महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला बळ देणाऱ्या सहकार क्षेत्राची सक्षम वाटचाल! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई येथे आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी संघ व सहकारी महाराष्ट्रद्वारे आयोजित 'सहकार गौरव पुरस्कारां'चे वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे मुख्यमंत्री फडणवीस अभिनंदन करताना मुख्यमंत्री बोलत होते.मुख्यमंत्री पुढे असेही म्हणाले की, राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर करून पुढील 20 वर्षांत देशाच्या 'जीडीपी'मध्ये सहकार क्षेत्राचा हिस्सा 3 पट वाढवण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. 63,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचे डिजिटायझेशन, 5 वर्षांत 2 लाख नवीन ‘पॅक्स’ उभारण्याचा निर्णय, नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड, नॅशनल को-ऑपरेटिव्ह ऑरगॅनिक्स लिमिटेड, भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड, अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आणि केंद्रीय सहकारिता विद्यापीठ अशा विविध उपक्रमांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ मिळत आहे. सहकारी बँकांची कामगिरी कॉर्पोरेट बँकांपेक्षाही चांगली आहे.
२१ व्या शतकात सहकार जिवंत राहील का, कॉर्पोरेट क्षेत्राशी स्पर्धा करू शकेल का, असा प्रश्न अनेकांना पडला होता; परंतु प्रत्यक्षात सहकारी बँकांनी कॉर्पोरेट बँकांपेक्षाही चांगले काम करून दाखवले आहे. सहकारी संस्थांच्या वित्तीय प्रवेशामुळे विकास वेगाने घडत असून, महाराष्ट्रात शेवटच्या शेतकऱ्याला कर्ज पोहोचविण्याचे काम जिल्हा सहकारी बँका करीत आहेत. मुंबईतील मराठी माणसाचे घराचे स्वप्न स्वयं पुनर्विकासामुळे पूर्ण महाराष्ट्रातील सहकारी संस्थांपैकी ४० ते ४५ टक्के संस्था या सहकारी गृहनिर्माण संस्था असून हा घटक दीर्घकाळ उपेक्षित राहिला होता. मात्र आता सहकार कायद्यात गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र अध्याय तयार करण्यात आला आहे. या आधारावर स्वयं पुनर्विकास योजना तयार करून सहकारी सोसायट्यांना स्वतःच्या पुनर्विकासाचे अधिकार देण्यात आल्याने अनेक कुटुंबांचे मोठ्या घराचे स्वप्न पूर्ण होत आहे.
मुंबईतील मराठी माणसाचे घराचे स्वप्न स्वयं पुनर्विकासामुळे पूर्ण होत असून ४०० चौरस फुटांवरून १००० चौरस फुटांमध्ये राहायला जाणारे सभासद पाहून होणारा आनंद अवर्णनीय आहे. विद्यमान प्रकल्पांना अर्थसाहाय्य वाढविण्यासाठी सहकारी बँकांनी हजारो पेंडिंग प्रकल्पांना मदत करावी, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. तसेच 'युडीसीपीआर'मधील अडचणी दूर करून मुंबईबाहेरील सहकारी गृहनिर्माण संस्थांनाही स्वयं पुनर्विकास प्रक्रियेत सामावून घेता येईल. गावातील सहकारी पतपेढी, सहकारी बँक सामान्य नागरिकांना आपली वाटते. लोकाभिमुखता आणि वित्तीय प्रवेश ही सहकाराची ताकद आहे. जिल्हा सहकारी बँकांचे संचालक लोकशाही प्रक्रियेतून निवडले जात असल्याने त्यांची सामान्य शेतकऱ्याशी बांधिलकी असते. व्यावसायिक आणि राष्ट्रीयीकृत बँकांनीही अशी बांधिलकी जपावी असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि सहकारी महाराष्ट्र यांच्या वतीने आज आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. सहकार महर्षी पुरस्कार- विद्याधर अनास्कर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक, सहकार भूषण पुरस्कार- आमदार विनय कोरे,
सहकार रत्न पुरस्कार- डॉ. रेवती पैठणकर,
सहकार गौरव पुरस्कार- दीपक पटवर्धन,
सहकार महिला शक्ती पुरस्कार- शोभा सावंत, सहकार विभूषण पुरस्कार- शिवाजीराव नलावडे,
सहकार प्रेरणा पुरस्कार- शहाजी पाटील व राजेश लवेकर,
आत्मनिर्भर हौसिंग पुरस्कार- सिद्धार्थ कांबळे, प्रकाश दरेकर व श्रीकांत कवठणकर,
सहकार ग्रामविकास पुरस्कार- डॉ. नामदेव उसेंडी,
सहकार उत्कृष्ट बँकिंग पुरस्कार- राजेंद्र सरकाले,
सहकार कृषी रत्न पुरस्कार- संजय राणे, सचिन देशमुख-पारवेकर,
दूध उत्पादक व सेवा सोसायटी पुरस्कार- विजय काळे व गोकुळ राजपूत,
सहकार समाजसेवा पुरस्कार- चंद्रकांत पाटील,
सहकार नेतृत्व पुरस्कार- अशोक जगताप,
आदर्श सहकारी पतसंस्था पुरस्कार- व्ही. जी. पवार (ज्ञानदीप पतसंस्था),
सहकार उद्योग पुरस्कार- ऑल्डीन वसईकर,
सहकार परिवर्तन पुरस्कार- दशरथ घनवट,
युवा व ग्राहक पुरस्कार- रोहित निकम व विठ्ठलराव भोसले यांना यावेळी सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांचा आणि मान्यवरांचा राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे चे अध्यक्ष आणि आमदार श्री प्रवीण दरेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून आजच्या कार्यक्रमा संदर्भात प्रास्ताविक केले.
या प्रसंगी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, उद्योग मंत्री उदयजी सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभातजी लोढा, सहकार व गृहनिर्माण राज्यमंत्री पंकजजी भोयर, मुंबई बँकेचे संचालक व आमदार प्रसादजी लाड, वारणा सहकार समूहाचे अध्यक्ष व आमदार विनयजी कोरे, आ. अभिजितजी पाटील, आ. चित्राताई वाघ, आ. राहुलजी आवाडे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधरजी अनास्कर, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थजी कांबळे, राज्य सहकारी संघाचे संचालक शिवाजीराव नलावडेजी , मुंबई विभागीय सहनिबंधक शहाजी पाटीलजी, मुंबई बँकेचे संचालक नंदकुमारजी काटकर, पतसंस्था फेडरेशनचे संचालक वसंतराव शिंदेजी, राज्य सहकारी संघाचे माजी अध्यक्ष अशोकजी जगताप, ग्राहक सहकारी संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव भोसलेजी, मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष रोहितजी निकम, मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाशजी दरेकर, रायगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. यश प्रवीण दरेकर यांसह राज्य सहकारी संघाचे संचालक मंडळ उपस्थित होते.
रवींद्र मालुसरे
अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ९३२३११७७०४
0 टिप्पण्या