सुभेदार वामन बांदल यांची शौर्याची वाटचाल प्रेरणादायी - बाजीराव मालुसरे
सुभेदार वामन बांदल यांची शौर्याची वाटचाल प्रेरणादायी - बाजीराव मालुसरे
मुंबई : पोलादपूर तालुक्याला सुभेदार वामन बांदल यांचा अभिमान वाटावा अशी त्यांची भारतीय सैन्यातील त्यांची शौर्याची वाटचाल आहे. सैन्यात भरती झाल्यानंतर शिपाई, मग लान्स नाईक, त्यानंतर नाईक, हवालदार, नाईक सुभेदार, ते सुभेदार अश्या वेगवेगळ्या पोस्टवर प्रमोशन घेतल्यानंतर एन एस जी म्हणजे ब्लॅक कमांडो,त्यांच्या या उत्तम कामगिरीची दखल घेत त्यांची ज्युनिअर कमिशनड ऑफिसर अधिकारी या पदावर काम केल्यानंतर भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटरमध्ये सुरक्षा अधिकारी म्हणून ते निवृत्त झाले.खरंतर प्रत्येक पोलादपूर वासीयांच्या हृदयात कोरली जायला हवी अशी ही कामगिरी आहे. असे उदगार सुभेदार नरवीर तानाजी-सूर्याजी मालुसरे यांचे वंशज आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाजीराव मालुसरे यांनी काढले.
मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांच्या हस्ते करण्यात आला.
सुभेदार वामनराव बांदल यांचा कृतज्ञता सत्कार सोहळा कल्याण येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी शेकडो नागरिक उपस्थित होते. बाजीराव मालुसरे पुढे असेही म्हणाले की, अभूतपूर्व साहस, जाज्वल्य देशाभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती, नि:सीम धैर्य आणि कठोर निर्धार यांच्या बळावर एकीकडे अपुरा शस्त्रसाठा, प्रतिकूल निसर्ग आणि दुसरीकडे अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असताना त्यावर मात करत, आपल्या जिवाची तमा न बाळगता शरीराच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणारे भारतीय सैन्याचे वीर जवान देशाची खरी संपत्ती आहे. सैनिकांच्याप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीव देखील तितकीच महत्वाची आहे. याप्रसंगी शिवसेना शिर्डी संपर्क प्रमुख उद्धव कुमठेकर, नगरसेवक महेश शेठ गायकवाड, नगरसेवक विशाल दादा पावशे, नगरसेवक निलेश दादा शिंदे , नगरसेवक हर्ष वर्धन दादा पालांडे , कल्याण पूर्व शिवसेना सह संपर्क प्रमुख शरद दादा पाटील ,उपशहर संघटक अशोक जी कुबल ,मा. नगरसेवक कल्याण जी धुमाळ,निवृत्त पोलिस निरीक्षक राम चिकणे, निवृत्त कस्टम अधिकारी पांडुरंग दाभेकर, शाखाप्रमुख प्रशांत जी बोटे, मनसे विभाग अध्यक्ष विवेक धुमाळ, क्राईम ब्रांच सुचेत टिकेकर, माजी सैनिक सोपान जाधव आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सुभेदार वामन बांदल म्हणाले की, सैन्यातील आम्ही सर्व सैनिक शिस्त आणि नियम याचा अवलंब करून साऱ्या देशाची जबाबदारी घेऊन देशप्रेमाच्या कर्तव्याच्या भावनेतून देशाची सेवा करतो, आम्ही वीरजवान भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातून आलेलो असतो. वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे,भाषांचे पण आमची एकच ओळख असते ती म्हणजे एक भारतीय. स्वराज्याचा इतिहास घडलेल्या प्रतापगड-कांगोरीगडच्या भूमीत माझा जन्म झाल्याने भारताच्या सुरक्षेसाठी मला दोन्ही सेवा बजावता आल्या हे मी माझे भाग्य समजतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा