पोस्ट्स

पर्यटनाला चालना देण्यासाठी महाड-पोलादपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसांचा विकास करणार - ना. भरतशेठ गोगावले

इमेज
पर्यटनाला चालना देण्यासाठी महाड-पोलादपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसांचा विकास करणार - ना. भरतशेठ गोगावले पोलादपूर (रवींद्र मालुसरे)  - रायगड जिल्ह्याला विशेषतः महाड आणि पोलादपूर तालुक्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या संपन्नतेचा वारसा लाभला आहे. प्रागैतिहासिक काळापासून मानवी संस्कृतीची जडण-घडण आपल्या जिल्ह्यात होत असल्याचे ठोस पुरावेदेखील अलिबाग, महाड सारख्या ठिकाणी उपलब्ध आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात तर या भूमीत जन्मलेल्या शूरवीर मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करून स्वराज्याच्या स्थापनेसाठी मोलाची कामगिरी केली. नरवीर तान्हाजी मालुसरे, नरवीर सूर्याजी मालुसरे, नरवीर मुरारबाजी देशपांडे, परमानंदबाबा, रायगड किल्ला, कांगोरी किल्ला, चंद्रगड किल्ला वैगरे इतिहासाच्या अनेक  ऐत्याहासिक वारसाच्या खुणा अस्तित्वात आहेत. या वारशाची महती जगाला पटवून देण्यासाठी पर्यटनासारखा दुसरा पर्याय नाही. पर्यटन आणि ऐतिहासिक, सांस्कृतिक, नैसर्गिक, भौगोलिक स्थळांचा अतिशय नजीकचा संबंध येतो. कधीकाळी इतिहासाची सुवर्णपाने असलेली ही स्थळे जपण्याचा त्यांचे संवर्धन करण्याचा आटोकाट प्रयत्न मी करणार आहे. म...

नरवीर सूर्याजी मालुसरे यांच्या गावात ग्रामदैवत आई नवलाई-भैरी पुनः प्राणप्रतिष्ठा आणि पुनर्रचित मंदिराचा उदघाटन सोहळा

इमेज
नरवीर सूर्याजी मालुसरे यांच्या गावात ग्रामदैवत आई नवलाई-भैरी पुनः प्राणप्रतिष्ठा आणि पुनर्रचित मंदिराचा उदघाटन सोहळा सुभेदार नरवीर तान्हाजी आणि सूर्याजी मालुसरे यांच्या साखर गावाचे ग्रामदैवत आई नवलाई-भैरी यांची पुनः प्राणप्रतिष्ठा ( जीर्णोद्धार ) आणि पुनर्रचित मंदिराचा उदघाटन सोहळा दिनांक २४ व २५ एप्रिल २०२५ रोजी संपूर्ण दोन दिवस धार्मिक आणि पारंपरिक रितिरिवाज पूर्ण करून पोलादपूर तालुक्यात संपन्न होत असल्याचे अध्यक्ष विनायकदादा मालुसरे आणि संतोष महादेव मालुसरे यांनी पत्रकार परिषदेद्वारे सांगितले आहे. ग्रामदैवतांची उत्पत्ती भारताच्या प्राचीन धार्मिक, सांस्कृतिक, आणि सामाजिक परंपरांशी निगडित आहे. विशेषतः महाराष्ट्रातील कोकण आणि इतर ग्रामीण भागांमध्ये ग्रामदैवतांना फार पुरातन काळापासून महत्त्व आहे. ग्रामदैवतांचा उगम कसा झाला, याविषयी अनेक दंतकथा, लोककथा, आणि धार्मिक आख्यायिका आहेत. आमच्या साखर गावाबाबतही असेच म्हणावे लागेल. प्राचीन काळात नैसर्गिक संकटे, राक्षसी शक्ती आणि जंगलातील प्राण्यांपासून गावे सुरक्षित नव्हती. देवावर श्रद्धा ठेवणारी साधी - भोळी माणसं असलेल्या गावकऱ्यांना त्यांच्या ज...

कायद्याच्या रक्षणासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी कठोर व्हावे - रवींद्र मालुसरे

इमेज
कायद्याच्या रक्षणासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी कठोर व्हावे - रवींद्र मालुसरे मुंबई : पोलिस वा 'खाकी वर्दी' म्हंटल की धाक, रुबाब, अशी एक संकल्पना सामान्य नागरिकांच्या डोळ्यासमोर उभी राहते. खाकी वर्दीतील तापटस्व भावाचा, कडक शब्दांत बोलणारा, हेकेखोर, असंवेदनशील व्यक्ती अशीच प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात असल्यामुळे अनेकजण पोलिसांपुढे जाण्यास घाबरतात. पोलिस अधिकाऱ्याला कर्त्यव्यासाठी वेळप्रसंगी थोडे कठोर व्हावे लागत असले, तरी वर्दीतही अगोदर तो मनुष्य असतो. त्यालाही मन, भावना असतात. माणुसकीच्या नात्याने प्रसंगी मदत करतात, सल्ला  देतात, पण कायद्याचे रक्षण करण्यासाठी आणि वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांना कठोर राहावं लागतं असे उदगार मराठी वृत्तपत्र लेखक संघांचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी काढले.  गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने दादर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस प्रमुख राजेंद्र आव्हाड साहेब यांचा मालुसरे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार दत्ताराम घुगे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर वैशाली रोडवेजचे मालक शिवाजीशेठ उगले, वर...

मराठी भाषा अभिजात बरोबर व्यावहारिक व्हायला हवी - सचिन परब

इमेज
मराठी भाषा अभिजात बरोबर व्यावहारिक व्हायला हवी - सचिन परब एआय साठी मराठी भाषेतून मजकूर (कन्टेन्ट ) ऑनलाईन जायला हवा. मुंबई (रवींद्र मालुसरे ) - अभिजात मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी याचा प्रचार करण्यासाठी मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईने  संकल्प केला आहे, अभिजात बरोबर ती अधिकाधिक व्यवहारी कशी होईल यासाठी प्रयत्न झाला तरच हे शक्य आहे. याचबरोबर कृत्रिम प्रज्ञा (एआय ) व्यवहारात मराठी अधिक उपयोगासाठी आणण्यासाठी त्याप्रमाणे मजकूर संगणकात लिहायला हवा असे विचार ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांनी व्यक्त केले. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कवी एकनाथ आव्हाड, कामगारनेते दिवाकर दळवी, संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे, चितळे उद्योगसमूहाचे राहुल जोगळेकर, दादर सार्वजनिक वाचनालयाचे सेक्रेटरी यतीन कामथे, मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे विश्वस्त विकास होशिंग उपस्थित होते. या कार्यक्रमात संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४९ व्या...

मराठी भाषा चला ज्ञानभाषा करूया

इमेज
दादर धुरु हॉलमध्ये मराठी भाषा दिवस कार्यक्रम  काशिनाथ धुरु हॉल ट्रस्ट आणि दादर सार्वजनिक वाचनालय,  मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई  व मराठी विचारधारा प्रतिष्ठान गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ रोजी सायंकाळी ५. ३० वाजता छबीलदास रोड, धुरु हॉल येथे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन मराठी भाषा गौरवदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार सचिन परब, आमदार आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, कामगार नेते दिवाकर दळवी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. 'कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय ) तंत्रज्ञान मराठी भाषेसाठी किती उपयुक्त' या विषयावर ३० वर्षे संगणक क्षेत्रात अध्यापन करणारे सुप्रसिद्ध भानुदास साटम यांचे व्याख्यान होत आहे. त्याचप्रमाणे संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या आणि महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून व अमेरिका, शिकागो, सिंगापूर येथून आलेल्या ४९ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा तसेच "अभिजात मराठी भाषा चला ज्ञानभाषा करूया" या लेखस्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चितळे बंधू उद्योगाचे सहकार्य लाभले आहे. श्रीमती शु...