पराक्रमाची विजयगाथा

पराक्रमाची विजयगाथा 

नरव्याघ्र नरवीर सुभेदार तानाजी - सूर्याजी मालुसरे यांच्या शौर्यावर, स्वराज्य बांधणीसाठी केलेल्या योगदानावर आणि बलिदानावर समग्र माहिती देणारा मराठीतील पहिला आणि एकमेव ग्रंथ

|| सुभेदार नरवीर तान्हाजी-सूर्याजी मालुसरे             पराक्रमाची विजयगाथा ||
या नावाचा ग्रंथ मी प्रकाशित करीत आहे.
मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील सर्वोच्च घटना म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. इतिहासाच्या प्रवाहाला नवे वळण देणारी घटना. यापूर्वी हिंदवी स्वराज्य निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक मावळ्यांनी रणागंणात समशेर पेलत साथ दिली. प्रसंगी रक्ताचा सडा शिंपत बलिदान दिले. नरव्याघ्र नरवीर सुभेदार तानाजी - सूर्याजी मालुसरे यांनी लढलेली आणि शर्थ करीत जिंकलेली कोंढाण्याची लढाई हा स्वराज्य स्थापनेच्या इतिहासातील सुवर्णक्षण ! या घटनेनेसुद्धा शिवकार्याच्या इतिहासाला वेगळे वळण दिले. १९-२० व्या शतकातील बखरकारांनी, इतिहासकारांनी, पोवाडे रचणाऱ्यांनी आजवर विविध अंगी लेखन केले आहे; पण इतक्या महत्त्वाच्या विषयावर समग्र असा ग्रंथ आता उपलब्ध झाला नाही. तो प्रयत्न मी गेल्या २ वर्षांपासून करीत होतो, हा प्रकल्प शेवटाला आला आहे त्याला यश आले आहे.



या अमूल्य ग्रंथाची वैशिष्ट्ये -
१. साक्षेपी संपादन, मनोगत व सर्वस्पर्शी दीर्घ प्रस्तावना
२. महाराष्ट्रातील प्रसिध्द इतिहासकार, संशोधक व अभ्यासकांनी या विषयावर केलेली मांडणी
३.  रॉयल साईज तसेच उत्तम व टिकाऊ पेपरवर उत्कृष्ट छपाई | पुठ्ठा बांधणी
४. प्रत्येक लेखास सुसंगत रेखाचित्रे
५. शीर्षकाचे आकर्षक सुलेखन
६. भेट देण्यायोग्य आणि संग्रही ठेवावा असा उच्च निर्मितीमूल्य असलेला ग्रंथ
७  खालील मान्यवर इतिहासकार, संशोधक व अभ्यासक यांचे लेख
परशुराम तथा आण्णा दाते, आप्पासाहेब परब, अनंत दारवटकर, दत्ता पवार, गिरीश दाबके, दिगपाल लांजेकर, नंदकिशोर मते,  प्रवीण भोसले, सच्चीदानंद शेवडे, शिरीष गोपाळ देशपांडे,  डॉ गिरीश जखोटिया, ऍडमिरल शशिकांत ओक, ब्रिगेडियर हेमंत महाजन, सुवर्णा नाईक निंबाळकर, महेश तेंडुलकर, सुरेश ठमके, श्रीपाद तांबे, शुभा साठे, सुधाकर लाड, सुनील कदम, विनोद मेस्त्री, डॉ हेमंतराजे गायकवाड, शेखर राजेशिर्के,  प्रभाकर बागुल,सचिन खोपडे, सुनील सोळंके, डॉ सतीश पावडे, प्रदीप कासुर्डे
८  लोकमान्य टिळकांचे सानिध्य लाभलेले वाईचे पहिले राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प   दत्तोपंत पटवर्धन यांचे "नरव्याघ्र तानाजी"  हे कुठेही उपलब्ध नसलेले दुर्मिळ पूर्वरंगासहित एक आख्यान
९ शाहीर तुळशीदास शिवकाळातले समकालीन शाहीर यांचा ५५ चौकी पूर्ण पोवाडा
१०  शाहीर सदाशिव ठोसर यांचा गाजलेला पोवाडा
११  लहरी हैदर या सुप्रसिद्ध शाहिरांचा पोवाडा
१२  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा ब्रिटिश सरकारने बंदी आणलेला पोवाडा
१३ मान्यवर चित्रकारांनी काढलेली दुर्मिळ रंगीत चित्रे
१४ आजपर्यंत उपलब्ध असलेल्या सर्व बखरीतील कोंढाणा लढाईचा ऐत्याहासिक वृत्तांत 


 



 
मालुसरे रवींद्र 
अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ९३२३११७७०४ 

टिप्पण्या

  1. अभिनंदन दादा तुमच्या कार्याला यश आले आणि येथुन पुढेही असेच यश येऊ दे हिच देवी भवानीला प्रार्थना

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान दादासाहेब,एक प्रत आमच्या साठी राखून ठेवा

    उत्तर द्याहटवा
  3. छान अभिनंदन काय किंमत आहे प्तप्रतीची

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उतेकर कुळाचा इतिहास आणि भाऊ -बहिणींना आवाहन

लक्ष्मण उतेकर .... प्रवास जिद्दीचा, संघर्षाचा, यशाचा

लक्ष्मण उतेकरांचा छावा इतिहास घडवणार