पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नादब्रम्हाचा उपासक सुप्रसिद्ध भजनी गायक ह.भ.प.पांडुरंगबुवा रामजी उतेकर

इमेज
  नादब्रम्हाचा उपासक सुप्रसिद्ध भजनी गायक ह.भ.प.पांडुरंगबुवा रामजी उतेकर   पोलादपूर तालुक्यातील सुप्रसिद्ध भजनी गायक आणि वारकरी संप्रदायाचे अर्ध्वर्यू संगीतरत्न ह.भ.प.पांडुरंगबुवा रामजी उतेकर यांचे आज (मंगळवार ९ नोव्हेंबर २०२१ ) रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ८७ व्या वर्षी  निधन झाले. त्यांच्याच गावातील वारकरी संप्रदायातील पोलादपूर मधील थोर संत ह भ प. वै  ढवळे बाबा आणि गुरुवर्य वै ह भ प नारायणदादा घाडगे यांचा पांडुरंगबुवांना लहानपणापासून खुप जवळचा सहवास आणि स्नेह लाभला. किर्तनासह , भजनामध्ये आपल्या वेगळ्या शैलीतील गायनाने बुवांनी रसिकांना गेली सहा दशके मंत्रमुग्ध केले. पोलादपूर तालुक्यातला वारकरी क्षेत्राचा सुवर्णकाळ हा साधारणतः १९५५   ते   १९७५. या काळात अनेक गुरुतुल्य व्यक्ती जन्माला आली. अर्जुनमामा साळुंखे , ढवळे बाबा , नारायणदादा घाडगे , गणेशनाथ बाबा , हनवतीबुवा , हबुबुवा , ज्ञानेश्वर मोरे माउली , विठोबाअण्णा मालुसरे , ढवळे गुरुजी , भजनानंदी  हरिभाऊ रिंगे , सुप्रसिद्ध पखवाजवादक  रामदादा मेस्त्री , शंकर मेस्त्री , भाईबुवा घाडगे , विठोबा ...

मराठीच्या भल्यासाठी दिवाळी अंक परंपरा जपू या !

इमेज
  दिवाळी ! दिव्यांची आरास. रांगोळीचा थाट , पक्वानांचा घमघमाट आणि फटाक्यांची आतषबाजी ! दिवाळी म्हणजे दीपोत्सव आणि दीपोत्सव म्हणजे आनंदाचा उत्साह , उल्हासाचा उत्सव ! प्रसन्नतेचा उत्सव , प्रकाशाचा उत्सव. अशी ही दिवाळी मराठी माणसांच्या नसानसातून झिरपत असते.   दिवाळी म्हणजे दीप मांगल्याचा सण. रोषणाई , फराळ आणि फटाक्यांची आतिषबाजी हे दिवाळी सणाचे वैशिष्ट्य. त्याचप्रमाणे दिवाळी अंक हा दिवाळी सणाचा   एक अविभाज्य भाग आहे.   म्हणूनच दीपावली सणाची केवळ चाहूल सुद्धा अबाल वृद्धांना हर्षभरित करते. दिवाळी ' येते तीच मुळात हसत , खेळत , नाचत. सभोवताल प्रकाशाने , देदीप्यमान तेजाने उजळून टाकत. सोबतीला असतात गतकाळाच्या दिवाळीच्या आठवणी , वर्तमानकालीन अपेक्षा आणि पुढील वर्ष आनंदात , सुखासमाधात जावं , ह्या आशा आणि इच्छा. दिवाळी म्हटलं की पहाटेची अभ्यंगस्नानं , उटणी , मोती आणि म्हैसूर चंदन साबणाचे सुवास , अत्तरं , फराळ , फटाके , आकाशकंदील , पणत्या , रांगोळी , नवीन कपडे हे सारं असतंच , त्याचबरोबर दिवाळी अंक घरी आल्याशिवाय बऱ्याच मराठी घरांत ह्या सणाची पूर्तता होत नाही! दिवाळीची चाहूल लागत...