भाऊराव घाडीगावकर यांचा “मोडी लिपी मंथन ग्रंथ" अभ्यासकांसाठी मार्गदर्शक
कोकणातील किर्लोस गावातील परंतु सध्या मुंबईतील श्री. भाऊराव विष्णू घाडीगावकर,
वय ७५ यांचे गोडीलिपी संर्वधनाचे काम पाहिल्यानंतर माणूस अचंबित होतो. लोक त्यांचा
शोध घेत त्यांच्यापर्यंत पोचतात, आपल्याकडील मोडीलिपीतील कागदपत्रे विश्वासाने सोपवितात
आणि ठराविक वेळेतच ते लिप्यंतर करून देत असतात हे अनेक वर्षांपासून चालले आहे. ऐतिहासिक
मोडी लिपीचे सर्वाधिक कागदपत्रांचे लिप्यंतर त्यांनी गरजूना विनामूल्य करून दिले आहेत.
अशा मोडी लिपी अभ्यासक भाऊराव घाडीगावकर यांचे मोडीलिपीतील अत्यंत अभ्यासपूर्ण
"मोडी लिपी मंथन" हे उस मुकतेच प्रकाशित झाले आहे.
वेगवेगळ्या असल्यामुळे, तसेच लेखणी न उचलता सलग जलद गती लिखाणामुळे आंग्लकालीन मोडी लिपीतील दस्त-ऐवज अर्वाचिन असले तरी ती वाचावयास दुर्बोध ठरतात, असे मोडी दस्तऐवज नवशिक्या मोडी अभ्यासकांना मोडी वाचन सरावाच्या अभावामुळे वाचावयास अवघड जाणे स्वाभाविकच आहे. त्यासाठी सराव सातत्याची नितांत आवश्यकता असते, यादृष्टिकोनातून घाडीगावकर यांच्या पुस्तकाची अनुक्रमानिका पाहिली तरी महत्व पटते. (१) फरक (२) काना, वेलांटी, उकार, एकार, ऐकार, ओकार औकार, अनुस्वार आणि विसर्ग यांचा देवनागरी लिपीत समन्वय (३) मोडी लिपीतील अकार, आकार, इकार, उकार, एकार, ऐकार, ओकार औकार, अनुरवार आणि विसर्ग अशी बारा रूपे (४) 'र' ची करामत आणि 'र' ची कामगिरी (५) मोडी लिपीतील शब्द संक्षेप (६) ऐतिहासिक पत्रलेखन (७) विविध कागदपत्रे व त्यांचे विवरण (८) विविध कालगणना (९) विविध पत्र मायने (शिवकालीन, पेशवे कालीन, आंग्ल कालीन) (१०) शिवकालीन पत्रातील कठीण शब्दार्थ (११) मोडी लिपी पत्रातील लेखकांच्या अक्षर लकबी इत्यादी.
मोडी लिपीतील काही अक्षरे एकापेक्षा अनेक प्रकारे लिहिलेली असतात. तसेच काही अक्षरांत विलक्षण साम्य असते, सूक्ष्म भेद असतो. हे सारे बारकावे नवागत मोडी वाचकांच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे तसेच काही शब्द ओळखता येत नसतील तर संबंधित ओळीतील मागचापुढचा संदर्भ जुळवून तर्कज्ञानाने अडलेला शब्द नेमका कोणता असेल हे ओळखायचे असते. महाराष्ट्राच्या काही मातब्बर घराण्यांनी आपल्या पिढ्यान् पिबंधांच्या आर्थिक, महसुली तथा देवस्थानातील मानापानाचे मोडी दस्तऐवज जतन करून ठेवलेले आहेत. तसेच महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकयांच्या घरीदेखिल जमीन खरेदी, विक्रीचे तारण गहाण, कब्जे गहाण, नजरगहाण खते, कर्ज खते अशी करारपत्रे तत्कालीन आंग्ल शासनाच्या मुद्रांक पेपरवर लिहिलेली मोडी कागदपत्रे काही संस्थानिकांच्या कारभारातील त्यांच्या मुद्रांक पेपरवरील विविध मोडी दस्तऐवज, तसेच विविध भागातील जनसामान्यांकडे सुध्दा उपलब्ध आहेत. तसेच इतिहास हा काल्पनिक लिहिणे उचित नाही. तसेच ललित, रंजक किंवा तर्कावर आधारीत गोष्टी लिहू नयेत. अशा काल्पनिक व तार्किक आधारावर लिहिलेल्या इतिहासात वास्तवाचा अभाव असू शकतो. म्हणून वास्तव इतिहास लिहिण्यासाठी अस्सल साधनांचा संदर्भ महत्त्वाचा असतो.
अशी अस्सल व वास्तव स्थिती दर्शविणारी कागदपत्रे बहुतांशी मोडी लिपीत उपलब्ध आहेत. सत्य इतिहास समजण्यासाठी मोडी लिपी अवगत करण्याशिवाय पर्याय नाही. अशा मोडी लिपी कागद पत्रांचा अस्सल आणि अमूल्य ठेवा महाराष्ट्रातील विविध दप्तरखान्यात जतन करण्यात आला असून त्यांचे वाचन होणे गरजेचे आहे. हा ठेवा हजारो मोडी अभ्यासकांची वाट पाहात आहे. सततच्या सरावामुळे मोडी लिपी अभ्यासक मोडी लिपी वाचनात, लिप्यंतर करण्यात प्राविण्य मिळवू शकतात. नवशिके मोडी लिपी अभ्यासक कोणत्या टप्प्यावर कोणत्या प्रकारचे वाचन करताना कुठे अडतील हे घाडीगावकर यांना स्वानुभवाने माहिती असल्यामुळे त्याचप्रकारेत्यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे.
- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
9323117704




0 टिप्पण्या