अचाट धैर्य,अजोड पराक्रम,असामान्य शौर्य गाजवणारे रणधुरंदर,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज








अचाट धैर्य,अजोड पराक्रम,असामान्य शौर्य गाजवणारे रणधुरंदर,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती                                                 - रवींद्र मालुसरे

अचाट धैर्य,अजोड पराक्रम,असामान्य शौर्य गाजवणारे रणधुरंदर,धर्मवीर छत्रपती संभाजी राजांना मानाचा त्रिवार मुजरा !  

फाड देंगे मुघल सल्तनत की छाती 

अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरुरत की…

हम शोर नही करते, सिधा शिकार करते है..!

अग्नि भी वो, पाणी भी वो, तुफान भी वो, 

शेर शिवरायांचा छावा है वो ! 

मराठ्यांच्या इतिहासातील छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द हे मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या कालखंडातील एक तेजस्वी पर्व मानले जाते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य गाजवणारे रणधुरंदर,धर्मवीर छत्रपती संभाजी धर्माभिमानी,स्वराज्यरक्षक,सकलशास्त्र पारंगत,उत्तम राजनीतिज्ञ,परमप्रतापी आणि धर्मासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे छ्त्रपती संभाजी महाराज स्वराज्याची धुरा सांभाळणारे धाकले धनी. महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांनी वीरतेने स्वराज्याचे रक्षण केले आणि पुढच्या काळातील स्वाभिमानाच्या लढाईला प्रेरणा दिली. त्यांचे शौर्य आणि बलिदान आजही आपल्याला प्रेरित करते. 

मौत डरी थी देखकर उसे ये खुद मौत का दावा है।

धरती को नाज़ है जिस पर ऐसा शेर "शिवबा" का छावा है।।

छत्रपती संभाजी महाराजांनी सहन केलेला त्रास इतका भयानक आहे त्यामुळे तेवढा आदर जास्त आणि म्हणून ते तितकंच ताकदीने मांडलं पाहिजे ही अपेक्षा असतें. आम्हांला शंभूराजे कळलेच नव्हते. जे दुर्गुण कळले होते ते त्यांच्यात नव्हतेच. जे सद्‌गुण त्यांच्यात होते ते कुणी सांगितलेच नाहीत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करणारे मराठी साहित्य आणि कलाकृती आजही महाराष्ट्रात अनेक दशकांपासून आहे. आणि ते निर्माण करणारे आजही आपल्या मतावर ठाम आहेत.वा सी.बेंद्रे,सु.ग.शेवडे,कमल गोखले,इंद्रजित सावंत,जयसिंगराव पवार,बानूगडे पाटील असे अभ्यासक ज्यांनी संभाजी राजांची उजवी बाजू उजेडात आणली नसती तर..... खोटा इतिहास सांगणाऱ्यांच्या मागे जो समाज झुंडीने उभा आहे तो मस्तक गहाण ठेवून अधिक गर्दीने उभा राहिलेला दिसला असता. आयुष्यात एकही लढाई न हरलेल्या राजाचा पराक्रमी इतिहास मोठया पडद्यावर यावा अशी शिवप्रेमीची इच्छा होतीच.धर्माच्या -प्रांताच्या -जातीच्या भिंती अलीकडे मोठया प्रमाणात उभ्या केल्या जात असताना,कुणी परप्रांतीय निर्माता मराठ्यांच्या राजाचा पराक्रम दाखवण्याचे एव्हढे धाडस कशाला करील. परंपरेने शिवभक्त असलेले पोलादपूरचे लक्ष्मण उतेकर या मराठा माणसाने करोडो रुपये खर्च करून हे धाडस केले आणि छावा हा हिंदी चित्रपट प्रदर्शित केला.  काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सर्व प्रांतात सर्व धर्मात सर्व जातीत हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन  हर हर महादेव अशी जोरात आरोळी देत आनंदाने पाहिला. संभाजी महाराजांच्या अजरामर शौर्याची, त्यागाची आणि स्वाभिमानाची प्रेरणादायी कहाणी या चित्रपटातून बारकाव्याने उलगडली त्यामुळे देशा-परदेशातील सर्वाना कळले छावा प्रकरण नक्की काय होते.  छत्रपती संभाजी महाराजांच्या अजरामर शौर्याची, त्यागाची आणि स्वाभिमानाची प्रेरणादायी कहाणी या चित्रपटातून उलगडणार आहे. 


झुकला औरंग्या म्हणे कैसा हा छावा....

ऐसा मर्द मराठा पुन्हा पुन्हा जन्माला यावा....

“मृत्यूला मारण्याचे धाडस बाळगणारा, रणांगणातील झुंजार छावा..” स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे. इतिहासप्रेमींच्या हृदयात देशभक्तीची नवीन चेतना जागवणारा ठरला. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून महाराष्ट्रात चैतन्याचे एक नवे युग सुरू केले. पण त्यांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेब बादशहासारख्या महाबलाढ्य शत्रूशी सतत ९ वर्षे निकराचा लढा देऊन या हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले.शिवराय हे हिंदवी स्वराज्याचे 'संस्थापक, तर शंभूराजे त्या स्वराज्याचे 'संरक्षक' बनले. 

विशेषतः कवी, कादंबरीकार, नाटककार इत्यादीनी संभाजीराजांचा सत्य इतिहास न जाणून घेता केवळ आपली कलाकृती सजविण्यासाठी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांना विकृत रूप दिले. त्यातून त्यांनी त्यांच्यावर बरेच आक्षेप घेतलेला दिसले. महाराजांच्या कर्तृत्वाशी त्यांची तुलना करून त्यांचे कर्तृत्व शून्यवत् दाखविले. मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकताना ३५० वर्षांपूर्वी तत्कालीन समाजजीवन कसे होते,त्यावेळच्या लोकांची संस्कृती,राजकीय-सामाजिक-आर्थिक जीवन याचा पूर्वग्रह न ठेवता अभ्यास करावा लागतो. इतिहास जाणून घेतल्याशिवाय संभाजीराजांच्या जीवन चरित्राला न्याय देता येणार नाही. 

औरंगजेबाच्या दरबारातील खाफीखान याने संभाजी राजा बद्दल "सत्तेची नशा चढलेला राजा असे वर्णन केले तर ग्रँडडफ याने Intoxicated With the wine of Folly & Pride" असे त्याचे इंग्रजी भाषांतर केले व आम्ही त्या नशेचा अर्थ मद्यपी असा केला व संभाजी राजांना रंगेल राजा असे समजून त्यांची विकृत प्रतिमा समाजांत उभी केली.आपले खापरपणजोबा बाळाजी आवजी चिटणीस यांना हत्तीच्या पायी देण्यात आले याचा सूड शंभूराजांच्या मृत्यूनंतर १२२ वर्षांनी मल्हार रामराव चिटणीस यांने घेतला आणि सभासदाच्या मूळच्याच मसालेदार बखरीत खोट्या नाट्याचा मसाला बेमालूम घुसडून देऊन संभाजी राजांचे चरित्र लिहिले. येवढे खरे की मल्हार रामरावाने शंभूचरित्राचे जे पाणी वेगळ्या पाटाने वळवले ते पुनः मूळ पाटात आणून सोडण्याचे काम वा.सी.बेंद्रे यांनी केले. कमल गोखले, महाडचे आमदार आणि नंतर खासदार झालेले शंकरराव बा.सावंत यांचे सुद्धा संभाजी राजांची सत्य बाजू मांडणारे पुस्तक त्याकाळी प्रकाशित झाले होते. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी संभाजी राजांच्या पराक्रमाबद्दल म्हणतात - "व्यक्ती की पुण्याई, व्यक्ती की शक्ति, व्यक्ति का स्वत्व प्रगट होता है अंतिम क्षणो में। संभाजी महाराज समझौता कर सकते थे, पर उन्होंने नही किया। अगर वे शरीरसे दुर्बल होते, अगर मनके कच्चे होते, जिस तरह के व्यसनों का उनके जीवन में उल्लेख किया जाता है, अगर उस तरह के व्यसनके वे शिकार होते तो अंतिम परीक्षा में विफल हो जाते। लेकिन वे अंतिम परीक्षा में सफल रहे। पिढीयों तक उनके बलिदानसे हमें प्रेरणा मिलेगी। उन्होंने जीवनका क्षणक्षण, शरीरका कण कण स्वतंत्रता के लिये समर्पित किया।

एखादी व्यक्ती अत्यंत चैनी, ख्यालीखुशाली, रंगेल असती तर मृत्यू समोर दिसत असतांना आणि शरीराचे हाल होत असतानाही निर्भय व स्वाभिमानी राहील असे दृष्य दिसणार नाही. परंतु शंभूराजे ज्या अर्थी कष्ट सोसायला तयार झाले आणि शेवटी त्यातच त्यांचा मृत्यू झाला त्याअर्थी त्यांची या त-हेची पुढे प्रतिमा जी उभी करण्यात आली ती चुकीची वाटते. रंगेल मनुष्य तेव्हाच शरण गेला असता. त्यांच्या कारकीर्दीचा एकूण आठ वर्षे आणि आठ महिन्यांचा काळ विलक्षण धामधुमीचा ठरला. सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज आणि मोंगल हे चार शत्रू. त्यातही मराठेशाही नष्ट करण्याची प्रतिज्ञा घेऊन महाराष्ट्रात जातीनिशी उतरलेला महाशत्रू औरंगजेब! या अल्पकाळात सुमारे सव्वाशे लढाया शंभूराजांनी केल्या. औरंगजेबाने चिडून जमिनीवर आपली पगडी आपटली आणि शंभूराजांचे पारिपत्य केल्याशिवाय पगडी डोक्यावर न घालण्याची प्रतिज्ञा केली. त्याच्या सात लाख फौजेशी आपल्या बेताच्या सामर्थ्यानिशी उणी पुरी नऊ वर्षे शंभूराजांनी झुंज दिली. हा जगाच्या इतिहासातला अपूर्व पराक्रम आहे.

“श्री शंभोः शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।

यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।”



डॉ जयसिंगराव पवार (छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथातून)

सभासदाने आपली बखर राजाराम महाराजांचे जिजीस वास्तव्य असताना त्यांच्या दरबाराच्या आश्रयाने लिहून पुरी केली. त्यामध्ये संभाजी महाराजांची नालस्ती करून राजाराम महाराजांची स्तुती करण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट दिसतो. कारण त्याने संभाजी महाराजांची केलेली नालस्ती ही जशी खोटी आहे, तशी त्याने केलेली राजाराम महाराजांची अवास्तव स्तुतीही खोटी आहे."

मल्हार रामरावाने संभाजी महाराजांच्या राज्य कारभाराचे (बेबंदशाहीचे) जे चित्र रंगविले आहे, त्यास तत्कालिन कागदोपत्री काही पुरावा मिळत नाही. उलट जी काही हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखी अस्सल कागदपत्रे मिळतात त्यावरून संभाजी महाराज आपला राज्य कारभार कर्तव्य निष्ठेने, दक्षतेने व न्यायाने करीत होते असेच पुरावे मिळतात."

"जीवनाच्या अंतिम क्षणी शरीरावर व मनावर भयंकर आघात होत असतानासुद्धा स्थितप्रज्ञाच्या आत्मिक बलाने तो संकटांशी मुकाबला करू शकला याचे कोडे संभाजीराजाच्या व्यक्तित्वाच्या अध्यात्मवादी शक्तीच्या आविष्काराने सुटू शकते. व्यसनाधीन माणूस एवढ्या प्रचंड आत्मिक बलाने उभा राहूच शकत नाही. कारण व्यसन हे केवळ शरीरच नव्हे तर मनही दुबळे बनवीत असते." 


- रवींद्र मालुसरे

९३२३११७७०४ 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उतेकर कुळाचा इतिहास आणि भाऊ -बहिणींना आवाहन

लक्ष्मण उतेकर .... प्रवास जिद्दीचा, संघर्षाचा, यशाचा

लक्ष्मण उतेकरांचा छावा इतिहास घडवणार