मराठी भाषा चला ज्ञानभाषा करूया
दादर धुरु हॉलमध्ये मराठी भाषा दिवस कार्यक्रम
काशिनाथ धुरु हॉल ट्रस्ट आणि दादर सार्वजनिक वाचनालय, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई व मराठी विचारधारा प्रतिष्ठान गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ रोजी सायंकाळी ५. ३० वाजता छबीलदास रोड, धुरु हॉल येथे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन मराठी भाषा गौरवदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार सचिन परब, आमदार आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, कामगार नेते दिवाकर दळवी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. 'कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय ) तंत्रज्ञान मराठी भाषेसाठी किती उपयुक्त' या विषयावर ३० वर्षे संगणक क्षेत्रात अध्यापन करणारे सुप्रसिद्ध भानुदास साटम यांचे व्याख्यान होत आहे. त्याचप्रमाणे संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या आणि महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून व अमेरिका, शिकागो, सिंगापूर येथून आलेल्या ४९ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा तसेच "अभिजात मराठी भाषा चला ज्ञानभाषा करूया" या लेखस्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चितळे बंधू उद्योगाचे सहकार्य लाभले आहे. श्रीमती शुभा द कामथे (आयोजक), विकास होशिंग (आयोजक ), ऍड देवदत्त लाड (आयोजक), राहुल जोगळेकर चितळे - उद्योग समूह (आयोजक ), प्रत्युष जाहिरात कंपनीचे दत्ता मालप (परीक्षक ), व्याख्याते सदानंद यादव (परीक्षक) म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम प्रमुख आणि संयोजक - राजन देसाई, प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडिगावकर, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, कार्यवाह नितीन कदम, स्पर्धा प्रमुख सुनील कुवरे, दिगंबर चव्हाण, माजी अध्यक्ष विजय ना कदम, माजी अध्यक्ष मनोहर साळवी, दिलीप ल सावंत, केतन भोज, सतिष भोसले, अब्बास आतार इत्यादी कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष आखणी केली आहे. सुप्रसिद्ध गायिका चारुशीला बेलसरे या कवी कुसुमाग्रज यांच्या २ कविता म्हणणार आहेत.
४९ वी राज्यस्पर्धा दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याचा निकाल पुढीलप्रमाणे -मनोरंजनकार' का र मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक - नवलाई आम्ही डोंबिवलीकर, डोंबिवली (संपादक - रवींद्र चव्हाण /कार्यकारी संपादक - प्रभू कापसे )
चंद्रकांत पाटणकर पुरस्कृत जगन्नाथ शंकरशेठ स्मृती उत्कृष्ट अंक - निसर्गोत्सव, कोल्हापूर (संपादक - निखिल पंडितराव)
पास्कोल लोबो पुरस्कृत गणेश केळकर स्मृती
सर्वोत्कृष्ट साहित्यिक
अंक - कालनिर्णय,
मुंबई (संपादक
- जयराज साळगावकर
)
बृहन्महाराष्ट्र वृत्त, शिकागो (संपादक-प्रसाद पानवलकर )
स्मरणिका, महाराष्ट्र मंडळ सिंगापूर (संपादक
- सचिन गांजापूरकर )
कनक रंगवाचा,
कणकवली (संपादक - वामन पंडित )
विनर्स, पुणे (संपादक - विनोद शिंदे )
सर्वोत्तम, इंदूर
( (संपादक-अश्विन
खरे )
ऋतूपर्ण, पुणे (संपादक
- शरद गोगटे
)
अक्षरमुद्रा, (संपादक-दिपक चिद्दरवार )
दक्षता, मुंबई (संपादक-विजय खरात, सहाय्यक पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य )
वारसा, अहमदनगर
(संपादक-जयंत येलूलकर )
आनंदतरंग, पुणे
शब्दगांधार, पुणे (संपादक - डॉ अरविंद नेरकर
/ चारुशीला बेलसरे )
पर्ण, पुणे (संपादक-अपर्णा
कुलकर्णी-नाडगौडी
)
शब्दवेल, पनवेल (संपादक
- देवेंद्र इंगळकर
)
अपेक्षा, पुणे (संपादक
- दत्तात्रय उभे )
भावार्थ, चिपळूण (संपादक
- प्रसन्न करंदीकर
)
कमांडर, बेलापूर (संपादक-डॉ राजू पाटोदकर )
नृत्यावकाश, पुणे (संपादक - सायली कुलकर्णी, आश्लेशा
महाजन )
गुंफण, सातारा (संपादक-बसवेश्वर चेणगे
)
आर्याबाग, पुणे (संपादक - विश्वास
कणेकर )
शब्दोत्सव, सांगली
(संपादक - हृदयनाथ
सावंत )
सृजनसंवाद, ठाणे (संपादक
- गीतेश शिंदे
)
नवरंग रुपेरी,
संभाजी नगर (संपादक
- अशोक उजळंबकर
)
कोकण मीडिया,
रत्नागिरी (संपादक-प्रमोद
कोनकर )
ठाणे नागरिक,
ठाणे (संपादक-सतिषकुमार भावे )
मनोकल्प, पुणे (संपादक-अपर्णा चव्हाण
)
मोडीदर्पण, मुंबई (संपादक
- सुभाष लाड )
अधोरेखित, वसई (संपादक
- डॉ पल्लवी
परुळेकर बनसोडे
)
क्रिककथा, पुणे (संपादक - कौस्तुभ
चाटे )
अनघा, ठाणे (संपादक-सौ विद्या
नाले )
पुरुष स्पंदनं,
मुंबई (संपादक - हरीश सदानी )
अक्षरदान, पुणे (संपादक-मोतीराम पौळ )
दिवेलागण, (संपादक - प्राजक्ता
ऐनापुरे - सणस )
हॅश टॅग, डोंबिवली (संपादक- डॉ योगेश विजय जोशी )
पद्मरत्न, इचलकरंजी (संपादक-रागिणी जगदाळे
)
अर्थशक्ति, मुंबई
(संपादक - रमेश नार्वेकर )
गावगाथा, अक्कलकोट (संपादक-धोंडप्पा नंदे)
जलोपासना (कल्याण
) (संपादक-डॉ दत्ता देशकर )
मनःशक्ती, लोणावळा
(संपादक - वर्षा तोडमल)
शब्दोत्सव, अमरावती (संपादक-ऍड. प्रीती
बनारसे )
अभिजात मराठी भाषा चला ज्ञानभाषा करूया - ही लेखस्पर्धा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे -
अर्चना शुक्ला (प्रथम क्रमांक )
रश्मी फडणवीस (द्वितीय क्रमांक )
स्वामिनी निष्कालानंद (तृतीय क्रमांक )
श्री अमित बर्वे, श्री. सूर्यकांत भोसले, श्री मनोहर जोगळेकर, श्री अनंत बोरसे, श्री प्रशांत शिरुडे, वर्षा झांबरे, डॉ प्रभाकर चांदकर, कामिनी सुरेश खाने, डॉ यशवंत सुरोशे
मराठी भाषा जतन, प्रचार आणि समृद्ध करण्यासाठी महत्वाचे योगदान देण्यात येणाऱ्या संस्थेला मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने स्व दत्ता कामथे स्मृती ग्रंथसखा सन्मान पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा