डॉ. विजयकुमार डोंगरे यांच्यावरील सेवाव्रती लघुपटाचा मोफत प्रीमियर शो
चित्रपट रसिकांसाठी समीक्षण स्पर्धा
दादर सार्वजनिक वाचनालय आणि काशिनाथ धुरु हॉल ट्रस्ट व मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई यांच्या वतीने या कार्यक्रमाचे शनिवार, २७ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५ वा.दादर सार्वजनिक वाचनालय आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाला
मुख्य अतिथी म्हणून पद्मश्री डॉ विजयकुमार डोंगरे यांच्यासह डॉ. शैलेश मोहिते (अधिष्ठादता,
नायर हॉस्पिटल), डॉ. विवेक पै (डायरेक्टर, मुंबई लेप्रसी प्रोजेक्ट), डॉ हेमंतराजे
गायकवाड (डायरेक्टर, गायकवाड इन्स्टिट्यूट), डॉ प्रवीण बांगर (वैद्यकीय अधिकारी के
इ एम हॉस्पिटल) उपस्थित राहणार आहेत.
हा चित्रपट पाहूनचित्रपट
- नाट्यप्रेमी आस्वादकांसाठी रसस्वाद समीक्षण स्पर्धा घेण्यात आली आहे. सर्वांना
सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ही Documentry देशा -परदेशात स्पर्धेसाठी पाठविण्यात
येणार असल्यामुळे या विशेष क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी दासावाचे वाचक सभासद, मराठी
वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे सभासद, चित्रपट-नाट्य कलाप्रेमी, नागरिक आणि विद्यार्थी
यांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्रीमती शुभा द कामथे (विश्वस्त आणि प्रमुख कार्यवाह,
दासावा) आणि रवींद्र मालुसरे (अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई) यांनी केले
आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रक कार्यवाह नितीन कदम आणि संपूर्ण आयोजन दिगंबर चव्हाण,
राजन देसाई यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यक्रम प्रमुख सुनील कुवरे
+919167364870 यांच्याशी संपर्क साधावा.
याच कार्यक्रमात
ज्येष्ठ वृत्तपत्र लेखिका श्रीमती मंदाकिनी भट, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक पास्कोल लोबो,
वसंत हरयाण, रमेश सांगळे यांना वृत्तपत्र लेखक चळवळीसाठी अनेक वर्षे अमूल्य योगदान
दिल्याबद्दल जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या