मराठी भाषा गौरव दिनानिमित्त
AI तंत्रज्ञानाचा वापर करून संकल्प चित्र स्पर्धा
'ए.आय. अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता' कृत्रिम बुद्धिमत्ता(AI) हे सद्या जगभरात वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान आहे. ही आधुनिक तंत्रज्ञानातील एक महत्त्वाची क्रांती ठरणार आहे. योग्य वापराने AI आपल्या समाजाला अधिक प्रगत आणि सुसंवादी बनवू शकते. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवी बुद्धिमत्तेसारखे शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये आणि त्या मशीनमधल्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये तयार करण्यासाठी वापरले जाते. याद्वारे भूत, भविष्य आणि वर्तमान काळातील चित्र उभारले जाऊ शकते. या तंत्रज्ञानाचा सर्वच क्षेत्रात झपाट्याने विकास होत असल्याने साहित्य क्षेत्रात देखील वापर सुरू झाला आहे.
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने २७ फेब्रुवारी या दिवशी दादर सार्वजनिक वाचनालय व धुरु हॉल ट्रस्ट आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान गोरेगाव यांच्या सहकार्याने कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने श्री सर्वोदय एज्युकेशनल ट्रस्ट मुंबईच्या सहकार्याने संघाच्या वतीने AI तंत्रज्ञानाचा वापर करून "मराठी भाषा गौरव दिन संकल्प चित्र स्पर्धा" आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी ज्येष्ठ कामगार नेते दिवाकर दळवी यांचे योगदान लाभले आहे. सर्वोत्कृष्ट तीन चित्रांना रोख पारितोषिक आणि सहभागी होणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
दिनांक २५ फेब्रुवारी सकाळी ११ वा. पर्यंत चित्राची इमेज Chalval1949@gmail.com किंवा ८७७९९८३३९० यावर पाठवावी. अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख आणि कार्यक्रम संयोजक राजन देसाई यांच्याशी संपर्क साधावा. "AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता' मराठी भाषेसाठी किती उपयुक्त" या विषयावर गेली ३० वर्षे संगणक क्षेत्रात अध्यापन करणारे भानुदास साटम सरांचे व्याख्यान आणि ४९ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा, "अभिजात मराठी भाषा चला ज्ञानभाषा करूया" या राज्यस्तरीय लेखस्पर्धेचे पारितोषिक वितरण या कार्यक्रमात होणार आहे.
स्पर्धेचे नियम -
(१) ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून कोणत्याही वयोगटातील व्यक्ती यात सहभागी होऊ शकते.
(२) संगणकावर AI तंत्रज्ञानाचा वापर करून "मराठी भाषा गौरव दिन" या विषयावर चित्र बनवावे
(३) तुमच्या संकल्पनेतून मराठी भाषा दिन उत्सवी स्वरूपात साजरे करीत आहोत हे चित्रांमधून व्यक्त व्हायला पाहिजे.
(४) विचिध चित्रे आणि मराठी म्हणी, वाक्यप्रचार, कविता यांचा वापर केला तरी चालेल.
(५) कोरल ड्रॉ किंवा फोटोशॉप मध्ये पूर्ण चित्र बनवले तर त्याचा विचार केला जाणार नाही.
(६) पहिल्या ३ स्पर्धकांना रोख पारितोषिके, प्रशस्तीपत्र आणि इतर सर्वाना प्रशस्तीपत्र २७/०२/२०२५ रोजी कार्यक्रमात देण्यात येतील.
(६) दिनांक २५ फेब्रुवारी सकाळी ११ वा. पर्यंत चित्र पाठवावे ११ वाजल्यानंतर पाठवलेल्या चित्राचा विचार केला जाणार नाही.
(६) चित्राबरोबर संपूर्ण नाव, ठिकाण, मोबाईल किंवा ईमेल स्वतंत्र्यपणे देणे आवश्यक आहे.
0 टिप्पण्या