शिवकालीन रणरागिनी : निबंध लेखन स्पर्धा आणि फोटोग्राफी स्पर्धा २०२५
श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल) संस्था आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात अनेक तेजस्विनी स्त्रियांनी समाज, कुटुंब, युद्धनीती, राज्यकारभार आणि संस्कृतीमध्ये अतुलनीय योगदान दिले. या स्त्रीशक्तीचा अभ्यास, जागर आणि अभिमान व्यक्त व्हावा, यासाठी आम्ही एक राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करत आहोत.
🔸 स्पर्धेचा विषय: शिवकालीन रणरागिनी
🔸 निबंध पाठवण्याची अंतिम तारीख: २५ ऑगस्ट २०२५
विद्यार्थी, अभ्यासक, गृहिणी, लेखक आणि साहित्यप्रेमींना या स्पर्धेत सहभागी होण्याचे मन:पूर्वक आमंत्रण.
📜 स्पर्धेची नियमावली:
१. निबंधाचा विषय: शिवकालीन रणरागिणी
२. भाषा: फक्त मराठी
३. शब्दमर्यादा: १००० ते १५०० शब्द
४. निबंध पूर्णतः स्वतःचा असावा; कुठल्याही प्रकारचे अनुकरण (plagiarism), कॉपी-पेस्ट आढळल्यास निबंध स्पर्धेबाह्य ठरेल.
५. प्रत्येक स्पर्धक फक्त एकच निबंध पाठवू शकतो.
६. निबंध पाठवण्याचे स्वरूप:
- Microsoft Word (.doc/.docx) किंवा PDF फाईल स्वरूपात
- WhatsApp वर पाठवताना देवनागरी लिपीत टंकलिखित ‘टेक्स्ट स्वरूपात’ पाठवावा
- हस्तलिखित प्रत, फोटो, स्कॅन केलेली प्रत किंवा इमेज स्वरूपातील निबंध ग्राह्य धरले जाणार नाही.
७. निबंध पूर्वी कुठेही प्रकाशित किंवा स्पर्धेत सादर केलेला नसावा.
८. प्रवेश शुल्क नाही. स्पर्धा सर्वांसाठी विनामूल्य आहे.
९. स्पर्धा खुल्या गटात होणार आहे.
१०. निबंधासोबत खालील माहिती अनिवार्यपणे पाठवावी:
- संपूर्ण नाव
- वय व वयोगट (जन्मतारीख) – विजेत्यांना आधारकार्ड सादर करावे लागेल
- शिक्षण / व्यवसाय
- संपूर्ण पत्ता
- मोबाईल क्रमांक (WhatsApp)
- ई-मेल (असल्यास)
११. निबंध पाठवण्याची अंतिम तारीख: २५ ऑगस्ट २०२५ (रात्री ८ वाजेपर्यंत)
१२. निबंध पाठवल्यानंतर २४ तासांत सहभागाची पुष्टी WhatsApp/E-mail वर मिळेल. न मिळाल्यास कृपया संपर्क साधावा.
१३. पोस्टाने पाठवण्याची गरज असल्यास, आयोजकांशी आधी संपर्क साधावा. पोस्टाने पाठवलेले निबंध अंतिम तारखेपूर्वी पोहोचले पाहिजेत.
१४. मूल्यांकन निकष:
- ऐतिहासिक सुसंगतता
- सृजनशीलता व विषयमांडणी
- भाषाशुद्धता व स्पष्ट अभिव्यक्ती
- अभ्यासपूर्ण दृष्टिकोन
१५. मूल्यमापन समिती:
- स्पर्धेचे परीक्षण मान्यवर इतिहास अभ्यासक, मराठी लेखक व शिक्षणतज्ज्ञांच्या समितीमार्फत पारदर्शक पद्धतीने केले जाईल.
- समितीची यादी निकालाच्या वेळेस जाहीर केली जाईल.
- परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.
१६. बक्षीसे व सन्मान:
प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना अनुक्रमे रोख पारितोषिक ५०००/–, ३,०००/– आणि २,०००/– दिले जाईल.
- परीक्षकांना योग्य वाटल्यास दोन उत्तेजनार्थ क्रमांक निवडले जातील, मात्र त्यांना रोख पारितोषिक दिले जाणार नाही.
१७. निवडक निबंधांचे विशेष प्रकाशन केले जाईल.
१८. कार्यक्रमाला उपस्थित असतील त्या सहभागी स्पर्धकांना व्यासपीठावर आदरपूर्वक सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. उर्वरित सर्व सहभागी स्पर्धकांना स्पर्धेनंतर १५ दिवसांत WhatsApp किंवा ई-मेलद्वारे डिजिटल स्वरूपात पाठवले जाईल.
१९. पारितोषिक वितरण समारंभ: १५ सप्टेंबर २०२५ रोजी, मुंबई येथे पार पडणार आहे.
- ठिकाण व वेळ लवकरच कळवण्यात येईल.
२०. निकाल जाहीर करण्याची तारीख: ५ सप्टेंबर २०२५
२१. निबंध स्पर्धेबाह्य ठरण्याची कारणे (अयोग्यता):
- अपूर्ण / चुकीची माहिती
- अनुकरण किंवा Plagiarism
- चुकीचे स्वरूप (फोटो, इमेज, हस्तलिखित इ.)
- विषयाचे उल्लंघन / मर्यादा न पाळणे
२२. निबंधाचे साहित्य वापर / अधिकार:
- आयोजक निबंधांचा वापर त्यांच्या संकेतस्थळ, प्रकाशन किंवा सामाजिक माध्यमांवर लेखकाचे नाव नमूद करून करू शकतात.
- साहित्य हक्क आयोजकांकडे राहतील.
✉️ निबंध पाठविण्याची माहिती:
📧 ई-मेल: marathisahityavkalaseva@gmail.com
📱 WhatsApp क्रमांक: ९९८७७४६७७६
(फक्त Word / PDF फाईल किंवा देवनागरी लिपीत टंकलिखित टेक्स्ट स्वरूपातच पाठवा)
📌 ई-मेल / WhatsApp च्या विषय ओळीत लिहा: "निबंध स्पर्धा – [तुमचे पूर्ण नाव]"
आपल्या अभ्यासपूर्ण, संवेदनशील आणि प्रभावी लेखणीतून शिवकालीन तेजस्विनी स्त्रीशक्तीचे यथार्थ चित्रण करा आणि या ऐतिहासिक विषयाला अभिव्यक्तीचे सामर्थ्य द्या.
आयोजक मंडळ
श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल) संस्था
मराठी साहित्य व कला सेवा
श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल)
आयोजित ~ फोटोग्राफी स्पर्धा २०२५
“गडकोटांचे सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करा!”
श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल) तर्फे फोटोग्राफी स्पर्धा २०२५
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आणि छायाचित्रकारांना प्रेरणा देण्यासाठी श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल) संस्थेच्या वतीने "गडकोट फोटोग्राफी स्पर्धा २०२५" चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी दोन वेगवेगळ्या कल्पना पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आल्या आहेत “युनेस्को हेरिटेज १२ किल्ले” आणि “महाराष्ट्रातील इतर किल्ले". या माध्यमातून छायाचित्रकारांना ऐतिहासिक गडकोटांचा भव्यतेसह गौरव करण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेची थीम:
१) युनेस्को हेरिटेज १२ किल्ले
0 टिप्पण्या