Ticker

6/recent/ticker-posts

गावगाथा दिवाळी अंक

 

“आठवणीतील गाव” – गावगाथा दिवाळी अंक २०२५ : ग्रामीण संस्कृतीचा साज आणि दर्जेदार साहित्याची मेजवानी!

सातत्य, साहित्य आणि संस्कृतीचा संगम म्हणजे गावगाथा दिवाळी अंक!

यंदाच्या २०२५ च्या गावगाथा दिवाळी अंकाला सलग ४ थे वर्ष पूर्ण होत आहे. या चार वर्षांच्या प्रवासात ‘गावगाथा’ने वाचकांना प्रत्येक वर्षी काहीतरी हटके, विचारप्रवर्तक आणि ग्रामीण संस्कृतीचा आत्मा जपणारं साहित्य दिलं आहे.

या वर्षीचा विशेष अंक “आठवणीतील गाव” या सुंदर व भावस्पर्शी विषयावर आधारित असून, आपल्या बालपणाच्या, संस्कृतीच्या, नात्यांच्या आणि मातीच्या गंधाने न्हालेल्या आठवणींना उजाळा देणाऱ्या लेखांनी हा अंक सजलेला आहे.

या अंकात साहित्यविश्वातील दिग्गज आणि नवोदित अशा अनेक लेखकांच्या लेखणीने ग्रामीण जीवनाचे विविध पैलू जिवंत केले आहेत.या अंकात वाचायला मिळणार आहेत प्रतिष्ठित मान्यवरांचे लेख –

डॉ. संदीप भाजीभाकरे (आय.पी.एस. अधिकारी)

श्रीधर लोणी (जेष्ठ पत्रकार, संपादक – महाराष्ट्र टाइम्स)

इंद्रजित भालेराव (प्रसिद्ध साहित्यिक लेखक)

रजनीश जोशी (लेखक पत्रकार)

प्रा. रामदास केदार (प्रसिद्ध साहित्यिक, उदगीर)

पद्माकर मा. कुलकर्णी (साहित्यिक, सोलापूर)

प्रा. माधव राजगुरू (भाषा अभ्यासक, अध्यक्ष – अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था, पुणे)

संजय ऐलवाड (बाल साहित्यिक, पुणे)

अभय दिवाणजी (जेष्ठ पत्रकार, सोलापूर)

समीर गायकवाड (साहित्यिक, सोलापूर)

सचिन बेंडभर (बाल साहित्यिक)

भारत यादव (लेखक पत्रकार)

शेखर गायकवाड (आय.पी.एस. अधिकारी)

प्रविण दवणे (जेष्ठ कवी, मुंबई)

मारूती कटकधोंड (कवी, सोलापूर)

या मान्यवरांसह अनेक नवोदित आणि ग्रामीण लेखकांनाही या अंकातून लेखनासाठी व्यासपीठ मिळाले आहे.

गेल्या चार वर्षांपासून ‘गावगाथा’ दिवाळी अंकाने ग्रामीण भागातील संस्कृती, परंपरा, रूढी, आणि गावकुसातील माणसांचे जगणे वाचकांपर्यंत पोहोचवले आहे.

प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाचं मुखपृष्ठही हटके आणि आकर्षक आहे – गावगाथाच्या सर्जनशीलतेचा आणखी एक नमुना!

किंमत: फक्त ₹२५०/-

वाचक, लेखक आणि साहित्यप्रेमींनी हा अंक विकत घेऊन वाचावा, जपावा आणि आपल्या गावाच्या, संस्कृतीच्या आठवणींना उजाळा द्यावा.

संपादक - धोंडपा नंदे 

9850619724

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या