जहांगीर कला दालनात मल्लिकार्जुन सिंदगी यांचे "होरायझन"
जहांगीर कला दालनात मल्लिकार्जुन सिंदगी यांचे "होरायझन"
चित्रकार श्री. मल्लिकार्जून सिंदगी
, हे कलेविषयी अनेक
प्रकाराचे साहित्य लिखाण सातत्याने
करत असतात . त्यांचे
कला विषयक लेखन
,हे कांही पुस्तकांच्या
रुपांने अनेकांच्या संग्रही आहे.
चित्रकार श्री. मल्लिकार्जून सिंदगी
सरांनी कलाशिक्षक प्रशिक्षण विभागातील
ए.टी.डी.
वर्गासाठी पुनर्रचित अभ्यासक्रमां मध्ये
" भाषाअध्यापन शास्त्र " या विषयांवरील
शास्त्र शुद्ध पद्धतीने , मुद्देसुद
सविस्तर पुस्तक लिहून ते
प्रकाशित केले आहे
आणि ते प्रशिक्षित
विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवले आहे .
चित्रकार श्री. मल्लिकार्जून सिंदगी हे मुळातच बहुभाषिक आहेत,१४भाषांचे ते जाणकार असूनही त्यांची बोलीभाषा ही प्राधान्यक्रमाने मराठी त्यामुळे त्यांची राहाणीमान व जीवनशैलीचा प्रभाव त्यांच्या चित्र र्निर्मीतीतून दिसून येतो आहे.
चित्रकार श्री. मलिकार्जून सिंदगी हे कोरोना काळात कोरोना बाधीत झाले होते. कोरोना माहामारीच्या कालावधीत ते बाधीत होवून ते एकलकोंडेपणा असहय जीवण जगत होते . मरण त्यांच्या नजरेसमोर तरळत होते. अशा परिस्थितीमध्ये काय करावे? या विवंचनेतून त्यांनी आपल्या मनांतील भावना जागृत केल्या आणि कलासाधना हेच माझ्या जीवनाचे एकमेव ध्येय हे प्रमाण मानून त्यांनी त्यावेळी कलासाधनेला सुरुवात केली आणि संबंध कोरोना कालावधीत कलेची साधना केली ती कला साधना त्यांच्या फळरूपाला आली. "कला जीवनाचे सार" अशा आशयाचे त्यांनी पुस्तक प्रकाशित केले आहे. कला माणसाला जीवन जगण्याची उमेद देते असे चित्रकार श्री. मल्लिकार्जून सिंदगी सर्वांना आर्वजून सांगतात किंबहुना हा सामाजिक संदेश देतात. चित्रकार श्री. मल्लिकार्जून सिंदगी हे कलाकृती / चित्र निर्मिती करतांना फारसा विचार न करता प्रथम उपलब्ध पृष्ठभागावर उपलब्ध माध्यमाद्वारे सहजपणे छेडछाड करतात आणि मग खऱ्या अर्थाने त्यांची कलाकृती निर्माण होण्यास सुरुवात होते .कलाकारांना आपली कला साकारण्यासाठी कोणत्या न कोणत्या प्रकाराचा आकार हवा असतो , तो मूर्त असो कि अमूर्त स्वरूपाचा. चित्रकार मल्लिकार्जून सिंदगी यांनी साधे- साधे कागदापासून ते कॅनव्हासपर्यंत कलाकृती साकारण्यासाठी अनेक प्रकाराचे पृष्ठभाग छोट्या मोठ्या , कमी अधिक प्रमाणात वापरले आहेत किंबहुना ते हाताळलेले आहेत चित्रकार श्री. मल्लिकार्जून सिंदगी चारकोल/ कोळश्या सारख्या पारंपारिक माध्यमापासून ते विविध रंगी पेन ,रंगीत पेंन्सिल्स, रंगखडू , ॲक्रॅलिक , तैलमाध्यम अशा अनेक प्रकाराच्या अधुनिक माध्यामाचा वापर खुबीने करतात . मुख्यत्वेकरून प्रदर्शनामध्ये कॅनव्हॉस व ॲक्रॅलिक व तैल माध्यमातील कांही निवडकच मोजक्या कलाकृती प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत . इतर माध्यमात केलेल्या कलाकृती काही शेकडोच्या संख्येने त्यांच्याकडे संग्रही आहेत.
चित्रकार श्री. मल्लिकार्जून सिंदगी हे पृष्ठभागावर सहजपणे चित्र निर्मितीला सुरुवात करतांना माध्यमांशी छेडछाड करतात मग त्यांना पृष्ठभागात/ अवकाशात एखादा छोटा-मोठा बिंदू दिसतो तर कधी-कधी रेषांचे वेगवेगळे प्रकार दिसतात आणि मग चित्रकार श्री. मलिलकार्जून सिंदगी सर चित्ररूप साकारण्या कडे सरसावतात . कलेच्या मुलतत्वामधले एखादे मुलतत्व चित्रकार श्री. मल्लिकार्जून सिंदगी यांच्या दृष्टिक्षेपात आला की मग मूर्त स्वरूपात असो की अमूर्त स्वरूपात असो कलाकृती निर्माण करण्यासाठी आपल्या कला कौशल्याचा परिपूर्ण वापर करतात .
एखाद्या बिंदूला किंवा रेषांच्या
प्रकाराला मूर्त- अमूर्त रूप
देत देत कलाकृती
मध्ये मुलभूत भौमितिक
आकारांची निर्मिती तर नैसर्गिक
आकारांत नदी, नाले
, सुर्य, डोंगर , झाडा झुडूपांचे
विविध डौलदार आकार
, आकाशामधील विविध प्रकारच्या आकाराची
निर्मिती , अथांग समुद्र किनारे
, खवळलेल्या पाण्याच्या लाटा , जहाज,
बोटी , सुर्य
किरणे इत्यादी अनेक
प्रकाराचे मूर्त - अर्मूत स्वरूपाचे
आकाराचे विषय चित्रकार
श्री. मल्लिकार्जून सिंदगी
यांच्या कलाकृतीमधून दिसून येतात
.
विशेष म्हणजे चित्रकार मल्लिकार्जून
सिंदगी सरांच्या कलाकृती मध्ये
ध्वज, शिव पार्वती
, नंदी बैल , शंख- डमरू
, त्रिशूल , शंकराची पिंड , होम-
हवन , ज्वाला इत्यादी
पारंपारिक व दैवीय
आकार मूर्त - अमूर्त
स्वरूपात दिसून येतात. चित्रकार
श्री. मल्लिकार्जून सिंदगी
हे, आपल्या कला
निर्मितीमध्ये उजेड अंधार
, उन सावल्यांचा खेळ
अतिशय कौशल्यपूर्ण विविध
प्रकारच्या रंगसंगती माध्यमातून साकारण्यामध्ये
कमालीचे यशस्वी झालेले आहेत.
चित्रकार श्री. मल्लिकार्जुन सिंदगी यांनी कलाकृती / रंगलेपन कधी कधी समरंग पटलाद्वारे तर कधी कधी श्रेणीक्रमाने तर कधी कधी आच्छादित पद्धतीने तर कधी- कधी तुटक पद्धतीने तर कधी कधी मिश्रित पद्धतीने रंगलेपन करून अतिशय सुंदर मनमोहक कलाकृती साकारलेल्या आहेत . चित्रकार श्री. मल्लिकार्जून सिंदगी यांनी रंगलेपनामध्ये पांढरा रंग, काळा रंग, कृष्ण धवल रंग, पिवळा हिरा, फिक्कट निळा , गडद निळा , पिवळा, तांबडा, नारंगी आश्या उष्ण व शीत रंगाचा वापर त्यांच्या चित्राकृतींमध्ये चपखलपणे केलेला आहे . त्यामुळे चित्र पहातांना चित्रामध्ये जवळचे -लांबचे अंतर दिसून येते. चित्रामध्ये धुसर पणा जाणवतो आहे तर कांही चित्रांमध्ये धुरकटपणा , धुर निघणारे , वातावरणात जाळ धगधगत आहे , आभाळ भरून आलेलं आहे , कडक उन पडले आहे , सकाळ सकाळीचे पहाटेचे दृश्य चित्र निर्माण करण्यामध्ये चित्रकार श्री. मल्लिकार्जून सिंदगी हे कुंचल्याच्या माध्यमातून रंगलेपन करून चित्र निर्मितीला , चित्र विषयाला , चित्र वातावरणाला , चित्रमाध्यमाला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्यासाठी कमालीचे यशस्वी झालेले आहेत. विशेषतः भडक रंगाचे आयोजन हे अनेक चित्रकृतीचे वैशिष्ठ्ये वाटते.
कुंचला, नाईफ , रोलर इत्यादी अनेक प्रकाराच्या माध्यमांचा वापर करण्यास चित्रकार श्री. मल्लिकार्जून सिंदगी महत्व देतात. अशा विविध मुलतत्वांचा कौशल्यपूर्ण उपयोग करून तयार केलेल्या कलाकृती रसिकांच्या मनामनामध्ये सौंदर्य भाव निर्माण करतीलच या बद्दल शंका नाही .
दि.१४ में
ते२०मे२०२४ या कालावधीत
जहांगीर आर्ट गॅलरी
, काला घोडा , मुंबई येथे
होत असलेल्या चित्रकार
श्री. मल्लिकार्जून सिंदगी
यांच्या एकल चित्र
प्रदर्शनास कला रसिकांनी,कला प्रेमींनी,
आणि कला संग्राहकांनी
आवर्जून भेट द्यावी
असे आवाहन करण्यात
आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा