पोस्ट्स

ऑगस्ट, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पोलादपूर तालुक्याचे सुपुत्र संजीव धुमाळ यांना राष्ट्रपती पदक

इमेज
पोलादपूर तालुक्याचे सुपुत्र   संजीव धुमाळ यांना राष्ट्रपती पदक मुंबई  (रवींद्र मालुसरे ) : रायगड जिल्हयातील पोलादपूर तालुक्याचे सुपुत्र संजीव दत्तात्रय धुमाळ यांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस दलातील सर्वोच्च राष्ट्रपती पदक घोषित करण्यात आले आहे. संजीव धुमाळ हे रबाळे पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. धुमाळ यांची सन १९९५ साली पोलीस उप निरीक्षक म्हणुन निवड झाल्यानंतर ते एक वर्षाचे नाशिक येथील प्रशिक्षण संपवुन सांताक्रुझ पोलीस ठाणे व त्यानंतर मुंबई गुन्हे शाखा येथे एल-९ बांद्रा व त्यानंतर खंडणी विरोधी कक्ष यामध्ये एकुण १८ वर्षे उत्कृष्ठ कामगिरी केलेली आहे. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना अनेक महत्वाच्या गुन्हयांची उकल करून अंडरवर्ल्डच्या बऱ्याच गुन्हेगारांवर कारवाई केलेली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणुन वाशी पोलीस ठाणे व न्हावा शेवा पोलीस ठाणे येथे त्यांनी उत्कृष्ट कर्तव्य बजावताना कायदा व सुव्यवस्थेचा समतोल राखला तसेच आता सध्या रबाळे पोलीस येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणुन कर्तव...

प्रभादेवीकर रमेश परब यांना अभिवादन !

इमेज
  प्रभादेवीकर रमेश परब यांना अभिवादन ! राजकीय आणि  दैनंदिन सामाजिक जीवनात उत्तुंग विचारांची उंची असलेली आणि  सतत   प्रभादेवी आणि दादर विभागात वावरणारी हसतमुख व्यक्ती म्हणजे माझे मित्र आणि  सर्वांच्या परिचयाचे 'जगनमित्र' म्हणजे रमेश परब ! आज पहाटे वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. त्यानंतर दुःखाची हळहळ व्यक्त करणारे त्यानंतर अनेकजण भेटले. शरीराने कमी उंचीचे परंतु सृदुढ बांध्याचे असलेल्या रमेश परब यांची मुंबई आणि कोकणातल्या राजकारणाच्या अभ्यासाची उंची व जाण मात्र फार प्रगल्भ होती. साधारण १९८० च्या विद्यार्थी दशेपासून मी त्यांच्या संपर्कात आलो आणि पक्का मित्र झालो. देशाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माननीय शरद पवार साहेब आणि कुठल्याही राजकीय पेचप्रसंगात मुंबईत  शरद पवारांना खंबीर साथ सोबत करणारे स्वर्गीय गोविंदराव फणसेकर या दोघांचा  लाडका 'मानसपुत्र' म्हणूनही रमेश यांची ओळख होती.  शरदरावांनी राजकीय जीवनात कोणतीही बरी वाईट घेतलेली भूमिका असो गोविंदराव आणि त्यांच्यानंतर रमेश परब यांनी सातत...