पत्रकारितेची तत्त्वे व मूल्ये जपण्याचा निर्धार व्हावा - रवींद्र मालुसरे




पत्रकारितेची तत्त्वे व मूल्ये 

जपण्याचा निर्धार व्हावा - रवींद्र मालुसरे

 मुंबई : पत्रकारिता हे प्रबोधनाचे व लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. सामाजिक घडामोडींचे स्वरुप प्रतिबिंबित करताना समाजाला आरसा दाखविण्याचे कार्यही पत्रकारिता करते. याच उद्देशाने समाजाला वैचारिकतेचा आरसा दाखविण्यासाठी मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे दैनिक सुरु करून रोवली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात गुलामगिरीतून देशाची मुक्तता करण्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतर काही वर्षे देशाचे प्रश्न मांडून विकासाची भाषा करण्यासाठी पत्रकारिता केली जात होती. मात्र अलीकडे काही वर्षांपासून आमची एकूणच पत्रकारिता ही सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्का पेक्षा राजकीय नेत्यांना मुजरे करण्यात अन अधिकाऱ्यांशी 'गोड संबंध' जोपासण्यात खर्च होतेय.

देशभरात पत्रकारिता तर्कहीन झाल्यामुळे आता संदर्भहीन होवून बसली आहे. सध्याच्या पत्रकारांवर चांगल्या संस्कारांचा आणि अभ्यासाचा अभाव असून चुकीचे संस्कार झाले आहेत. पत्रकारितेच्याही  क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानामुळे बराच बदल झाला असला तरी गत पत्रकारितेचे  गमावलेले स्थान पुन्हा प्राप्त करण्यासाठी जे कष्ट घ्यायला हवेत ते घेण्याचा प्रयत्न करताना अपवादात्मक कुणी दिसत नाही, पत्रकारिता करताना सेवा हा धर्म समजून समाजाच्या मूलभूत प्रश्नावर लेखणीतून प्रकाश टाकणारे आणि पत्रकारितेची तत्त्वे व मूल्य़े जपण्याचा निर्धार व्यक्त करणारे या क्षेत्रात अधिक व्हायला हवेत असे आवाहन मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी केले. पाक्षिक आदर्श रायगड वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त अंबरनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मालुसरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गुरुवर्य ह  भ प उमेशमहाराज शेडगे, कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजप अंबरनाथ पूर्वचे शहर अध्यक्ष सर्जेराव माहूरकर, नगरसेवक सचिन पाटील, पोलादपूर नगरपंचायतीचे नगरसेवक शिवराज पार्टे, उद्योजक रामचंद्रशेठ कदम, वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख कृष्णा तथा के के कदम, नगरसेवक तुळशीराम चौधरी, प्रेरणा फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रेरणा गावकर-कुलकर्णी, मनसे कामगारसेनेचे राज पार्टे, पोलादपूर शिवसेना सहसंपर्क प्रमुख कृष्णा कदम, ह भ प जगदीशसिंग पप्पाजी आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पाक्षिक आदर्श रायगडचे कार्यकारी संपादक शैलेश सणस यांनी सुरुवातीला प्रास्ताविक करताना पाक्षिकाची वाटचाल आणि भूमिका याची मांडणी केली. तर मुख्य संपादक रमेश कों सणस यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

मालुसरे पुढे बोलताना असेही म्हणाले की, सध्याच्या गतिमान व आव्हानात्मक युगात सजग व डोळस पत्रकारिता अबाधित ठेवण्यासाठी पाक्षिक आदर्श रायगडने यापुढच्या काळात आपल्या कामाप्रती असणारी प्रतिबद्धता, उच्च दर्जाची पत्रकारिता करताना असणारी नैतिकता, सत्यासोबत उभी राहण्याची हिंमत, सचोटी, स्वतंत्र्य भूमिका घेणे महत्वाचे ठरणार आहे.

तर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यावेळी शुभेच्छा देताना म्हणाले की, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता. १५ ते २० वर्षापूर्वीची पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता पूर्णपणे बदलली असून आजच्या डिजिटल युगात ब्रेकिंग न्यूज क्षणात वाऱ्यासारखी पसरते. लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. बदलत्या काळात अनेक आव्हानांचा सामना करत आपल्याला पत्रकारिता करावी लागत आहे. अशा परिस्थितीत देखील आदर्श रायगडने निष्पक्ष पत्रकारितेची परंपरा अबाधित ठेवावी. गुरुवर्य ह  भ प उमेशमहाराज शेडगे यांनी सुरुवातीला सणस पिता-पुत्राचे कौतुक करीत उपक्रमाला आशीर्वाद दिला.

यावेळी ज्येष्ठ भजनी गायक ह भ प रामचंद्रबुवा रिंगे, सुप्रसिद्ध पखवाज वादक सुनीलमहाराज मेस्त्री, ज्येष्ठ पत्रकार गुरुनाथ तिरपणकर, कवयत्री सुरेखा गावंडे, ज्येष्ठ लेखक रवींद्र माहिमकर, कामगार नेते राज पार्टे,कोतवाल गावचे उद्योजक तुकाराम शिंदे, दत्ता केसरकर, योगेश रिंगे, संजय होळकर, आम्ही रायगडकर संस्था आदींना राज्यस्तरीय विशेष पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. पत्रकार अविनाश म्हात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या समारंभात समाजातील पत्रकार, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, कलाक्षेत्र, क्रीडाक्षेत्र, शिक्षण, संस्था यांना राज्यस्तरीय सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले

राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार 

मा श्री रवींद्र मालुसरे 

मा श्री शिवराज अनंत पार्टे 

मा श्री गुरुनाथ तिरपणकर 

मा सौ अरविंद सुर्वे

मा श्री  गणेश अनंत नवगरे 

मा गोपाळकुमार चांगदेव कळसकर 

 राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार

गुरुपुत्र गुरुवर्य श्री उमेश महाराज शेडगे 

मा आमदार डॉ बालाजी किणीकर अंबरनाथ विधानसभा 

मा आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे 

कोकण विभाग शिक्षक मतदार संघ 

मा  श्री कृष्णा कदम के के 

मा श्री सर्जेराव माहुरकर 

मा सौ मनीषाताई अरविंद वाळेकर नगराध्यक्षा अंबरनाथ नगर पालिका 

मा श्री सदाशिव हेरंद पाटील 

मा श्री अजय मोहोरीकर 

मा सौ प्रेरणा वैभव गावकर कुलकर्णी 

मा श्री तुळशीराम चौधरी 

मा सौ सुजाता दिलीप भोईर  

मा श्री उमेश गुंजाळ 

मा श्री अविनाश चिंतामण म्हात्रे

मा श्री गणेश हिरवे 

मा श्री आब्रेश गौडा 

मा श्री शरद जावळे 

मा सौ श्रुती उरणकर 

मा सौ दिपा चंद्रकांत गांगुर्डे

मा सौ रेखा अत्तरदे 

मा श्री शैलेश भोईर 

मा सौ वर्षा सतिश कळके

मा श्री दाजीबा रिंगे

मा श्री ... सोपान दादा मोरे

मा श्री....उत्तम महाराज जाधव किर्तनकार

मा श्री ...एकनाथजी लक्ष्मण कळंबे 

मा सौ प्रिसिल्ला डीसिल्वा

मा श्री सत्यवानदास जी बैरागी

 मा श्री रवींद्र माहीमकर - राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार 

 मा सौ अनिता कळसकर - राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार

 राज्यस्तरीय उद्योग रत्न पुरस्कार

रामचंद्रशेठ कदम - कदम ट्रॅव्हल्स 

मा श्री विश्वनाथ शेठ पनवेलकर 

मा श्री ज्ञानधर मिश्रा  

मा सौ चित्रा राऊत

मा श्री भूषण कांबळे 

मा श्री ...तुकाराम शेठ दगडू शिंदे

मा संजयजी एकनाथ कळंबे 

मा श्री यशवंत विठ्ठल खोपकर 

मा श्री ...दत्ता शेठ महादेव केसरकर

मा श्री अथर्व बुटाला 

 मा श्री शिवाजी शेठ बाबू खारीक - राज्यस्तरीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार 

 राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार 

मा श्री  रामचंद्र महाराज रिंगे

मा श्री सुनील  मेस्त्री 

मा सौ सुरेखा गावंडे 

मा गायणाचार्य मृदुंगाचार्य ... अंकुश महाराज कुमठेकर (कोकणरत्न)

मा श्री विशाल कडु ( गुरुजी )

मा सौ पल्लवी वढवेकर-बर्वे

मा सौ श्रुती अमेय पटवर्धन

मा कु गायिका पौर्णिमा गणेश शिंदे

 राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार 

मा श्री राम घरत, आंतरराष्ट्रीय खेळाडू

मा श्री किरण कृष्णा सणस 

मा श्री प्रमोद पाटील 

मा सौ शर्मिला केसरकर

 राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्कार

मा सौ प्रा.तृप्ती सोनवणे

मा सौ ममता मसुरकर

 मा श्री संजय जयराम होळकर - राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

 मा सौ.संतोषी संपत बांगर - राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार 

 सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार 

मा श्री राज साहेब गणपत पार्टे - संस्थापक आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था

आम्हाला गर्व हिदूत्वाचा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा

आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठान 

 मा श्री चंद्रकांत भंडारे - राज्यस्तरीय ग्रंथमित्र  पुरस्कार 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उतेकर कुळाचा इतिहास आणि भाऊ -बहिणींना आवाहन

लक्ष्मण उतेकर .... प्रवास जिद्दीचा, संघर्षाचा, यशाचा

लक्ष्मण उतेकरांचा छावा इतिहास घडवणार