नरवीर सूर्याजी मालुसरे यांच्या गावातग्रामदैवत आई नवलाई-भैरी पुनः प्राणप्रतिष्ठा आणि पुनर्रचित मंदिराचा उदघाटन सोहळा
सुभेदार नरवीर तान्हाजी आणि सूर्याजी मालुसरे यांच्या साखर गावाचे ग्रामदैवत आई नवलाई-भैरी यांची पुनः प्राणप्रतिष्ठा ( जीर्णोद्धार ) आणि पुनर्रचित मंदिराचा उदघाटन सोहळा दिनांक २४ व २५ एप्रिल २०२५ रोजी संपूर्ण दोन दिवस धार्मिक आणि पारंपरिक रितिरिवाज पूर्ण करून पोलादपूर तालुक्यात संपन्न होत असल्याचे अध्यक्ष विनायकदादा मालुसरे आणि संतोष महादेव मालुसरे यांनी पत्रकार परिषदेद्वारे सांगितले आहे.
ग्रामदैवतांची उत्पत्ती भारताच्या प्राचीन धार्मिक, सांस्कृतिक, आणि सामाजिक परंपरांशी निगडित आहे. विशेषतः महाराष्ट्रातील कोकण आणि इतर ग्रामीण भागांमध्ये ग्रामदैवतांना फार पुरातन काळापासून महत्त्व आहे. ग्रामदैवतांचा उगम कसा झाला, याविषयी अनेक दंतकथा, लोककथा, आणि धार्मिक आख्यायिका आहेत. आमच्या साखर गावाबाबतही असेच म्हणावे लागेल. प्राचीन काळात नैसर्गिक संकटे, राक्षसी शक्ती आणि जंगलातील प्राण्यांपासून गावे सुरक्षित नव्हती. देवावर श्रद्धा ठेवणारी साधी - भोळी माणसं असलेल्या गावकऱ्यांना त्यांच्या जीवनाचे रक्षण करण्यासाठी शक्तिशाली संरक्षक देवतेची आवश्यकता होती. म्हणूनच साखर गावातील पूर्वजांनी आमच्या गावातील स्थानिक लोकदेवतांची उपासना सुरू केली. या लोकदेवतांची पूजा आणि अर्पण केलेल्या बलिदानांमुळे या देवता गावाच्या रक्षणासाठी सज्ज झाल्या. मातेच्या कृपाशीर्वादाखाली अख्खं गाव सुखी आणि समाधानी आयुष्य शेकडो वर्षे जगत आहे.
सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांचे पराक्रमी बंधू नरवीर सूर्याजी मालुसरे यांची चिरनिद्रा घेणारी समाधी आणि त्यावेळी त्यांची सौभाग्यवती सती गेल्या त्यांची सतीशिळा साखर गावात आहे. ८ वाड्यांची अशी पार्श्वभूमी असलेले साखर गाव पोलादपूर तालुक्यातील कामथी नदी, ढवळी नदी आणि महाबळेश्वरातून उगम पावलेल्या सावित्री नदी या तीन नद्यांच्या तिरावर वसलेले एक मोठे सुंदर गाव. गावाला फार पूर्वीपासून ऐत्याहासिक, सामाजिक, राजकीय, पारमार्थिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे.
दिनांक २३ एप्रिल २०२५ सकाळी ७ वाजता नवीन मूर्तीचे आगमन त्यानंतर गाव प्रदक्षिणा करीत टाळ-मृदंग, सनई-चौघडा, लेझीम, ढोल ताशा यांच्या गजरात शोभायात्रा. २४ एप्रिल २०२५ सकाळी १० ते दुपारी २ वा. पर्यंत वेदशास्त्र संपन्न गुरुजी-संजय कुलकर्णी यांच्या हस्ते प्रधान संकल्प, श्री गणेश पूजन, पुण्यहवाचन, मुख्य देवता स्थापना, नवग्रह स्थापना, वास्तूप्रसाद होमहवन मूर्तीचे अग्नुतारण, जलाधिवास, धान्याधिवास प्रधान हवन, मूर्तीचा पिंडिकान्यास, होमहवन होणार आहे.
२५ एप्रिल २०२५ सकाळी ८ वाजता मुख्यदेवता आई नवलाई आणि जोगेश्वरी, वाघजाई, भैरी, बापदेव, महादेव, जननी, सालूबाई, कालभैरी या मूर्तीची स्वानंद सुखनिवासी प. पू. गुरुवर्य अरविंद नाथ महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा कलशारोहन - परमपूज्य योगीराज ब्रह्मचारी ह. भ. प. एकनाथ महाराज लाखे होणार आहे. दुपारी १ वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हलगीवादक राजू आवळे पथक यांचे हलगी वादन. संध्याकाळी ५ ते ६ वा. साखर गावातील वारकऱ्यांचे सामुदायिक भजन, गावातील महिलांचा हरिपाठ तर आळंदी येथील ह. भ. प.एकनाथ लाखे महाराज रात्रौ ९ ते ११ वाजता कीर्तन होणार आहे. रात्रौ १२ नंतर जेजुरी येथील भाऊ पाचंगे हे जागरण गोंधळ घालणार आहेत.
पोलादपूर तालुक्यातील समाजातील सर्व समाजधुरीण, सगे सोयरे, आप्त, इष्टमित्र परिवाराने अत्यानंदाने या धार्मिक कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री. भरत चिमाजी चोरगे (उपाध्यक्ष), श्री. बाजीराव विठोबा मालुसरे (सचिव), श्री. सखाराम रामचंद्र बांद्रे (खजिनदार), श्री. दीपेश परशुराम मालुसरे (कार्याध्यक्ष) यांनी केले आहे.
साखर म्हणजे...कामथी नदी, ढवळी नदी, सावित्री नदी आणि महाबळेश्वरातून उगम पावलेल्या तीन नद्यांच्या तिरावर वसलेले ८ वाड्यांचे एक मोठे सुंदर गाव. साखर गावाला फार पूर्वीपासून ऐत्याहासिक, सामाजिक राजकीय, परमार्थिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. गावाच्या प्रवेशद्वाराच्या वेशिवरच स्वयंभू श्रीराम भक्त मारुतीरायांचे प्राचीन मंदिर आणि त्याठिकाणीच पूर्वकाळापासून आई नवलाई-भैरीची सहान आहे. सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांचे पराक्रमी बंधू नरवीर सूर्याजी मालुसरे यांची चिरनिद्रा घेणारी समाधी आणि त्यावेळी त्यांची सौभाग्यवती सती गेल्या त्यांची सतीशिळा आहे, खडकवाडीत ७ दशके जगदगुरू संत तुकोबारायांचा बिजोत्सव, सुतारवाडीत भगवान श्री विश्वकर्मा यांचा उत्सव, रिंगेवातीत श्री दत्तगुरूंचा उत्सव,तर देऊळकोंड येथे हनुमान जयंती उत्सव आणि बौद्धवाडीत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती वर्षानुवर्षे साजरा होतो. पराक्रमाचा वारसा सांगणाऱ्या गावात सैन्यातील सुभेदार, देशाच्या स्वातंत्र्यासाठी कारावास भोगलेले स्वातंत्र्यसेनानी, भारतीय सैन्यातील जवान जन्माला आले आहेत. ग्रामीण जीवनात महत्वपूर्ण ठरलेल्या अठरा पगड जाती तसेच अलुतेदार - बलुतेदार यांची कोकणाला मुळातच परंपरा आहे आणि साखर गावात या सर्व पिढ्या शेकडो वर्षांपासून गावरहाटी जपत गुण्यागोविंदाने नांदत आहेत.
साखर गावात आई नवलाई, भैरी, बापदेव, जोगेश्वरी, जननी कुमळजा, काळभैरव, साळूबया, महादेवाची पिंड ही नऊ नावे असलेल्या देवस्थानांचे प्राचीन मंदिर आहे. याअगोदर अस्तित्वात असलेले मंदिर शेकडो वर्षांपूर्वी वाडवडिलांनी बांधले होते. ऊन वारा पाऊस सहन करीत ही पुरातन वास्तू भक्कमपणे शतकोनशतके उभी होती. परंतु साखर मधील आबालवृद्धांच्या मनात आले की, गावातील पांढरीचे (नवलाईचे) पुरातन मंदिर पुन्हा नव्याने उभे राहावे. काहींनी पुढाकार घेतला आणि बांधण्याचे एकमताने ठरले. ज्या बयेच्या सावलीचे छत्र आपल्या सर्वांवर पिढ्यानपिढ्या आहे त्यामुळे आपल्या कमाईचा अधिकाधिक हिस्सा काढून या मंदिराचा जिर्णोदार करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी स्वबळावर घेतला. ज्यांना नेतृत्व दिले, त्यांचे निर्णय मान्य करण्याचे आणि मेहनत घेण्याचे स्वयंस्फूर्तीने ठरवले आणि त्याचे फळ म्हणजे उच्च प्रतीचा दगड वापरून स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना आणि आकर्षक सजावट साखरवासीयांसाठी गावपांढर हे एक जागृत देवस्थान असून आलेली संकटे आपण आईला सांगितली तर ती दूर होतात. नवस केल्यावर मनासारखं चांगले घडून आल्याचा अंतर्यामी विश्वास वाटतो. तसा प्रत्ययही त्यांना येतो.
नवरात्रीत नऊ दिवस या मंदिरामध्ये जागर होतो. गावातील लोक तसेच चाकरमानी, माहेरवाशिनी येऊन देवांचे आशीर्वाद घेतात. त्याचप्रमाणे फाल्गुन महिन्यात होळीच्या आदल्या दिवशी देवीची पालखी सजवून नाचत गाजत होमाच्या जवळ असलेल्या सहानेवर आणली जाते. पूजा-अर्चा होते त्यानंतर दोन दिवस पालखी मानकऱ्यांच्या उपस्थितीत गावातील सर्व घरांचा उंबरा ओलांडून प्रत्येकाच्या घरी घेऊन जातात. वाडवडिलांनी सांगितलेल्या प्रथा, परंपरा पाळत आजवर या ग्रामदैवतांमुळे आपण सुरक्षित आहोत ही आमची ठाम समजूत आहे. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या अनेक पिढ्यांना या ग्रामदैवतांचा आशीर्वाद लाभेल आणि गावाची प्राचीन ग्रामसंस्था टिकून राहील, आनंदाने आणि एकोप्याने नांदेल हे निश्चित.
साखर गावातील स्वातंत्रसेनानी स्व. अंबाजी महादेवराव मालुसरे, स्व. सखाराम गणपत चोरगे, स्व. भिवा हनवती चोरगे, स्व. विठोबाअण्णा सुभानराव मालुसरे, स्व. रामचंद्र भाऊराव मालुसरे, स्व. महादेव रामचंद्र चोरगे, तुकाराम सखाराम चोरगे, स्व. स्व जिजाबा हरी मालुसरे, स्व. तुकाराम गोविंद बांद्रे, स्व. विठोबा गेणू भिसे स्व. धोंडू गोविंद तांदळेकर, स्व. मारुती सखाराम सुतार, स्व. गंगाराम बाबू तांदळेकर आदी पुण्यात्मक आत्म्याचे या ठिकाणी स्मरण करावेसे वाटते. यांच्या कार्यकर्तृत्वाबरोबर ज्यांनी या गावाची परंपरा आजपर्यंत अबाधीत जतन केली. आमच्या आई नवलाई-भैरीचे मंदिर भव्य दिव्य असावे अशी इच्छा असलेले परंतु आज हयात नसणारे स्व. महादेव अंबाजीराव मालुसरे, स्व. चिमामामा सीताराम चोरगे, स्व. गणपतमामा मारुती कदम तसेच आज कार्यरत असणारे सर्व साखर ग्रामस्थवासीय यांच्या विचाराने व मार्गदर्शनाने आज हे आई नवलाई भैरीचे मंदिर साकारत आहे. गावातील ग्रामस्थ व गाव सोडून इतर ठिकाणी सुखासमाधानाने नांदणाऱ्या गावातील सर्व वयोगटातील आत्या, बहिणी यांनी हस्ते-परहस्ते देणगी व इतर सहकार्य दिले.
मंदिराचे उदघाटन गावातील ज्येष्ठ नागरिक सर्वश्री धर्मभूषण आणि रायगड भूषण गुरुवर्य ह भ प श्री लक्ष्मण महाराज मालुसरे, श्री जयराम रामचंद्र बांद्रे, श्री बाबू तुकाराम चोरगे, श्री मारुती रामजी तांदळेकर, श्री गंगाराम सुभाना कदम, श्री विष्णू सखाराम सुतार यांच्या हस्ते होणार आहे.
दिनांक २५ रोजी ग्रामस्थ मंडळांच्या वतीने मा. सुनील तटकरे (खासदार रायगड लोकसभा), मा. ना. भरतशेठ गोगावले - मंत्री रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री (महाराष्ष्ट्र राज्य ), मा. ना. आदितीताई तटकरे,मंत्री महिला व बालविकास मंत्री (महाराष्ट्र राज्य ), मा. श्री. प्रवीण भाऊ दरेकर (विधान परिषद गटनेते अध्यक्ष मुबई बँक ), मा. सौ. स्नेहल जगताप-कामत (माजी नगराध्यक्षा, महाड) यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
पोलादपूर तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे प्रमुख गुरुवर्य दादामहाराज मोरे माऊली, गुरुवर्य अनंतदादा मोरे माउली, गुरुवर्य रामदादा महाराज घाडगे, गुरुवर्य रघुनाथदादा महाराज मोरे, गुरुवर्य हरिभाऊ महाराज रिंगे, गुरुवर्य गणपतदादा महाराज मोरवणकर यांचे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने गुरुपूजन करण्यात येणार आहे.
मंदिर संकल्प सोडण्यापासून ते पुनर्निर्माण आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंबई आणि ग्रामीण पुढील कार्यकारी मंडळाने विशेष मेहनत घेतली.
आई नवलाई ग्रामस्थ मंडळ मुंबई (रजि.) - संतोष महादेव मालुसरे (अध्यक्ष) / भरत चिमाजी चोरगे (उपाध्यक्ष) / बाजीराव विठोबा मालुसरे (सचिव), दिनकर धोंडू चोरगे (सह सचिव) / सखाराम रामचंद्र बांद्रे (खजिनदार) / दीपेश परशुराम मालुसरे (कार्याध्यक्ष) / दशरथ काशीराम चोरगे (हिशोब तपासनीस) / महादेव दाजी कदम (सभासद) / राजेश लक्ष्मण तांदळेकर (सभासद)
साखर ग्रामस्थ मंदिर गाव कमिटी - विनायक रामचंद्र मालुसरे (अध्यक्ष) / हनवती भिवा चोरगे (उपाध्यक्ष) / दगडू शंकर मालुसरे (सचिव), संतोष शांताराम सुतार (खजिनदार) / सदस्य - लहू सखाराम मालुसरे, गोविंद धों चोरगे, अशोक रामचंद्र चोरगे, नारायण शंकर तांदळेकर, जयराम विठोबा चोरगे, धोंडू लक्ष्मण घावरे, गणेश तुकाराम सुतार, भगवान किसन पवार, नथुराम कोंडीराम सकपाळ, विजय मुकणे
प्रमुख मार्गदर्शक - श्री ज्ञानोबा विठोबाराव मालुसरे, श्री पांडुरंग (शेठ) चिमाजी चोरगे
समन्वय समिती - श्री रवींद्र तुकाराम मालुसरे (अध्यक्ष-मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई), दगडू महादेव चोरगे, श्री विष्णू धों चोरगे, श्री विश्वनाथ हनवती मालुसरे,श्री कोंडीराम हरी सुतार,
मंदिर नियोजन समिती - श्री पुंडलिक राजाराम मालुसरे (राज), श्री परशुराम विष्णू चोरगे, श्री रोहित रामचंद्र उतेकर, श्री. तानाजी शंकर मालुसरे, श्री भरत वसंत तांदळेकर, श्री संजय कोंडीराम चोरगे, श्री संजय महादेव मालुसरे, श्री सुधीर शंकर चोरगे, श्री. संतोष तुकाराम मालुसरे, श्री सचिन कृष्णा चोरगे, श्री रमेश रामचंद्र चोरगे, श्री. हरी दत्ताराम शेडगे, श्री. नितीन जयराम उतेकर, श्री प्रकाश बारकू कदम, श्री नितीन उतेकर, श्री भगवान लक्ष्मण घावरे, श्री अनंत तुळशीराम चव्हाण, श्री संजय किसन खैरे, श्री विठ्ठल महादेव गायकवाड, श्री पांडुरंग गणपत उतेकर, श्री गोपाळ मारुती भिसे, श्री सखाराम सुरेश खराते, श्री सुशांत सूर्यकांत गांधी, श्री. सखाराम किसन निंबाळकर, श्री. संदीप रामचंद्र मालुसरे, प्रकाश शंकर चोरगे, श्री. सहदेव बारकू सुतार, श्री.नाना बाबू चोरगे
सल्लागार - श्री महादेव चोरगे, श्री तुकाराम बाबू जाधव, शंकर धोंडू चोरगे, काशीराम ग जाधव, श्री शंकर बारकू कदम, श्री कृष्णा पांडुरंग सुतार, लक्ष्मण तुकाराम चोरगे, श्री रामचंद्र भागोजी तांदळेकर, रामचंद्र गोपाळ उतेकर, श्री मारुती कृष्णा सावंत, श्री कृष्णा हरी सोनाटे,
0 टिप्पण्या