Ticker

6/recent/ticker-posts

बबन शेलार टॉक शो दिवाळी अंक

बबन शेलार टॉक शो दिवाळी अंक

पोलादपूर तालुक्यात ग्रामीण भागातील वाडीवस्तीवर पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार बबन शेलार यांनी "बबन शेलार टॉक शो दिवाळी अंक" या नावाने पहिला दिवाळी अंक यंदा दिवाळी निमित्ताने प्रकाशित केला आहे. नात्यागोत्यातील स्थानिक व्यक्तींचा तालुक्याच्या राजकारणात वाढलेला हस्तक्षेप, सरकारी बाबुंच्या आशीर्वादाने ठेकेदारांचा विकास कामातील वाढता भ्रष्टाचार पाहाता   एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी पत्रकारिता करणे किती जिकिरीचे झाले आहे हे मुंबई-पुण्यातील अग्रगण्य दैनिकांच्या संपादकांना सुद्धा अलीकडे लक्षात येत आहे. त्यात जुनी पत्रकारिता आणि अलीकडची टेक्नो पत्रकारिता यांचे स्वरूप अमूलाग्र बदलले आहे.  वयाची पंचाहत्तरी पार केलेल्या शेलारांना तालुक्याचा इतिहास- भूगोल चांगला माहिती आहे. तालुक्यातील अनेक घडामोंडीचे ते साक्षीदार आहेत. त्यामुळे तालुक्यातील लेखक-पत्रकारांकडून त्यांनी याच विषयांवर लिहून घेतले आहे. त्यामुळे हा छोटेखानी अंक तालुक्यातील लोकांच्या जिव्हाळ्याचा ठरणार आहे. तालुक्यातील भौगोलिक परिस्थितीचा वेध घेत ते संपादकियात लिहितात, उजडा हुआ गुलशन है रोता हुआ माली है | 

कालपरवा पर्यंत कसं गाव गाड्याचे व्यवहार व्यवस्थित चालले होते पाऊसही वेळेच्या आधी सुरु झाला होता, बळीराजा शेतीच्या

कामात गुंतला होता अशातच कोपलेल्या पावसाने उगारलेल्या आसुडाने होत्याचे नव्हते केले. पाऊस आपले दान भरभरून शेतकऱ्याच्या झोळीत टाकतो आणि खुशहालीचा संदेश देत, बळीराजाचा निरोप घेत असतो आणि ऋतुचक्राप्रमाणे दिवाळीच्या मंगलमय घर धनधन्याने भरलेले शेतकरी राजा आनंदात असतो या धनलक्ष्मीमुळे त्याचे घर चालत असते

निर्सगाने शेतकऱ्याला अशी कि दिली त्याचे सर्वस्व हिरावून घेतले या पावसाळ्यात पाऊस उघळलेल्या बैलासारखा कोणाचीही तमा न बाळगता सैरभैर झाला होता, ज्या भागात पाऊस सुरु झाला त्या भागात विध्वंस करूनच थांबत होता. त्याने घातलेल्या धुमचक्रीमध्ये अनेक गावांमध्ये शेतपीक, फळपीक, बंधारे, रस्ते, घरे, पूलांचे नुकसान केले आहे अनेक ठिकाणी पशुधनाची हानी झाली आणि त्याचा बहरलेला बगीचा त्याने रंगवलेली स्वप्ने माती मोल झाली. शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकटांचे अनेक आघात सहन केले असून शेतकरी राजा पुन्हा नव्या उमेदीने उभा राहिल्याचे वास्तव आहे. डोंगर रांगा आणि दऱ्यांखोऱ्यांनी व्यापलेला हा तालुका निसर्गाच्या अवकृपेचा शिकार सातत्याने गेली काही वर्षे होतो आहे. त्याचे प्रतिबिंब संपादक या नात्याने त्यांनी सुंदररित्या शब्दबद्ध केले आहे. त्याचप्रमाणे पोलादपूर तालुक्याला ऐत्याहासिक आणि वारकरी परंपरा आहे. याबाबतीत अभ्यासपूर्ण लेखांची मांडणी त्यांनी केली आहे. वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारे लेख पुढील प्रमाणे आहेत.  

(१) स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना....डॉ. प्रभाकर गणपत गावंड ) 

(२) आठवणीतील केदारनाथ धाम- सौ. मंजुळा म्हात्रे (पत्रकार)

(३) व्यवसाय शेती आणि मी- रामदास सकपाळ कापडे बुद्रुक 

(४) दिव्य सोहळा पाहनी डोळा देह हा माऊली माऊली व्हावा  (ह भ प बाळकृष्ण गणपत पवार)

(५) दुधावरची साय - अरुणा भागवत

(६) पोलादपूर तालुक्यातील श्री गुरुपरंपरा || गुरुवंदन ।। - रवींद्र मालुसरे

(७)  देवळे शिवमंदिर भक्तांचे श्रद्धास्थान- प्रकाश कदम

(८) आधी लगीनकोंडाण्याचे- बबन शेलार

(९) उत्तुंग व्यक्तीत्व -राजा ढाले (मा. विनोद साळवी यांचे कडून साभार अरुण वाघ)

(१०) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एका साधनेची शतकपूर्ती. - डॉ. समीर दत्तात्रय साळुंके

संपादक : बबन शेलार (भोगाव)

संपर्क - ८०८०८४०२०८

शब्दांकन - रवींद्र मालुसरे 

अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या