गीता निवृत्ती उतेकर (पोलादपूर) यांचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गौरव
गीता निवृत्ती उतेकर (पोलादपूर) यांचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गौरव
रायगड जिल्हा पोषण माह सांगता सोहळा
पोलादपूरच्या पर्यवेक्षिका, बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस सेविका यांना पुरस्कार प्रदान
मुंबई :
(रवींद्र मालुसरे ) - महिला व बाल विकास विभागांतर्गत पोषण माह चा सांगता समारंभ
तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कार वितरण
सोहळ्याचे आयोजन नुकतेच अलिबाग येथील होरायझन हॉल येथे आयोजित करण्यात आले. या
कार्यक्रमात बिट स्तरावर १०० टक्के मोबाईल
व्हेरिफिकेशन पर्यवेक्षिका पुरस्कार -
पोलादपूर तालुक्यातील गीता निवृत्ती उतेकर (पोलादपूर), सुविधा संतोष मिरगळ (पोलादपूर), पोषण अभियानात उत्कृष्ट कामगिरी केलेला प्रकल्प - बाल विकास
प्रकल्प अधिकारी माधुरी फड पोलादपूर, आदर्श अंगणवाडी सेविका - विमल जगदाळे (कापडे बुद्रुक), आदर्श अंगणवाडी मदतनीस सेविका - शुभांगी कासार (चरई) यांना राज्याच्या महिला व
बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.
भरत बास्टेवाड आपल्या भाषणात म्हणाले की, राज्याच्या विकासात महिला व बालकांचा मोठा वाटा आहे. सरकारच्या माध्यमातून
महिलांचे सक्षमीकरण व पोषण करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. सुदृढ
बालके जन्माला येण्यासाठी गरोदर महिलांना पोषण आहार पुरविण्यात येत आहे. तसेच
बालकांच्या जन्मानंतर स्तनदा मातांना आहार देण्यात येतो. जिल्ह्यात 3 वर्षांपर्यंतच्या सुमारे ४२ हजार
बालकांच्या पोषण आहाराकडे लक्ष देण्यात येत आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस पोषण
आहार पुरविण्याकडे लक्ष देत आहेत. तसेच शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवित
आहेत.
यापूर्वी ९ सप्टेंबर २०१९ रोजी रायगड जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने महाड तालुक्यातील नागाव बिटमधील प्राविण्य मिळविल्याबद्दल गीता निवृत्ती उतेकर यांना आदर्श पर्यवेक्षिका पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अलिबाग येथील पी एन पी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास विधानपरिषद सदस्य शेकाप नेते आमदार जयंत पाटील आणि लोकसभा सदस्य खासदार सुनील तटकरे तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्षा आदिती तटकरे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून आस्वाद पाटील, आमदार धैर्यशील पाटील उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा