उद्यापासून २०२६ वर्षाला सुरुवात ...
..बघता बघता वर्ष संपले ...
हे वर्ष कसे गेले ते कळालेच नाही... असो, मला लेखणीची आवड असल्याने मी त्याची नोंद करून ठेवली आहे ... ते संपणारच होते... संपलेल्या वर्षाला दुःखाची किनार आहे. अगदी जवळची नातेवाईक, वषानुवर्षाचे मित्र हे जग सोडून त्याचबरोबर अनेक चांगल्या गोष्टी घडल्या, काही नवीन गोष्टीना सुरुवात करता आली. त्यातल्या काही पूर्णत्वास गेल्या. जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या संपूर्ण वर्षात मी नेहमीप्रमाणे माझ्या परीने माझ्या आवडीच्या क्षेत्रात कार्यरत राहिलो. समाजमाध्यमांवर आणि प्रत्यक्ष वर्तमानपत्रातून लिहीत राहिलो, काही नवीन कार्यक्रम यशस्वी करू शकलो, मानसन्मान मिळाले, आपण या वर्षात सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात या बद्दल मी तुमचा आभारी आहे.....तुमचे प्रेम राहू द्या..
आपणास व आपल्या परिवारास येणाऱ्या नविन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा !
८ जानेवारी २०२५ - दादर सार्वजनिक वाचनालयात मराठी भाषा पंधरवडा साजरा
१२ जानेवारी २०२५ - अंबरनाथमध्ये सुवर्णामृतधारा
३० जानेवारी २०२५ - लक्ष्मण उतेकरांचा छावा इतिहास घडवणार लेख प्रकाशित
४ फेब्रुवारी २०२५ - मुंबई कांदिवली येथे सुभेदार तानाजी मालुसरे पुण्यतिथी साजरी केली. शाखाप्रमुख विजय मालुसरे, तालुकाप्रमुख अनिल मालुसरे यांनी कार्यक्रम चांगला पार पाडला. भारतीय सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
११ फेब्रुवारी २०२५ - लक्ष्मण उतेकर .... प्रवास जिद्दीचा, संघर्षाचा, यशाचा
२३ फेब्रुवारी २०२५ - सुभेदार तान्हाजी मालुसरेंच्या मुलुखातील इतिहासाच्या पाऊलखुणा लेख प्रकाशित
२७ फेब्रुवारी २०२५ - मराठी भाषा दिवस कार्यक्रम - पुढारीचे मुख्य संपादक सचिन परब, एकनाथ आव्हाड, कामगारनेते दिवाकर दळवी,
१ एप्रिल २०२५ - विमानतळ विभागाचे एसीपी (सहाय्यक पोलीस आयुक्त) राजेंद्र आव्हाड यांचा माझ्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी दत्ताराम घुगे, दादर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काकड साहेब
२५ एप्रिल २०२५ - आमच्या साखर गावातील पुरातन आई नवलाई मंदिराचे भव्य उदघाटन
१४ मे २०२५ - अचाट धैर्य,अजोड पराक्रम,असामान्य शौर्य गाजवणारे रणधुरंदर,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
१२ मे २०२५ - आठ हजार मुलींचा बापमाणूस ... डॉ. हेमंतराजे गायकवाड
१५ मे २०२५ - वीरपुत्र प्रसवणारी भूमी फौजी आंबवडे
२५ मे २०२५ - उतेकर कुळाचा इतिहास
२ जून २०२५ - पोलादपूर तालुक्यातील इतिहास पुत्रांनो संघटीत व्हा !
३ जून २०२५ - ज्येष्ठ रंगकर्मी स्व.अजित भगत स्मृती दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतो.
४ जून २०२५ - शुभमंगल ....पण सावधान ! पोलादपूर तालुक्याच्या रीतिरिवाज परंपरा
१३ जून २०२५ - वरळी नाका येथील आचार्य अत्रे यांच्या स्मृतिदिनी उपस्थित राहिलो.
१४ जून २०२५ - पोलादपूरचे प्रतिभावान साहित्यिक, नाट्यलेखक प्रल्हाद जाधव
१५ जून २०२५ - पोलादपूर तालुका स्नेहसंमेलन २०२५ घाटकोपर येथे संपन्न मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार प्रवीण दरेकर, लक्ष्मण उतेकर, प्रल्हाद जाधव, सुभाष पवार, किशोर जाधव आणि वारकरी, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित होते.
५ जुलै २०२५ - प्रभादेवी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी प्रभादेवी सोहळा
७ जुलै २०२५ - मराठी अभ्यास केंद्राच्या आझाद मैदानातील मराठी भाषा धरणे आंदोलनात सहभाग
८ जुलै २०२५ - श्री. बबनराव पाटील यांनी संपादित केलेला श्री विठ्ठल यांच्या विषयीचा ग्रंथ भेट दिला.
१० जुलै २०२५ - माझ्या ६० व्या वाढदिवसानिमित्त रविंद्रायन या इ बुकाचे प्रकाशन
१३ जुलै २०२५ - श्री ज्ञानपीठ इंटरनॅशनलच्या वतीने शिवाजी मंदिर येथे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक संशोधक प्रवीण भोसले आणि डॉ हेमंतराजे गायकवाड यांच्या हस्ते सुभेदार तानाजी मालुसरे पुरस्कार देऊन माझा सत्कार झाला.
९ ऑगस्ट २०२५ - श्री ज्ञानपीठ इंटरनॅशनलच्या वतीने पुरस्कार मिळाला त्यामुळे रानवडी ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार केला.
१३ ऑगस्ट २०२५ - वरळी नाका येथील आचार्य अत्रे यांच्या जयंती दिनी उपस्थित राहिलो.
२२ ऑगस्ट २०२५ - मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वृत्तपत्र लेखक दिनाच्या दिवशी माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानी कार्यक्रम
२२ ऑगस्ट २०२५ - प्रेरक शिल्पकार या मी संपादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन
२७ ऑगस्ट २०२५ - जाखडी नाच - कोकणचे सांस्कृतिक संचित
२९ ऑगस्ट २०२५ - माटुंगा येथील जीएसबीचा गणपती भारतातील सर्वात श्रीमंत गणपती लेख प्रकाशित
१ सप्टेंबर २०२५ - माझ्या पोलादपूर अस्मिता या ब्लॉगने ७०००० वाचकसंख्या गाठली. आता ८० हजारपर्यंत पोहोचली आहे.
८ सप्टेंबर २०२५ - श्री गणेशाचे मंगलमय स्मरण करूया लेख प्रकाशित
१५ सप्टेंबर २०२५ - विक्रोळी येतेच पाक्षिक आदर्श मुंबईच्या वर्धापन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतो.
१६ सप्टेंबर २०२५ - नरवीर तान्हाजी-सूर्याजी मालुसरे यांच्या साखरगावात निवृत्त सैनिक पंढरीनाथ मालुसरे यांचा सत्कार
२२ सप्टेंबर २०२५ - "दशावतार" प्रेक्षक भावनाविवश होत भानावर येतोय.... तो ताळ्यावर येणे गरजेचे!
२७ सप्टेंबर २०२५ - दादर येथे "रुग्णसेवा हीच खरी सेवा साधना मानणाऱ्या आणि अनेक दशकं ग्रामीण व शहरी कुष्टरोग निवारण आणि रुग्णसेवेसाठी झटणारे, देशा-परदेशात कॉन्फरन्समध्ये सहभागी होणाऱ्या पद्मश्री डॉ. विजयकुमार डोंगरे यांचा जीवनप्रवास आणि असामान्य कार्यावर आधारित ३५ मिनिटांचा लघुपट “सेवाव्रती” चा विशेष प्रीमियर शो निमंत्रितांसाठी मोफत आयोजित केला होता.
२८ सप्टेंबर २०२५ - ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथील श्रद्धांजली सभेत सहभागी झालो.
२ ऑक्टोबर २०२५ - श्रीक्षेत्र आळंदी येथे श्री ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन
९-१० ऑक्टोबर २०२५ - अक्कलकोट आणि जत येथील बाबासाहेब गावडे मराठा मंदिर शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांना कार्यक्रमानिमित्त भेट दिली, यावेळी श्री स्वामी समर्थ मंदिर, अमोलराजे भोसले, राजवाड्याचे पुरातन संग्रहालय, जत येथील शिक्षण संस्था यांना भेट दिली
१५ ऑक्टोबर २०२५ - मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या सुवर्ण महोत्सवी दिवाळी अंक स्पर्धेला सुरुवात.
१६ ऑक्टोबर २०२५ - मराठीच्या भल्यासाठी चला दिवाळी अंक परंपरा जपूया उपक्रमाला सुरुवात केली.
१६ ऑक्टोबर २०२५ - मराठीच्या भल्यासाठी दिवाळी अंक परंपरा जपूया लेख प्रकाशित
२७ ऑक्टोबर २०२५ - माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची पनवेल येथे भेट घेऊन म्हसळा टाइम्स या दिवाळी अंकाचे प्रकाशन केले.
२ नोव्हे २०२५ - डोंबिवली येथे आम्ही डोंबिवलीकर या संस्थेच्या कार्यक्रमात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत सहभागी झालो.
४ नोव्हेंबर २०२५ - मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने अभिजात मराठी भाषा चला ज्ञानभाषा करूया या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील साहित्यिकांशी संपर्क साधला.
१० नोव्हे २०२५ - विद्यार्थी उत्कर्ष मंडळ चिंचपोकळी या संस्थेत मोडी लिपी वर्गात शिकण्यासाठी दाखल झालो.
२९ नोव्हेंबर २०२५ - जागल्यांचा दिपस्तंभ : आदरणीय चंद्रकांत पाटणकर
१ डिसेंबर २०२५ - श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनलच्या वतीने शिवोत्सव उपक्रमाला सुरुवात केली.
६ डिसेंबर २०२५ - दादर येथील चैत्य भूमी आणि शिवाजी पार्कला ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली सोबत विजय ना कदम होते.
३ डिसेंबर २०२५ - श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनलच्या वतीने मोडी लिपीराज्यस्तरीय निबंध स्पर्धा सुरु.
१६ डिसेंबर २०२५ - ज्येष्ठ शिवसैनिक राजा जाधव यांच्या "दादर ते दादर" या पुस्तकाचे प्रकाशन
२५ डिसेंबर २०२५ - अटलबिहारी वाजपेयी लेखक
२९ नोव्हेंबर २०२५ - ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक चंद्रकांत पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी गौरवग्रंथाचे संपादन
१३ डिसेंबर २०२५ - पाणीदार डोळ्यांची सशक्त अभिनेत्री स्मिता पाटील
३१ डिसेंबर २०२५ - माझ्या बोलीभाषेची महानता आणि मराठी भाषेतील योगदान या विषयावर राज्यस्तरीय लेख स्पर्धा.
आज, पश्चिमेस मावळणारा सूर्य तोच असेल. त्या दिशेला फुटणाऱ्या सोनेरी रंगछटाही वेगळ्या नसतील. समुद्रकिनारी पाण्यात बुडणारा सूर्याचा तो गोळाही नेहमीचाच असेल... पण उद्या संध्याकाळी मात्र, ते पश्चिमरंग मनामनावरही काही वेगळ्याच रंगछटा उधळून मावळणार आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच्या वर्तमानपत्रांत, आपल्या सर्व रंगछटांचे विभ्रम उधळणाऱ्या छायाचित्रासह पहिल्या पानांवर झळकणार आहे, आणि ते न्याहाळताना, नकळत मन मागे सरलेल्या मावळलेल्या वर्षात जाऊन घुटमळणार आहे...
हे नक्कीच घडणार आहे. खरं म्हणजे, काळ दोनच असतात. भूतकाळ, तो स्पष्टपणे अनुभवता आलेला असतो. आणि, वर्तमानकाळ आपण प्रत्यक्ष अनुभवत असतो. भविष्यकाळ ही एक संकल्पना आहे. तो अनुभवता येत नाही. वर्तमानकाळच क्षणाक्षणाने भविष्यकाळाकडे सरकत जातो, तेव्हा भविष्यकाळातील गाठलेल्या प्रत्येक क्षणाचे रूपांतरही वर्तमानकाळातच होत असते. तरीदेखील आपण भूतकाळातील रम्य क्षणांच्या आठवणींचे गाठोडे सोबत घेऊन, न अनुभवता येणाऱ्या भविष्यकाळाकडे वाटचाल करतच असतो.
आज दिवस मावळला, की आपण नव्या भविष्यकाळाकडे वाटचाल करणार आहोत. नवे वर्ष सुरू होणार या जाणिवाच आज अनेकांची मने उत्फुल्ल करत असतील. नव्या वर्षाच्या स्वागताचे क्षण साजरे करण्याचे ज्याचे त्याचे संकल्प आखूनही झालेले असतील.
गेल्या वर्षभरात समाजमाध्यमांनी मने जोडण्याचे मोठे काम पार पाडले असे मी माझ्या भूमिकेवरून मानतो. गेल्या वर्षभरात समाजमाध्यमांचा वापर प्रचंड वाढल्याचे निरीक्षण नोंदविले गेले आहे. या माध्यमाने माझ्या मनांना उभारी दिली, दिलासाही दिला. खरे तर, रोजचा दिवस हा काही शुभेच्छा वगैरे देण्यासारखा खास नसतो. पण समाजमाध्यमांनी मनांची ही संकुचितता पार बदलून टाकली.
समाजमाध्यम नसते, तर ‘शुभ सोमवार’ असे म्हणणारा कुणी प्रत्यक्षात भेटला असता, असे मला वाटत नाही. या माध्यमाने प्रत्येक दिवसाला सणाचा साज चढविला, आणि दुःखाच्या प्रत्येक क्षणाला आधाराचा हातही दिला, असे मला वाटते.उद्या नववर्षाच्या पहिला क्षणाला समाजमाध्यमांवरच शुभेच्छा संदेशांचा वर्षावही सुरू झालेला असेल. ओळखीच्या, अनोळखीतील, सारेजण एकमेकांना शुभेच्छा देऊन नव्या वर्षातील अनोळखी भविष्यकाळास सामोरे जाण्याची हिंमत देतील. ‘ते वर्ष आपले नाही’, असेही काहीजण आवर्जून म्हणतील. पण प्रत्येक क्षणाला मागे टाकून नव्याने येणारा नवा क्षण आपला की परका, हे आपण कुठे पाहात असतो. तो प्रत्येक क्षणच आपला असतो. मग अशा क्षणांचे गाठोडे घेऊन येणारे नवे वर्षही आपलेच असते... त्यासाठी शुभेच्छा हव्यातच...
म्हणूनच, नव्या वर्षाच्या पहिल्या क्षणी येणाऱ्या शुभेच्छांच्या गर्दीत, आमचीही तुम्हा सर्वांसाठी एक शुभेच्छा...
नवे वर्ष तुम्हा सर्वांना आनंदाचे, मनोबलाचे, सुखाचे जावो...


























.jpg)




























0 टिप्पण्या