एल्फिस्टन रेल्वे स्टेशन चे नाव "प्रभादेवी"


प्रभादेवी रेल्वे स्टेशन नामकरण करण्याच्या प्रयत्नास यश !



एल्फिस्टन रेल्वे स्टेशन चे नाव "प्रभादेवी". 25 वर्षांपूर्वी म्हणजे २५ जानेवारी १९९२ रोजी दै.सामना मधील लेखामधून मी मागणी केली आणि...त्यावेळचे महापौर दिवाकर रावते आणि मधू दंडवते,रामविलास पासवान या केंद्रीय रेल्वेमंत्रांसह खासदार नारायण आठवले, खासदार रामभाऊ नाईक यांच्यासोबत त्यानंतर पाठपुरावाही केला त्याला यश आले....यशाबद्दल आनंदी आहे. एल्फिस्टन रोड रेल्वे स्टेशन चे प्रभादेवी नामकरण झाले, यासाठी मी २५ जानेवारी १९९२ रोजी दैसामना मध्ये 'प्रभादेवीची महती' असा लेख लिहून मागणी केली होती.व त्यानंतर शासन दरबारी पाठपुरावा केला होता.माझ्या या यशाबद्दल संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला, याप्रसंगी संघाचे अध्यक्ष विजय ना कदम, रेल्वे बोर्डाचे सल्लागार सदस्य दत्ताराम घुगे,दिगंबर चव्हाण, सुनील कुवरे, रमेश सांगळे, श्रीकांत मयेकर, नितीन कदम यांच्यासह अनेक वृत्तपत्र लेखक उपस्थित होते.त्याचबरोबर  एलफिन्स्टन स्टेशनचे नामकरण "प्रभादेवी" करण्यात आले.याप्रसंगी "प्रभादेवी जनसेवा समितीच्या" वतीने धनंजय खाटपे आणि प्रभादेवीकरांच्या वतीने रेल्वे प्रवासी, स्टेशन मास्तर आणि पोलिस अधिकाऱ्यांना "प्रभादेवी रेल्वे स्टेशन"वर गुलाबपुष्प, आणि मिठाई देऊन स्वागत करण्यात आले आणि आई प्रभादेवीच्या नावाचा जयघोष करण्यात आला.......

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संकल्पपूर्ती दाता : स्व. तानाजीदादा मालुसरे

कर्तबगार माणिकराव जगतापांची लेक स्नेहलदीदी

बैल दिवाळी इतिहास, संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण