रंगधर्मी अजित भगत : नाट्यविद्यापीठ आणि प्रायोगिक नाटकाचे शेवटचे भीष्माचार्य - रवींद्र मालुसरे

रंगधर्मी अजित भगत : नाट्यविद्यापीठ आणि प्रायोगिक नाटकाचे शेवटचे भीष्माचार्य

- रवींद्र मालुसरे

मुंबई (प्रतिनिधी ) : मराठी प्रायोगिक रंगभूमीच्या पायाचे जे काही घट्ट दगड इतिहासात होऊन गेले त्यातला एक पायरीचा दगड...म्हणजे अजित भगत. दादरच्या आविष्कार मध्ये म्हणजे छबिलदास शाळेचा दुसऱ्या मजल्यावर जी आधाराची वा हक्काची आपली वाटावी अशी जी माणसे त्यात अरुण काकडे सर, सीताराम कुंभार आणि  अजित भगत सर होते, मात्र त्यापेक्षा ज्या रंगभूमीची धूळ आपण गुलालासारखी कपाळाला लावली त्या पायरीचा आपण अविभाज्य भाग आहोत ह्याचा अभिमान मला जास्त महत्वाचा आहे असे भगत सर स्वतःला समजत असत. अजित भगत यांच्या निधनाने प्रायोगिक नाटक 'जगणारे रंगधर्मी', चालते बोलते नाट्यविद्यापीठ'. प्रायोगिक नाटकाचे 'शेवटचे भीष्माचार्य' आपल्यातून कायमचे विंगेत गेले आहेत असे भावपूर्ण उदगार रवींद्र मालुसरे यांनी काढले. 

श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान मुंबई आयोजीत नाट्यतपस्वी अजित भगत स्मृती जागर नुकताच यशवंत नाट्य मंदिरच्या मिनी थिएटर मध्ये नुकताच साजरा झाला त्यावेळी मालुसरे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. नाट्यचळवळीसाठी गेली ४० वर्षे निःस्वार्थीपणे विघ्नहर्ता प्रतिष्ठान जे प्रशंसनीय काम करीत आहे त्याचे कौतुक ज्येष्ठ लेखक आणि प्रकाशक डॉक्टर सुनील सावंत यांनी  आपल्या भाषणात केले. तर ज्येष्ठ रंगकर्मी चेतक घेगडमल यांनी प्रायोगिक नाट्य चळवळीसाठी अजित भगत यांनी दिवसरात्र केलेली मेहनत आणि त्यांच्या अनेक आठवणी आपल्या भाषणात जाग्या केल्या. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विघ्नहर्ता संस्थेचे अध्यक्ष श्री दत्ता मोरे म्हणाले, अजित भगत यांचा मिश्किल, प्रेमळ, धाक वाटणारा चेहरा डोळ्यासमोर आहे. मित्र आणि मार्गदर्शक म्हणून मलाच नव्हे तर शेकडोंना ते मोठे होते. प्रायोगिक रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेली अनेक नाटके अजित सरांनी दिग्दर्शित केली. नाटक जगणारा हा रंगभूमी वरचा माणूस होता.साध्या माणसांचा दिग्दर्शक होता.

यावेळी श्री नंदकुमार सावंत, श्रीमती चित्रा अरुण भगत, कथा लेखिका विद्या निकम, विजय सक्रे, राज जैतपाल, अमन दळवी, जयवंत सातोसकर यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ नाट्यलेखक आणि रंगकर्मी महेंद्र कुरघोडे यांनी कार्यक्रमाचे सुंदर प्रास्ताविक केले.  

लेखक महेंद्र कुरघोडे लिखित  मिशन विक्टरी, चांद तारा आणि मोक्ष या राज्यस्तरीय पारितोषिक विजेत्या नाटकांच्या कलाकारांचा सन्मान करण्यात आला, तर 

कार्यक्रमानंतर - पुढील ३ एकांकिका सादर करण्यात आल्या.

(१)एकांकिका ALEXA PLAY DESHPANDE'S WEAL लेखिका : मनाली काळे दिग्दर्शक : अमित सोलंकी

(२) एकांकिकाः बोकील वकील - लेखकः राजेश पाटील, संगीतः रमाकांत जाधव कलाकार: किरण सुधाकर शेट्ये, राजेश प्रभाकर सारंग, दिग्दर्शकः विलास गायकवाड

(३)एकांकिका - अनवा मवताव हरारी - लेखक : अजित देशमुख दिग्दर्शक आणि संगीत : रमाकांत जाधव,  नेपथ्य : रोहन ठाकूर आणि कलाकारः अथर्व नाईक, प्रज्वल रणदिवे, दिशा नाईक.


टिप्पण्या

  1. खूप छान रविंद्र जी प्रायोगिक रंगभूमीवर आपणव विचार विचार मांडले

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उतेकर कुळाचा इतिहास आणि भाऊ -बहिणींना आवाहन

लक्ष्मण उतेकर .... प्रवास जिद्दीचा, संघर्षाचा, यशाचा

लक्ष्मण उतेकरांचा छावा इतिहास घडवणार