लहान मुलांना मोबाइलपासून दूर ठेवा - डॉ तात्याराव लहाने
लहान मुलांना मोबाइलपासून दूर ठेवा - डॉ तात्याराव लहाने
प्रभादेवीत मोफत नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न
मुंबई : (रवींद्र मालुसरे ) - आजकाल बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांमध्ये तरुणांचे आणि लहान मुलांचे प्रमाण वाढत आहे. चष्म्याचा नंबर, तिरळेपणा हे बऱ्याचवेळा डोळ्यांची जडणघडण होताना निर्माण झालेल्या अडचणीमुळे होतात आणि त्यावर तितकेच चांगले उपायही उपलब्ध आहेत. परंतु हल्ली डोळ्यांची नीट काळजी आणि डोळ्यांवर निष्कारण वाढवलेला ताण यामुळे होणारे आजार वाढत आहेत. आज कामे संगणकावर अवलंबून असतात. संगणक, मोबाईल, टॅब, आयपॅड या सर्वांतून प्रकाश डोळ्यामध्ये पडतो. ही सर्व यंत्रे आपण डोळ्यांपासून एक फुटापेक्षा कमी अंतरावर ठेवतो. यातून सततच्या पडणाऱ्या प्रकाशामुळे डोळ्यांच्या बाहुल्या आकुंचन पावतात आणि कालांतराने डोळ्यातील स्नायू स्पासमच्या स्थितीत जातात. त्यामुळे नजर कमी होते. डोळे दुखणे सुरु होते आणि काही वेळ काम केल्यानंतर, लगेच डोळ्याचा थकवा जाणवायला सुरुवात होते. दिवसांतून ८-१० तासांपेक्षा अधिक वेळ संगणकावर काम करताना आपल्या डोळ्यांची उघडझाप बंद असते आणि दृष्टीपटलावरील अश्रू तरंग सुकून जातात. डोळे वारंवार थंड पडतात. त्यामुळे डोळ्यांचे इन्फेक्शन वारंवार होते. यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे ५-१८ या वयोगटातील मुला-मुलींमध्ये या आजाराचे वाढते प्रमाण दिसून येते. अपत्य लहान असल्यापासून, अगदी वयाच्या पहिल्या वर्षापासून त्याच्या / तिच्या हातात खेळणी म्हणून टॅब, मोबाईल , आयपॅड अशा वस्तू दिल्या जातात. त्यातून येणाऱ्या प्रकाशामुळे डोळ्यांना लवकर चष्म्याचा नंबर लागतो. मुलांना अगदी लहान वयापासून कोरड्या डोळ्यांसाठी औषधे सुरु करावी लागतात. डोळे हे माणसाच्या जगण्याचेच नव्हे तर आनंदाचे साधन असल्याने मायबापांनो काळजी घ्या असा सल्ला डॉ तात्याराव लहाने यांनी प्रभादेवीकरांना दिला.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा क्रमांक १९३ चे शाखाप्रमुख संजय भगत यांच्या आयोजनातून तसेच विभग प्रमुख महेश सावंत यांच्या सहकार्याने प्रभादेवी महापालिका शाळेत शिबिराचे आयोजन केले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रभादेवीतील नागरिकांकरिता सुप्रसिद्ध नेत्र चिकित्सक पद्मश्री तात्याराव लहाने, डॉक्टर रागिणी पारिख, डॉक्टर सुमित लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाचे नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला माजी केंद्रीय मंत्री शिवसेना नेते अनंत गीते, माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते, आमदार सुनील शिंदे, विभाग प्रमुख महेश सावंत, आशिष चेंबूरकर, श्रद्धा जाधव, आरती कीनरे ,उद्योजक अनिल माने, विभाग संघटक शशी पडते ,राजू पाटणकर, निरंजन नलावडे, मा. शाखा प्रमुख लक्ष्मण भोसले, नगरसेविका हेमांगी वरळीकर, उपविभाग संघटक सूर्यकांत बिर्जे, उप विभाग प्रमुख कैलास पाटील, यशवंत विचले, अभय तामोरे, रेखा देवकर, हिरु दास, विनायक देवरुखकर ,शाखाप्रमुख विनय अक्रे, शाखा समन्वयक गणेश देवकर, चंदन साळुंखे, रत्नाकर चिरनेरकर, अभिजीत कोठेकर, रवी पड्याची, कीर्ती मस्के, संजना पाटील, वैष्णवी फोडकर, युवा सेनेचे मुंबई समन्वयक सागर चव्हाण, अभिजीत पाताडे, जाई सोमण, युवा विभाग अधिकारी सप्नील सूर्यवंशी, गुर्शिन कौर, साईश माने, चिंतामणी मोरे, सौरभ भगत तसेच विभागातील व शिवसेना संघटनेतील मान्यवरांनी भेट दिली सदर शिबिर आयोजित केल्याबद्दल नागरिकांनी शिवसेनेचे तसेच शाखाप्रमुख संजय भगत यांचे आभार व्यक्त केले. शिबिर यशस्वी करण्याकरिता कार्यालय प्रमुख सुशांत वायंगणकर , सुजन मंत्री, सुरेश झित्रे व इतर पदाधिकाऱ्यांसह युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व महिला पुरुष शिवसैनिकांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिरात प्रभादेवी व परिसरातील ६२५ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा