नामदार भरतशेठ गोगावले ....लोकनेता घडताना
नामदार भरतशेठ गोगावले ....लोकनेता घडताना रोजगार हमी,फलोत्पादन खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद मी .... भरतशेठ विठाबाई मारुती गोगावले ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित..... रोजगार हमी,फलोत्पादन मंत्रिपदाची शपथ घेताना आमदार भरत गोगावले यांच्या तोंडून हे शब्द महाड -पोलादपूर-माणगावकरांनी ऐकले आणि एकच जल्लोष गावागावात वाडीवस्तीवर उसळला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षांपूर्वी सत्तातंर झाल्यानंतर आलेल्या मंत्रिमंडळात खरे तर भरतशेठ गोगावले यांचा सर्वाधिक हक्क होता. याचे कारण महाआघाडीचे सरकार जाण्यासाठी जे घडले होते त्यात आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार आणण्यात त्यांचा वाट महत्वाचा होता. त्याला रायगडमधील सत्ता संघर्षाबरोबर दुसरी आर्थिक बाजुही होती. आघाडी सरकार स्थापन झाल्याबरोबर आदिती तटकरे पालकमंत्री झाल्याबरोबर अगोदर स्थानिक पातळीवर व नंतर राज्यपातळीवर ही अस्वस्थता पोहोचली होती. २० जुनला बंड झाले परंतु त्याअगोदर ६ महिने भविष्यात मंत्रिपद जवळ आलेय जरा धीर धरा असे सकारात्मकरित्या जवळच्या कार्यकर्त्यांना भरतशेठ ठामपणे हे सांगत होते. परंतु...