महाडच्या पहिल्या नगराध्यक्षा स्नेहल माणिकराव जगताप
राजसत्तेतल्या कारभारणी .....महाडच्या पहिल्या नगराध्यक्षा : स्नेहल माणिकराव जगताप
स्नेहल माणिकराव जगताप ... महाडचे एक कल्पक नेतृत्व, धाडसी निर्णय क्षमता घेणारे उमदे व्यक्तिमत्त्व, आणि
माणिकराव जगताप तथा आबाची
राजकारणातली 'सावली; म्हणून ओळखली
जाणारी त्यांची कन्या. याशिवाय अल्पावधीतच
महाड-पोलादपूर-माणगाव या तालुक्यातील जनतेच्या मनामनात घर करणाऱ्या, कार्यकुशल आणि प्रचंड मेहनती वृत्ती असणाऱ्या राजकारणातील कारभारीण....
महाड हे शहर पूर्वीपासून एक व्यापारी
बंदर म्हणून प्रसिद्ध होते. त्यावेळी वीरेश्वर देवस्थानच्या गाडीतळावर
मोठ्या प्रमाणावर व्यापार होत असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली राजधानी रायगड
किल्ला निवडल्यानंतर तर मराठ्यांच्या इतिहासात महाडचे भौगोलिक महत्व अधिक वाढले हा
इतिहास आहे. त्यानंतर तर छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेंब
आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाड शहराला ऐत्याहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीचा इतिहास वारसा लाभत गेला त्यात अधिकाधिक भर
पडत गेली.
महाड-पोलादपूर हा मतदारसंघ हा तसा
राजकीय दृष्ट्या संवेदनशील असा हा मतदारसंघ आहे. पुर्वी महाड - पोलादपूर या
मतदारसंघाची हा "समाजवाद्यांचा" मतदारसंघ अशी ओळख होती. क्रांतिवीर नाना
पुरोहित, मोहन
धारिया, नानासाहेब कुंटे, किशोर पवार,
शांतारामभाऊ फीलसे, अशी समाजवादी नेत्यांनी
नेतृत्व केले आहे. श.बा सावंत, चंद्रकांत देशमुख आणि
माणिकराव जगताप अशी काही
वर्षे काँग्रेसची सोडली तर १९९० नंतर हा "शिवसेनेचा" मतदारसंघ झाला.
अगदी अपवादात्मक परिस्थितीत येथे काँग्रेसला यश मिळाले. महाड विधान सभा मतदार संघ
हा कायम काँग्रेस विरोधी विचारांचा राहिलेला आहे. चंद्रकांत देशमुख, व माणिकराव जगताप यांना
सोडले तर पुन्हा कधी या मतदार संघांत यश मिळविता आले नाही. एकदा तर सम-समान मत
झाल्यामुळे चिठ्ठीवर टाकून इथला आमदार निवडला गेला होता.
गेली पंधरा वीस वर्ष या प्रतिकूल मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा हातात घेऊन माणिकराव जगताप उभे होते. महाड तालुक्यातील वेगवेगळ्या जिल्हा परिषद मतदारसंघातून ते तीन वेळा यापूर्वी निवडून आले आहेत. २००४ चा अपवाद सोडला तर विधानसभा निवडणुकीत यश त्यांना हुलकावणी देत राहिले आहे. पण त्यांनी जिद्द सोडली नव्हती, एकदा एखाद्या उमेदवाराचा पराभव झाला किंवा तो निवडणुकीच्या राजकारणातून थोडा बाजूला झाला तर कार्यकर्त्यांचा ओघ कमी होत जातो. पण काळाच्या ओघात जेव्हा 'माजी' हा शब्द राजकारण्यांच्या मागे जेव्हा लागतो तेव्हा प्रवाहापासून माणसे दुर होत जातात, माणसांच्या गर्दीला ओहोटी लागते पण माणिकरावांना जनतेचे निर्व्याज्य प्रेम सतत लाभत आले होते. अशा प्रभावशाली राजकारण्याच्या घरी जन्माला आलेल्या स्नेहलजींना राजकारणाचे बाळकडू घरूनच मिळाले. माणिकराव जगताप यांच्या त्या सुविद्य कन्या. महत्वाच्या चर्चेसाठी घरी येणाऱ्या राजकारणातील मान्यवरांचा सहवास मिळाला त्यातूनच त्यांचे राजकीय शिक्षण झाले.शिक्षण होईपर्यंत स्नेहलताई राजकारणापासून दूरच राहिल्या. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी मुंबईतील शारदाश्रम विद्या मंदिर मध्ये माध्यमिक तर कीर्ती महाविद्यालयातून बी.एसी.एल.एल.बी शिक्षण घेतल्यानंतर अलिबागच्या एल.एल.बी. जे.एस. एम कॉलेज मधून पदवी संपादन केली.
मात्र २००९ च्या विधानसभा
निवडणुकीपासून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला महाड शहरात सामाजिक
कार्याला सुरुवात केली. आणि नंतर त्या अनेक सामाजिक आणि राजकीय व्यासपीठावर
दिसू लागल्या. २०१६ मध्ये त्या थेट महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीत उतरल्या आणि मोठा
विजय मिळवला. या विजयानंतर खऱ्या अर्थाने स्नेहलजींच्या
राजकारणाराला सुरुवात झाली.
सर्वांना हसत-खेळत आपलसे करून
मिळून-मिसळून राहणाऱ्या,ऐतिहासिक महाड शहराच विकासात्मक कायापालट करण्याचं स्वप्न उराशी
बाळगणाऱ्या, कर्तृत्व, वकृत्व, नेतृत्व आणि दातृत्वाचं कमालीचं समीकरण असणाऱ्या महाड नगर परिषदेच्या
कार्यसम्राट नगराध्यक्षा म्हणून गेल्या ४ वर्षात स्नेहल माणिक जगताप यांनी
आपला ठसा उमटवला आहे.
महाडच्या १५० वर्षाच्या नगरपालिका
इतिहासात प्रथमच जनतेतून निवडून आलेल्या त्या पहिल्या महिला उमेदवार. आणि
त्यासुद्धा महाराष्ट्रात सर्वात कमी वयाच्या महिला नगराध्यक्ष ठरल्या आहेत. महाड
शहराचा आपल्या कारकिर्दीतला पहिला अर्थसंकल्प मांडताना नगरपालिका निवडणुकीत
प्रचाराच्या काळात महाडकरांना देण्यात आलेल्या जवळपास प्रत्येक आश्वासनाची पूर्तता
अर्थसंकल्पात केली. त्यामध्ये राजमाता जिजाऊ कन्यारत्न योजना (१०लाख),महाडकरांचा विमा
(१५लाख),महाड शहरात वायफाय सुविधा(१५लाख), महिलांसाठी इ टॉयलेट (१५लाख),महाड शहर
सुशोभीकरणासाठी
१ कोटी २५ लाख मंजूर केले. आणि हा
अर्थसंकल्प सादर करताना कोणतीही करवाढ केली नाही. आपल्याला नगराध्यक्षपदाची संधी
मिळाल्यास पाच वर्षात महाड शहराचा कायापालट करण्याची ग्वाही आपण निवडणूक
प्रचाराच्या काळात महाडकरांना दिली होती. त्याची पूर्तता आपण केली आहे असे त्यांच्या
भाषणात त्या म्हणाल्या तेव्हाच महाडकरांना भविष्यात चांगले दिवस येतील हे दिसू
लागले. आणि याची प्रचिती लवकरच आली. नगरपालिकेतील चांगल्या कामगिरीमुळे
अहमदनगरच्या "सह्याद्री समूहाच्या वतीने "सह्याद्री राज्यकर्ता
पुरस्कार-२०१७" गौरविण्यात आले. तर केंद्र आणि राज्य सरकारच्या स्वच्छता
अभियान कार्यक्रमात रायगड जिल्ह्यात प्रथम आणि कोकणात दुसरा क्रमांकावर घेत
शासनाकडून ५ कोटीचे बक्षीस सुद्धा पटकावले. महाड शहरात जनतेला स्वच्छ पाणी पुरवठा
करण्यात यावा यासाठी क्लोरियशन यंत्रणा कार्यान्वियत केली आहे.
राजकारणाचा वारसा असतानाही स्नेहल यांनी स्वबळावर आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. मोठी राजकीय पार्श्वभूमी
असतानाही त्यांनी नेहमीच माणसे जोडण्याचे काम केले. संवेदनशील स्वभावामुळे लोकांचे
प्रश्न वेगाने मार्गी लागावेत यासाठी त्या अनेकदा संबंधितांशी स्वतः संवाद साधतात.
प्रश्न समजून घेत असतात आणि ते तातडीने उपाययोजना होत मार्गी कसे लागतील याच्या
प्रयत्नात राहतात. महाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य व केंद्र शासनाकडून
जास्तीत जास्त निधी उपलब्ध व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी
सांगितले, त्यांचे वडील आणि राजकारणातील 'गॉडफादर' माणिकराव जगताप यांचे नुकतेच कोरोनामुळे
दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्याबद्दल तरुणांमधल्या मोठ्या
वर्गाला त्यांच्याविषयी आकर्षण होते, त्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व पुन्हा एकदा
करावे अशी इच्छा अलीकडे जोर धरू लागली होती. आणि त्यांना संधी मिळाली तर अभ्यासू
वृत्तीने आपले वडील नक्की विकासाच्या दृष्टीने या मतदारसंघात ते बदल घडवून आणतील
असा विश्वास स्नेहलजींना होता. कोणत्याही पदावर नसताना
हा विश्वास जनतेत टिकुन ठेवणं ही माणिकरावांची मोठी जमेची बाजू होती आणि हीच जिद्द
एकदिवस त्याना नव्याने हि संधी मिळवून देण्यासाठी स्नेहलताई
भविष्यात कठोर परिश्रम घेणार होत्या, मात्र नियतीच्या मनात
वेगळेच होते. वयाच्या ५४ व्या वर्षी माणिकरावांनी हे जग सोडले. त्यांच्या निधनाने रायगड जिल्ह्यासह कोकण आणि राज्यात कार्यकर्ते आणि जनतेवर दुःखाचा डोंगर
कोसळला. एक रुबाबदार व्यक्तिमत्त्व, कुशल संघटक,आक्रमक आणि तडाखेबंद वक्तृत्व काँग्रेसने आणि तमाम जनतेने गमावले. कार्यकर्ते दुःखात असताना त्यांच्या कुटुंबावर एवढा मोठा आघात झाला. असे
असताना महाड नगरीच्या नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी वडिलांच्या म्हणजेच माणिकराव
जगतापांच्या निधनाचे दुःख बाजूला सारून स्वतःला सावरत महाडवर आलेले पुराचे
प्रलयंकारी संकट लक्षात घेतले. त्या दुसऱ्याच दिवशी आपल्या कार्यालयात हजर झाल्या.
स्नेहल जगतापांचे आगमन कार्यालयात होताच सर्व अधिकारी वर्ग व तेथे असणारे सर्व लोक
अवाक झाले होते.
(ऑक्टोबर २०२१ मध्ये प्रकाशित झालेला ब्लॉग )
--- रवींद्र मालुसरे
९३२३११७७०४
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा