महाड - पोलादपूर शूरवीर मावळ्यांची खाण
महाड - पोलादपूर शूरवीर मावळ्यांची खाण
१९१४ते १६ मध्ये पहिल्या महायुद्धात ब्रिटिश फौजा तुर्क फौजेकडून मध्य आशियामध्ये मार खात असताना त्यांनी मराठा फौजांना मात्र इराकमध्ये भर थंडीत, कॉलरा, जुलाबाच्या साथीत लढविले, १००० तुर्की सैनिकांना मराठ्यांनी हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी आरोळी देत संपवले, मात्र ११४ मराठा जवान त्यावेळी परभूमीत शहीद झाले. हौतात्म्य पत्करलेल्या या जवानांसाठी आजही इराकमध्ये बसरा शहरात २ डिसेंबर हा दिवस Sharqat Day म्हणून साजरा करतात. तिकडच्या मेमोरियल मध्ये या शहीद स्तंभावर कदम, मोरे, चव्हाण,मालुसरे, उतेकर, परब, दळवी ही नावे ठळकपणे दिसतात.
पहिल्या महायुद्धात इराक पॅलेस्टाईन (आताच्या इस्राएल) मध्ये ब्रिटिश जनरल अलिबेनीने शत्रूंचा ४ वर्ष युद्ध करून पराभव केला. तेव्हा एका मोठ्या अधिकाऱ्यास विचारण्यात आले की ह्याचे श्रेय कोणाला?
बिनदिक्कतपणे तो बोलला "फक्त मराठा".त्यानंतर आजपर्यंत कोणत्याही युद्धात मराठा हवेच हा नियम देशाच्या संरक्षण दलात करण्यात आला.
पोलादपूर तालुक्यातील साखर - खडकवाडी गावचे सुपुत्र आणि ज्येष्ठ शिवसेना नेते मा विनायकराव मालुसरे यांचे आजोबा ... हुतात्मा सुभेदार भाऊराव मालुसरे हे पहिल्या महायुद्धात परदेशात धारातीर्थी पडले होते. त्यांना वीरमरण आल्यानंतर तत्कालीन इंग्रज सरकारने या वीरपुरुषाचा 'मेडल ' देऊन मरणोत्तर गौरव केला होता. हे मेडल आजही त्यांच्या घरी आहे. .... या घटनेचा राज्य तसेच केंद्र पातळीवर आणि आर्मी विभागाशी पत्रव्यवहार करून शोध घेण्याचा प्रयत्न केला ..पण यश आले नाही. मात्र बसरा शहरातील शहीद स्तंभाविषयी रिटायर्ड आर्मी ऑफिसरकडून आज अचानक याबाबत ही अनोखी माहिती मिळाली आता यापुढे सुतावरून लवकरच स्वर्ग गाठता येईल असा विश्वास मिळाला त्याचबरोबर ( ब्रिटिश सरकारच्या दप्तरात याची नोंद काय असेल हे पाहावे लागेल )
शिवरायांच्या काळापासून हिंदवी स्वराज्यासाठी महाड - पोलादपूर मधील मावळा शर्थीने लढला, त्याचप्रमाणे पहिल्या जागतिक महायुद्धात सुद्धा असाच पराक्रम करीत या दोन्ही तालुक्यातील अनेक जण ११० वर्षांपूर्वी परकीय भूमीवर पराक्रम करून धारातीर्थी पडले आहेत.... बघूया याबाबत शोधाशोध सुरु केली आहे.
रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
९३२३११७७०४
या ब्लॉगवरील इतरही पोस्ट वाचण्यासाठी अनुक्रमाणिका पहा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा