ह भ प लक्ष्मणमहाराज खेडेकरांचे तीर्थाटन : आध्यात्मिक साधनेचा ऊर्जास्तोत्र

ह भ प लक्ष्मणमहाराज खेडेकरांचे तीर्थाटन : आध्यात्मिक साधनेचा ऊर्जास्तोत्र महर्षी नारदांनी तीर्थाबद्दल आपल्या भक्तिसूत्रात असे म्हटले आहे की, तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि, सुकर्मी कुर्वन्ति कर्माणि सच्छात्री कुर्वन्ति शास्त्राणि ।। ना. भ. सू. ६९ ॥ अ से (अष्टसात्त्विक भावाने युक्त असणारे भक्त) तीर्थांना सुतीर्थ बनवितात, (विहित) कर्मानाही सुकर्म दशेला आणतात आणि शास्त्रांना सच्छास्त्र स्वरूप करून देतात. मनुष्याला संचित पापापासून मुक्त करून त्याला पावन करण्याचे सामर्थ्य हे तीर्थात, तीर्थक्षेत्रात असते. भारतात अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. प्रत्येकाला एक इतिहास आहे. मनुष्याने जीवनात धार्मिक कृत्ये करावीत. तथापि, तीर्थयात्रेच्या निमित्ताने मनुष्यजीवनात निसर्गसान्निध्यात काही काळ घालवावा. तेथील देव- देवतांमुळे जन्म व दिव्य कर्मानी ही भूमी पुनीत झालेली असते तसेच; ऋषिमंडळी, संत, भक्त यांच्याही तप साधनेने ही भूमी पुनीत होत असल्यामुळे तेथे जाऊन आपले जीवन पुनीत करावे. यासाठी संत तुकाराममहाराज म्हणतात, जव हे सकळ सिद्ध आहे । हात चालावया पाय ।। तव तू आपुले स्वहित । ...