शिवराज्याभिषेक हिंदुस्थानच्या इतिहासातील सोनेरी क्षण - दुर्गमहर्षी आप्पा परब




शिवराज्याभिषेक हिंदुस्थानच्या इतिहासातील सोनेरी क्षण - दुर्गमहर्षी आप्पा परब

 मुंबई (रवींद्र मालुसरे) - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला रायगड किल्ल्यावर झाला. शिवराजाभिषेकदिनोत्सव सेवा समिती - दुर्गराज रायगड यांच्या वतीने हिंदुस्थानच्या इतिहासातील हा सोनेरी क्षण भव्य सोहळ्याच्या स्वरूपात गेली काही वर्षे साजरा करण्यात येतो. केवळ मोगल साम्राज्याविरुद्धचा राजकीय एल्गारच नव्हे, तर मराठा संस्कृती आणि मराठ्यांच्या यशस्वी प्रतिकारतेचा हा सोहळा होता. शिवरायांच्या प्रति असलेला अभिमान आणि स्वातंत्र्याच्या जाज्वल्य इतिहासाचा जागर नवोदित पिढीकडून करण्याचा संस्थेचा हा प्रयत्न कौुकास्पद आहे असे गौरोवोद्गार दुर्गमहर्षी आप्पा परब यांनी काढले

श्री शिवराजाभिषेक दिनोत्सव सेवा समिती - दुर्गराज रायगड यांच्या वतीने जागर शिवराजाभिषेकाचा सन्मान शिवसमिधांचा हा कार्यक्रम शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्य सावरकर स्मारकात आयोजित करण्यात आला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील इतिहासावर विविध विषयांवर सुमारे ४० च्यावर पुस्तके लिहिणाऱ्या ज्येष्ठ इतिहास संकलक श्री. आप्पा परब यांना 'शिवसन्मान' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना सन्मानचिन्ह आणि मानपत्र सन्मानपूर्वक देण्यात आले.

रणजित सावरकर, इतिहासाचे राष्ट्रीय अभ्यासक अशोकसिंह ठाकूर, मंजिरी मराठे, असिलता सावरकर, डॉ हेमंतराजे गायकवाड, राजेंद्र वराडकर हे याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

समितीच्या खांद्याला खांदा लावून दुर्गराज रायगडावर होणारा राजाभिषेक सोहळा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे शिवप्रेमी ऊन, वारा पावसाची तमा बाळगता कार्यरत असतात. अशा शिवप्रेमी मावळ्यांचा सन्मान या निमित्ताने करण्यात आला.

आप्पा परब पुढे असेही म्हणाले की, हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी शिवछत्रपतींनी प्रचंड मेहनत घेतली. त्यांना असंख्य मावळ्यांच्या पराक्रमाची साथ लाभली, स्वराज्याची उभारणी करण्यासाठी तसेच राज्यातील गोरगरीब रयतेला मुघलांच्या जाचातून सोडविण्यासाठी महाराजांनी १६७४ साली स्वतः राज्याभिषेक करवून घेतला. सामान्यातील सामान्यांचे विशेषतः गोरगरीब रयतेचे कल्याण संरक्षण हे मुख्य सूत्र असल्याने हिंदुस्थानच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा 'रयतेचा राजा' अशीच झाली आहेतर उद्योजक आणि ऐत्याहासिक पुस्तकाचे लेखक डॉ हेमंतराजे गायकवाड आपल्या भाषणात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच राजकारण आणि युद्धाचे प्रशिक्षण मिळाले होते, त्यांची रणनीती आणि पराक्रम असामान्यच होते. म्हणून ते जगातील महान योद्ध्यांपैकी ग्रेटेस्ट मानले जातात. याचे दाखले देत  पुस्तक लिहिले अनेक भाषांमध्ये प्रकाशित केले

इतिहास अभ्यासक आप्पा परब यांच्या 'शिवराजाभिषेक' या पुस्तकाचे, संस्थेच्या वतीने काढण्यात येणाऱ्या 'इतिहास मंथन' या त्रैमासिकाच्या शुभारंभाच्या अंकाचे आणि  डॉ हेमंतराजे गायकवाड यांच्या 'शिवाजी फादर ऑफ इंडियन नेव्ही' या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष सुनील पवार यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला तर सचिव समीर वारेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलेकार्याध्यक्ष पांडुरंग (सनी ) ताठेले, सचिव समीर वारेकर, कोषाध्यक्ष राजेंद्र देसाई, रंजन गावडे, अक्षय खोत, यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

आप्पासाहेब परब यांच्या सिद्धहस्त 

लेखणीतून प्रकाशित झालेली पुस्तके 

·         किल्ले रायगड स्थळ दर्शन

·         किल्ले राजगड स्थळ दर्शन

·         किल्ले राजगड कथा पंचविसी

·         किल्ले रायगड कथा पंचविसी

·         श्रीशिवबावनी

·         शिवरायांच्या अष्टराज्ञी

·         किल्ले पन्हाळगड कथा दशमी

·         शिवजन्म

·         किल्ले विशाळगड कथा त्रयोदशी

·         सिंधुदुर्ग

·         विजयदुर्ग

·         सिंहगड

·         लोहगड

·         दंडाराजपुरी दुर्ग

·         पावनखिंडीची साक्ष

·         रणपति शिवाजी महाराज

·         हुजुरबाज

·         छत्रपती शिवरायांचा आरमारी सुभेदार

          मायाजी नाईक भाटकर

·         किल्ले पन्हाळा

·         किल्ले रायगड प्रदक्षिणेच्या वाटेवर

·         किल्ले राजगड प्रदक्षिणेच्या वाटेवर

·         श्रीभवानी तरवार

·         किल्ले राजगड बखर

·         श्रीशिवदुर्ग ओवीबद्ध त्रिशतकावली

·         किल्ले राजगड घटनावली

·         घोडखिंडीची साक्ष

·         रणपती शिवाजी महाराज

  • हुजुरबाज
  • छत्रपती शिवरायांचा आरमारी सुभेदार- मायाजी नाईक भाटकर
  • किल्ले पन्हाळा औरंगहणाख्यान
  • किल्ले रायगड प्रदक्षिणेच्या वाटेवर
  • किल्ले राजगड प्रदक्षिणेच्या वाटेवर
  • श्रीभवानी तरवार
  • किल्ले राजगड बखर
  • श्रीशिवदुर्ग ओवीबद्ध त्रिशतकावली
  • किल्ले राजगड घटनावली
  • घोडखिंडीची साक्ष
  • रणपती शिवाजी महाराज
  • सिन्धुदुर्ग
  • विजयनगर साम्राज्यातील किल्ले
  • किल्ले रायगड घटनावली - श्री शिवकाळ
  • किल्ले रायगड घटनावली - श्री शंभुकाळ
  • युद्धपती श्रीशिवराय युद्ध पंच अंग कोष
  • पोर्तुगीज अहवालातील किल्ले भाग
  • पोर्तुगीज अहवालातील किल्ले भाग
  • शिवराजाभिषेक
  • आगामी -
  • निजामी अंमलातील किल्ले
  • बहमनी अंमलातील किल्ले
  • आदिली अंमलातील किल्ले
  • मोंगल अंमलातील किल्ले
  • आदिली (शिवकाळ ) अंमलातील किल्ले
  • कुतूबी अंमलातील किल्ले
  • रायगड नगरी
  • ठाणे जिल्ह्यातील किल्ले
  • युद्धपती शंभू महाराज


 इतर पोस्ट वाचण्यासाठी समोरची 👉अनुक्रमाणिक clik करा 


  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संकल्पपूर्ती दाता : स्व. तानाजीदादा मालुसरे

कर्तबगार माणिकराव जगतापांची लेक स्नेहलदीदी

बैल दिवाळी इतिहास, संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण