अनुभवत जगत आलो आहे.... आमची महाड - पोलादपूरची भूमी म्हणजेच जावळीचे खोरे. याच ऐत्याहासिक भूमीत    मोरेंचे पारिपत्य, अफझलखानाचा वध ते शिवराज्याभिषेक घडले आहे. मी गेल्या ३८ वर्षात विविध दैनिकांतून इतिहासाच्या संदर्भात अनेक लेख लिहिले आहेत.   छत्रपती शिवाजी महाराजांचा अंगी भिनलेला इतिहास मला स्वस्थ बसू देत नव्हता. दरम्यान शिवकाळ ते पेशवाई या काळातील वाईपासून बिरवाडी पर्यंतच्या इतिहासाचे संकलन करताना बरेच काही हाती लागले. आयुष्याच्या ४० वर्षाच्या टप्प्यात मी महाराष्ट्रातील आजपर्यंतच्या सर्वच इतिहासकारांना, अभ्यासकांना, लेखकांना भेटलोआहे. त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांचे साहित्य वाचले आहे. साहजिकच माझ्याजवळ मी जे संचित जमा झाले ते आपल्या लोकांसमोर पुस्तक रूपाने यायला हवे, या उद्देशाने मी सर्वप्रथम "सुभेदार नरवीर तानाजी - सूर्याजी मालुसरे" यांच्या चरित्र्य ग्रंथाला सुरुवात केली होती... आज ते काम पूर्ण झाले आहे..पुस्तकासह भेटतोय!

- रवींद्र तुकाराम मालुसरे 
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 
मुख्य संपादक - पोलादपूर अस्मिता 




टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या

  1. छान
    आपल्या कार्यास सलाम
    वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  2. 🌹 आपल्या समाजसेवेच्या कार्याला मनःपूर्वक सलाम! 🙏🏻

    स्वतःसाठी नव्हे, तर इतरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी जगणारी माणसं फार कमी असतात. आपण त्या मोजक्या व्यक्तींमध्ये आहात. आपल्या निस्वार्थ सेवेमुळे अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे. आपल्या कार्याला मनःपूर्वक नमन.

    🎂 आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.! 🎉

    परमेश्वर आपल्या आयुष्यात सुख, समाधान, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड यशाची भरभराट करो. आपल्या हातून अशीच निरपेक्ष समाजसेवा घडत राहो, अनेक गरजूंना आधार मिळत राहो आणि आपल्या कार्याचा सुगंध समाजभर दरवळत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

    💐 आपले आयुष्य शंभर वर्षांचे होवो आणि प्रत्येक वर्ष समाजसेवेच्या नव्या प्रेरणेने उजळून निघो!
    पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🌹🙏

    उत्तर द्याहटवा
  3. आदरणीय रविंद्र जी … आपणास वाढदिवसाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा ..!! 🌹🌹🌹🌹🌹

    उत्तर द्याहटवा
  4. शालेय जीवनापासून माझ्यावर नरवीर तानाजी मालुसरेंच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव राहिला आहे.
    तारुण्यात मिसरूड फुटल्यापासून आजतागायत
    ती मिसरूड तशीच जपली होती..
    अचानकपणे अस्त्रक्रीया झाली आणि …. !!
    आपल्या पुस्तकाचे हार्दिक स्वागत अभिनंदन आणि शुभेच्छा ..!!!🙏🌹🌹🌹🌹🌹🙏

    उत्तर द्याहटवा