शाहीर आत्माराम पाटील





शाहीर आत्माराम पाटील

आज शाहीर आत्माराम पाटील यांचे जन्मशताब्दी वर्षाचा समारोप. (९ नोव्हेंबर १९२४ ते १० नोव्हेंबर २०१०) काल त्यांच्या जन्मगावी एका कार्यक्रमात आत्मारायण या ग्रंथाचे प्रकाशन केले, त्या ग्रंथातील हा लेख. 

शाहीर चंदू भरडकर आज हयात नाहीत, परंतु ३० वर्षांपूर्वी ते मला लोअर परेल रेल्वे वर्कशॉपच्या समोरील येथे एका चाळीत घेऊन गेले होते. शाहीर आत्माराम पाटील यांच्याशी माझी ती पहिली ओळख. सनमिल कंपाऊंडमध्ये मी नोकरीला असल्याने घरी येताना अनेकवेळा शाहिरांची भेट व्हायची आणि गप्पा होत असत. ते ज्या ठिकाणी राहत होते त्याठिकाणी म्युझिक रेकॉर्डिंगचे काम व अलीकडे टोलेजंग इमारत उभी राहते आहे, मी २ वर्षांपूर्वी या ठिकाणी गेलो होतो तेव्हा शाहिरांची प्रकर्षाने आठवण झाली होती. आज राष्ट्रकूटचे कार्यकारी संपादक राजन देसाई यांनी शाहिरांच्या जन्मशताब्दी निमित्ताने यासंबंधाने लिहावे असा आग्रह केला. 

१८९० ते १९२० हा तमाशा कलेचा अत्यंत भरभराटीचा आणि उत्कर्षाचा कालखंड होय. याच काळात अनेक दिग्गज शाहीर उदयाला आले. शाहीर पट्ठे बापूराव, शाहीर अर्जुना वाघोलीकर, शाहीर दगडू साळी तांबे शिरोलीकर, हरिभाऊ वडगावकर आणि भाऊ फक्कड ही मंडळी स्वतः तमासगीर शाहीर होती. स्वतः रचना करणे, त्यांना चाली लावणे आणि स्वतः फडात गाऊन सादर करणे, अशी विविधता ह्या तमासगिरांच्या अंगी होती. हे सर्वच प्रतिभासंपन्न शाहीर होते. हे सर्वच शाहीर नवनव्या कल्पना काढून त्यावर लावण्या व वग रचना करण्यात एकापेक्षा एक पटाईत होते. एकमेकाला शह-काटशह शह देणारे होते. पोवाडा हा उत्तरेकडील भाटांच्या स्तुतीगीतातून विकसित झाला असे म्हणतात. राजस्थानातून आलेला आणि उत्तर पेशवाईत महाराष्ट्रात स्थायिक झालेला सिद्ध रावळ हा भाट होता. त्या अगोदर शिवाजी महाराजांवर महाकाव्य लिहिलेला कवी भूषण हाही भाट होता. शिवकालातील अज्ञानदास या शाहिराने लिहिलेला 'अफ्फझुलखानाचा वध' हा सर्वात जुना पोवाडा समजला जातो. गणवंदन, शारदावंदन आणि गुरू स्मरण ही त्याची पारंपारिक मांडणी लक्षात घेण्यासारखी आहे. शिवाजी महाराजांच्या चातुर्याचे आणि पराक्रमाचे गुणगान त्यात आहे. धाडसी युद्धकथेतील धरार नाट्य त्यात आहे. तुळसीदास या शाहिराने लिहिलेला 'तानाजी मालुसरे' हा पोवाडाही एक श्रेष्ठ कविता आहे. ही युद्धकथा आहे, एका वीराच्या पराक्रमाची कथा आहे तशी त्याच्या उदात्त बलिदानाची कथा आहे. पोवाडा हे श्रेष्ठ मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारे काव्य आहे याचा पुरेपूर प्रत्यय या पोवाड्‌यात येतो. 

पोवाडा म्हणजे शौर्यकथा, वीरकथा, युद्धकथा असते अशी आपल्याकडे एक समजूत आहे. मला वाटते आपली ही समजूत अर्धवट माहितीवर आधारलेली असल्याने चुकीची आहे. पोवाडे केवळ वीररसात्मक असतात असे नव्हे, तर अन्य विषयांवरही पोवाडे रचलेले आहेत. 'महाराष्ट्रात जे पोवाडे उपलब्ध आहेत त्यांत युद्धवर्णने असून पराक्रमी वीरांचे मरण चित्रीत केलेले असते. महाराष्ट्रातील अनेक भटक्या जमातीनी ही पोवाड्याची परंपरा जपलेली आहे. त्यांच्या पोवाड्यांचे विषय केवळ शौर्यगाथाकथांप्रमाणेच नसून विविध प्रकारचे आहेत. लोकपरंपरेत या पोवाड्यांची निर्मिती, सादरीकरण आणि जपवणूक अव्याहतपणे मौखिक पद्धतीने झालेली दिसते. एचब. ए. आर्थ यांनी काढलेले उद् गार मुद्दाम लक्षात

घ्यावे लागतील. ते लिहितात, 'या गोंधळ्यांनी महाराष्ट्रीयांचा इतिहास वाचविला नसता तर आम्ही त्या इतिहासास आज मुकलो असतो. या गोंधळ्यांचे उपकार केवढे मानावे आणि त्यांची योग्यता किती वर्णावी. या अभ्यासकाने ऐतिहासिक पोवाडे संकलित करण्यासाठी अनेक गोंधळ्यांचा शोध घेतला. त्यांच्याकडून पोवाडे मिळविले. मराठमोळ्या लोककलेची परंपरा एखाद्या विशाल वटवृक्षाप्रमाणे आज मराठी जनमानसात आपल्या आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यह्याने एकरूप झालेली आहे. याचं कारण श्रमाच्या भूमीत या लोककलेचं बीज पेरलं गेलं. निढळाच्या घामाचं पाणी पिऊन ते तरारून उगवलं.

महाराष्ट्रात गेल्या शतकभराच्या काळात शाहीर लीलाधर हेगडे, शाहीर निवृत्ती पवार, शाहीर साबळे, शाहीर विठ्ठल उमप, अण्णाभाऊ साठे, पिराजीराव सरनाईक, शेख अमर आणि शाहीर आत्माराम पाटील आदी अनेक प्रतिभावान शाहीर महाराष्ट्रात होऊन गेले. शाहीर आत्माराम पाटील हे त्याच पर्वणीतले शाहीर. वरवर साधे वाटणारे, साधं सुधं आयुष्य जगणारे; पण प्रचंड संवेदनशील... प्रतिक्रियावादी! ते

शाहीर आत्माराम पाटील म्हणजे शब्दांचे 'प्रभू... कल्पनांचे 'कुबेर ... महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेचा मानदंड !... त्यांच्याइतकी प्रभावी लेखणी आणि वाणी द्वचितच पाहायला मिळते. 'शाहिरी भारत' चे ३०-३५ खंड तयार होतील एवढी प्रचंड साहित्य संपदा हस्तलिखित स्वरूपात आजही त्यांच्याकडे आहे... प्रकाशित झालेली 'आत्मशाहिरी' आणि इतर शाहिरी काव्यंखंडही त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या लोकभाषेतून लोकप्रबोधनातून आणि लोककार्यातून 'भव्य' या शब्दाचा अर्थ कळतो.. पालघर जिल्ह्यातील एका लहानश्या खेडेगावी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले. शिक्षण ७ वी पर्यंत परंतु लहानपणापासून त्यांनी जे अनुभवलं, बघितलं, सोसलं ते शेतकयांचे कष्ट, वारंवार पडत असलेला दुष्काळ, गरिबीची अवकळा, दैन्य, दारिद्रय व अंधरूढीनी ग्रासलेलं जीवन. त्यांनी भोगलेलं आणि अनुभवलेलं घरातलं धार्मिक वातावरण, आई-आजी वेळप्रसंगी सांगत व गात असलेल्या पारंपरिक उद्बोधक कहाण्या, गौरी, बारशाची, लग्न समारंभाची गाणी. अशा धार्मिक वातावरणातच मनाची मशागत झालेली. शालेय शिक्षणातून झालेले संस्कारही ज्ञानवर्धक बनलेले. संयुक्त महाराष्ट्राचे वातावरणाने भारावून गेले होते. या सा यातून मनाची मशागत झालेली. पुढे मुंबईत आल्यानंतर त्यांची प्रतिभा आकाराला आली. आपल्यालाही कवनं करता येतील म्हणत त्यांनी मनात येणा या ओळी कागदावर उतरायला सुरुवात केली. अल्प शिक्षित असूनही त्यांचे अक्षरज्ञानही कमालीचं घोटीव होतं. उदरनिर्वाहासाठी कुठल्यातरी नोकरीच्या हव्यासात न पडता, त्यांनी मुंबईत ठोक भाजीपाल्याचे व्यापार करण्याची कास धरली.समाजजीवनाला प्रबोधनाद्वारे आकार देत ते पुढे न्यायला साहाय्य करणे हा मुख्य हेतू शाहीर पाटील यांच्या एकूणच काव्यनिर्मिती मागे असल्याचे मराठी जनाला माहित होऊ लागले. शाहिराला वर्तमान काळाचे ज्ञान असावे असे म्हटले जाते. त्यांच्या एकूणच काव्याचे आकलन करता, त्यांच्या काव्यात अनेक घटनांना विशेष स्थान असल्याचे दिसते. त्यांच्या लेखणीतून आणि वाणीतून उमटलेले शाहिरी गण, गौरवशाली महाराष्ट्र गीत, भारतमातेच्या शूरवीर महत्व विदित करणारी स्फ्फूर्ती गीते, शाहिरी मुजरा' या कवनातून गतइतिहासातील पूर्व परंपरा देऊन राष्ट्रीय भावनेचा आविष्कार करणारी गीतं जनमानसात नवा जोम आणणारी आहेत. शाहिरांची एकूणच काव्यात्मक शाहिरी नव्या जाणिवा देणारी आणि आत्मभान राखणारी होती. एका अर्थाने त्यांचे शाहिरी काव्य इतिहासाचे भान ठेवणारे, वर्तमान काळाला साक्षी ठेवणारे आणि भविष्यकाळाचा वेध घेणारे होते असेच सांगता येईल.

मला वाटतं कवी, लेखक वा शाहीर हे साळुंकी पक्ष्यासारखे असतात. या साळुंकीसारखा तडफ फडणारा, आवाहन करणारा, कधी-कधी वणव्यातही डरकाळी फ्फोडणारा, धर्मांधता, जातीयता, नैसर्गिक आपत्ती याची आधीच चाहूल आपल्या काळात सूचित करणारा आणि समुदायाला जागं करणारा. शाहीर आत्माराम पाटीलही मला याच वळणाचे वाटत आले आहेत. त्यांनी कुटुंब नियोजन, हुंडाबंदी, व्यसनमुक्ती, भ्रूणहत्या, बाल विवाह बंदी, त्तसेच समरगीते, समूहगीते, स्मरणगीते असे विविध विषय शाहिरीचे लिहिले आणि सादर केले. त्यांनी प्रकाशित केलेल्या लोकयुगीन आत्मशाहिरी या त्यांच्या पुस्तकातून अनेकविध विषय त्यांनी काव्यातून हाताळले. शाहीर आत्माराम पाटील लोअर परेलला एका चाळीत राहायचे. अस्सल गिरणगावातील एक कलावंत म्हणून ते लोकांत असायचे. कलावंताला समाजाचं भान असतं. कलावंत माणसात राहतात, जनतेत वावरतात, तिच्याशी समरस होतात. त्यांच्या जीवनलढ्यात ते सहभागी होतात. म्हणूनच त्यांच्या कलेचा आत्मा जनतेशी निष्ठा ठेवून स्फफूर्ती घेतो. मला याच पठडीतले वाटतात.

रवींद्र मालुसरे

अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

9323117704






वेगवेगळ्या विषयावरील लेख वाचण्यासाठी अनुक्रमणिका पहा - 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संकल्पपूर्ती दाता : स्व. तानाजीदादा मालुसरे

प्रभादेवी श्री विठ्ठल मंदिर : इतिहास, परंपरा आणि नैमित्तिक कार्यक्रम

बैल दिवाळी इतिहास, संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण