पोस्ट्स

मार्च, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कायद्याच्या रक्षणासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी कठोर व्हावे - रवींद्र मालुसरे

इमेज
कायद्याच्या रक्षणासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी कठोर व्हावे - रवींद्र मालुसरे मुंबई : पोलिस वा 'खाकी वर्दी' म्हंटल की धाक, रुबाब, अशी एक संकल्पना सामान्य नागरिकांच्या डोळ्यासमोर उभी राहते. खाकी वर्दीतील तापटस्व भावाचा, कडक शब्दांत बोलणारा, हेकेखोर, असंवेदनशील व्यक्ती अशीच प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात असल्यामुळे अनेकजण पोलिसांपुढे जाण्यास घाबरतात. पोलिस अधिकाऱ्याला कर्त्यव्यासाठी वेळप्रसंगी थोडे कठोर व्हावे लागत असले, तरी वर्दीतही अगोदर तो मनुष्य असतो. त्यालाही मन, भावना असतात. माणुसकीच्या नात्याने प्रसंगी मदत करतात, सल्ला  देतात, पण कायद्याचे रक्षण करण्यासाठी आणि वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांना कठोर राहावं लागतं असे उदगार मराठी वृत्तपत्र लेखक संघांचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी काढले.  गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने दादर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस प्रमुख राजेंद्र आव्हाड साहेब यांचा मालुसरे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार दत्ताराम घुगे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर वैशाली रोडवेजचे मालक शिवाजीशेठ उगले, वर...

मराठी भाषा अभिजात बरोबर व्यावहारिक व्हायला हवी - सचिन परब

इमेज
मराठी भाषा अभिजात बरोबर व्यावहारिक व्हायला हवी - सचिन परब एआय साठी मराठी भाषेतून मजकूर (कन्टेन्ट ) ऑनलाईन जायला हवा. मुंबई (रवींद्र मालुसरे ) - अभिजात मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी याचा प्रचार करण्यासाठी मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईने  संकल्प केला आहे, अभिजात बरोबर ती अधिकाधिक व्यवहारी कशी होईल यासाठी प्रयत्न झाला तरच हे शक्य आहे. याचबरोबर कृत्रिम प्रज्ञा (एआय ) व्यवहारात मराठी अधिक उपयोगासाठी आणण्यासाठी त्याप्रमाणे मजकूर संगणकात लिहायला हवा असे विचार ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांनी व्यक्त केले. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कवी एकनाथ आव्हाड, कामगारनेते दिवाकर दळवी, संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे, चितळे उद्योगसमूहाचे राहुल जोगळेकर, दादर सार्वजनिक वाचनालयाचे सेक्रेटरी यतीन कामथे, मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे विश्वस्त विकास होशिंग उपस्थित होते. या कार्यक्रमात संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४९ व्या...