ACE Co-operative Bank ला ‘बेस्ट बँक अवॉर्ड’
मुंबई (रवींद्र मालुसरे) : एअर इंडिया मधील कर्मचाऱ्यांच्या सुविधांसाठी निर्माण झालेल्या ACE Co-operative Bank Ltd. ला आर्थिक वर्ष २०२५–२६ साठी “पगारदार बँक श्रेणी – बेस्ट बँक अवॉर्ड” हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. यांच्या माध्यमातून प्रदान करण्यात आलेल्या या पुरस्कारामुळे बँकेच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करण्यात येत असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संचालक पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या बँकेच्या या यशाबद्दल .बँकेच्या संचालक मंडळासह अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित सर्व घटकांचे अभिनंदन करण्यात येत आहे. ACE Co-operative Bank Ltd. ला मिळालेला हा पुरस्कार बँकेच्या कार्यपद्धतीतील सातत्य, प्रगती आणि सामूहिक प्रयत्नांची दखल म्हणून पाहिला जात आहे. बँकेच्या विविध स्तरांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या योगदानामुळे हे यश साध्य झाल्याचे त्याचप्रमाणे एअर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज बँकेच्या संचालक मंडळाने बँकेच्या कामकाजात पगारदार कर्मचाऱ्यांच्या हिताच्या विविध बाबींना महत्त्व दिले जात असल्याचे ACE बँकेचे अध्यक्ष श्री राजेश भागवत यांनी सांगितले.
दरम्यान, एअर इंडिया स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून एअर इंडियातील पगारदार कर्मचाऱ्यांच्या एअर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज बँकेशी संबंधित कामकाजाचा उल्लेखही या निमित्ताने करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार तसेच स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मा. श्री. अनिल देसाई आणि सरचिटणीस मा. श्री. प्रदीप मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली समितीच्या माध्यमातून ACE बँकेद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे अध्यक्षांकडून सांगण्यात आले. यावेळी बँकेचे संचालक राजश्री पाटील,कार्यकारी सीईओ वर्षा पटेल, बँक कर्मचारी सुचित्रा म्हात्रे, राजेंद्र पारकर अध्यक्ष राजेश भागवत, उपाध्यक्ष नीलेश लांजेकर, बँकेचे संचालक संतोष मोरे, उमेश सानप,माजी सीईओ दिलीप कान्हेरे, बँक संचालक संदीप जाधव, ऋषेकेश बांडुक उपस्थित होते. “पगारदार बँक श्रेणी – बेस्ट बँक अवॉर्ड” मिळाल्याने ACE Co-operative Bank Ltd. च्या कार्याची अधिकृत पातळीवर दखल घेतली गेल्याची भावना याप्रसंगी सर्वानीच व्यक्त केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी तसेच बँकेशी संबंधित सर्व घटकांचे सर्व कामगारांकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, बँकेच्या उज्ज्वल आणि यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

0 टिप्पण्या