पोलादपूर तालुक्यातील इतिहास पुत्रांनो संघटीत व्हा !

जगभर नावलौकिक प्राप्त झालेल्या, स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र श्रीमंत संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचे, शौर्याचे आणि स्वराज्य रक्षणाच्या अभिमानाचे दर्शन घडवणारा ऐतिहासिक चित्रपट म्हणजे 'छावा'! त्याचे दिग्दर्शक श्री. लक्ष्मण उतेकर यांचा भव्य सत्कार चित्रनगरीचे माहेरघर असलेल्या मुंबई शहरात व्हावा अशी भावना पोलादपूर तालुक्यातील शेकडो मुंबई - ठाणेकरांकडून व्यक्त झाल्यानंतर श्री. सुभाषजी पवार, श्री. बाजीराव मालुसरे आणि श्री. किशोरजी जाधव यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. मूर्त विचाराला पूर्ण स्वरूप देण्यासाठी काही दिवसांपूर्वी तातडीने दादरमध्ये प्राथमिक बैठक झाली. आणि काल ३१ मे २०२५ ला संध्याकाळी १५ जून रोजी होणाऱ्या जवेरबेन हॉल मधील कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पत्रक काढून घाटकोपरला मिटिंग झाली. सभेला उपस्थित असलेले समाजातले कार्यकर्ते, त्यांनी व्यक्त केलेला विचार, त्या विचारामागची भावना... भविष्यात आपल्या अस्तित्वासाठी काही नवे घडावे यासाठी आम्ही स्वतः हून तयार आहोत असा दाखवणारा त्यांचा उत्साह..... मला खुप काही सांगून गेला. आपला.... पूर्वजांचा इतिहास तेजस्वी आहे. पूर...