Ticker

6/recent/ticker-posts

शूरवीर कान्होजी जेधे : मराठा दौलतीचे खांब

शूरवीर कान्होजी जेधे : मराठा दौलतीचे खांब  

"तुटेल मस्तक परी न उलटा फिरेल शब्द इमानी.." छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सरदार कान्होजी जेधे यांच्याबाबत इतिहासाने नोंद करून ठेवली आहे. शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका हातात निखारा आणि दुसऱ्या हातात तुळशीपञ ठेवलेली जी माणसे महारांजाच्या भोवती होती त्यात प्रामुख्याने आणि अगदीच सुरूवातीपासून जे होते त्यांपैकी विशेष उल्लेख हा सरदार कान्होजीराजे जेधे यांचा करावा लागतो. कान्होजी जेधे हे आदिलशाही सरदार होते, शहाजीराजांसोबत दक्षिणेत मोहीम फत्तेह करणे हाच एकच ध्यास त्यांचा होता. मात्र १६४८ साली आदिलशहाने शहाजी राजांसह कान्होजींनाही कैद केले होते. काही काळानंतर आदिलशहाला शहाजी राजांची सन्मानाने सुटका करावी लागली. कान्होजीही मुक्त झाले. ह्यावेळी शहाजी राजांनी त्यांना महाराष्ट्रात वतनदार राहून शिवरायांची पाठराखण करण्यासाठी ठेवले, बेलरोटीची शपथ घेऊन कान्होजींनी शिवरायांना निष्ठापूर्वक साध देण्याचे वचन शहाजीराजांना दिले. मावळच्या देशमुखांमध्ये व सामान्य मावळ्यांमध्ये शिवरायांबद्दल व त्यांच्या कार्याबद्दल आपुलकी व अभिमान निर्माण करण्याचे कार्य कान्होजी करू लागले. जावळी काबीज करणे, प्रतापगडाची लढाई अशा महत्त्वाच्या प्रसंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना कान्होजी जेधे व त्यांच्या मुलाची मोलाची साथ लाभली.

"जैसे अंगद हनुमंत रामाला, तैसे जेधे बांदल शिवाजी राजाला...." शिवरायांनी रयतेच्या स्वराज्याचा शुभारंभ केला त्यावेळी कान्होजी नाईक जेधेनी  महाराजांसाठी वतन सोडले,बारा मावळचे देशमुख एकत्र केले. बारा मावळातील देशमुखांना एकसंध ठेवणारे मातब्बर सरदार कान्होजी जेधे नाईक यांचा कारी येथील वाडा आजही त्यांच्या पराक्रमाची अन इतिहासाची साक्ष देत उभा आहे. सरदार कान्होजी जेथे हे रोहिड खोरे चे देशमुख वतनदार होते, 

प्रतापगड युद्धाचा प्रसंग आपण इतिहासातील पुस्तकात वाचलाच असेल. कोण संपावणार ह्या सिवाला असे म्हणून  बडी बेगम कडाडली. अफझल उठला, विडा उचलला आणि वाईकडे निघाला. प्रचंड धूड असलेला ताकदीने महाबलाढ्य असलेला अफझल खान प्रचंड सैन्य घेऊन देवदेवतांची विटंबना करीत शिवरायांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्रात आला होता. ज्यावेळेस त्याने हा विडा उचलला त्याचक्षणी ती खबर महाराजांच्या कानावर पडली. संकट मोठे आहे, अफझल बलाढ्य आहे, त्याला सामोरे जाण्यासाठी अचूक नियोजन 

पुढच्या आठवड्यात शूरवीर येसाजी कंक 

पाहिजे. एकतर महाराज राहतील किंवा अफझल हे आता उघड झाले होते. सर्वांच्या नजरेत, विचारात चिंता दिसत होती.पण त्यांचे सोबती वीर, रणमर्द असताना महाराजांना ठाऊक होते की विजय आपला होणार. सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे, शूरवीर बाजीप्रभू देशपांडे,येसाजी कंक, बहिर्जी नाईक,कान्होजी जेधे असे एकापेक्षा  एक नेक शूरवीर साथीदार महाराजांच्या सोबत होते त्यामुळे चिंता तशी महाराजांच्या चेहेऱ्यावर दिसून येत नव्हती. पण जेव्हा अफझलखान  स्वराज्यावर चालून आला तेव्हा आदिलशाहने आदेशाचे फर्मान,मावळच्या देशमुखांना पाठवले होते, त्यात आदेश होता की गपगुमान अफजलखानला सामिल व्हा किंवा कुटुंबकबिल्याचे जे परिणाम होतील ते भोगायला तयार रहा. त्याच आदेशाचे फर्मान सरदार कान्होजी जेधेंना सुद्धा आले होते. कान्होजी जेधे नाईक देशमुख यांना पाच मुले होती. पाचही मुलांना घेऊन खानाला सामिल व्हा.  पण आपले इमान स्वराज्यासाठी आणि इथून पुढे जे होईल ते इथल्या आपल्या मातीसाठीच.याच विचाराने कान्होजी जेधे आपल्या पाच मुलांसह त्या  आदेशाचे  फर्मान घेऊन महाराजांच्या भेटीसाठी आले.

फर्मान वाचून महाराज म्हणाले की, " तुम्ही असे नाही केले तर पातशाहीचा हुकूम मोडेल आणि तुमचे वतन जाईल, जीवावर गोष्ट येईल म्हणून आपण ही जावे, त्यांना सामील व्हावे.  "मुलं बाळ कापली जाणार असतिल तर जा, खान तुम्हांला पाटीलकी देईल, कान्होजी जेधेंनी एकही क्षणाचा विलंब न लावता बाजुच पाणी घेतल आणि सांगितल मी हे पाणी मुलावर, घरादारावर सोडलं. पण स्वराज्याशी द्रोह करणार नाही. 

राजं, आमचं  इमान आणि वतन आपल्या पायावरी ठेवून आम्ही आपल्यासोबत राहून स्वराज्याची सेवा करू " त्यानंतर त्यांना कायमस्वरूपी  शिवरायांच्या हृदयात स्थान प्राप्त झाले. 

पुढे अफझलखान प्रतापगडावर आला, सर्व जबाबदार व्यक्ती ठरलेल्या ठिकाणी जाऊन हल्ला करण्यासाठी बसले, युद्ध झाले. सर्वांनी पराक्रमाची शर्थ केली आणि विजय झाला. युद्ध झाले तेव्हा युद्धात कान्होजी जेधे यांच्यावर जबाबदारी होती की गडाच्या पायथ्याशी पारगावाला अफझलच्या छावणीवर जेधे आणि बांदल लोकांना घेऊन चाल करायची. कान्होजीरावांनी तेच केले आणि अक्षरशः गनिमांची लंगडतोड केली. कुणीच पळू शकला नाही. बाजी पासलकर, कान्होजी जेधे, गोदाजी जगताप यांनी गानिमांची कत्तल केली. फात्तेखांचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकांना भिडले. दोघात तुंबळ युद्ध झाले. अखेरीस गोदाजीच्या वीराने मुसेखानाच्या छाताडाचा वेद घेतला व खान कोसळला. मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला अफाट यश हाती लागले आणि स्वराज्यावरचे भयानक संकट पार पडले. शिवाजी महाराज प्रतापगडावर सुखरूप परतले. 

कान्होजी जेध्यांचा आणि त्यांच्या लोकांचा इमान स्वराज्याशी, ते एकनिष्ठ राहिले हे सिद्ध झाले होते,आणि त्यामुळे त्यांना विशेष सन्मान म्हणून स्वराज्याचे पाहिले मानाचे पान आणि तरवार देऊन सन्मान केला. जून १६६० मध्ये घनदाट जंगलातील वासोटा किल्ला कान्होजींनी जिंकून स्वराज्यात दाखल केला. त्यानंतर सप्टेंबर १६६० मध्ये कान्होजी आजारपणामुळे मरण पावले, कान्होजींच्या मृत्यूनंतरही त्यांच्या मुलांनी स्वराज्यासाठी कार्य सुरु ठेवले. कान्होजी जेधे वाडा चौसोपी असून वाड्यात मुख्य बैठक खोली, देवघर व पाचे खोल्या आहेत. या वाड्याचे बांधकाम दगड व चुना या मिश्रणात असून खांब, तुळ्या, वासे हे लाकडी व त्यावर पत्रा व पत्र्यावर मंगलोरी कौलाचे छप्पर आहे. सरदार कान्होजी राजे जेधे यांच्या घराण्याने जपून ठेवलेल्या ऐतिहासिक शस्त्रास्त्रांमधील हि एक आकर्षक आणि तितकीच धारदार अशी कट्यार.... या कट्यारीच्या पत्यावर कोरण्यात आलेल्या ‘हनुमानाच्या चित्राची कलाकृती’ लक्षवेधक ठरते. ह्या सर्वांचे स्मरण आपण प्रत्येक वेळी करूया!



रवींद्र मालुसरे 

अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ९३२३११७७०४ 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या