फौजी आंबवडे ग्रामविकास मंडळाचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न
युवकांनी स्वतःशी प्रामाणिक राहून समाजहित व देशहिताला प्राधान्य द्यावे - वीरमाता अनुराधा गोरे
फौजी
आंबवडे ग्रामविकास मंडळाचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न
मुंबई (रवींद्र मालुसरे) :- युवकांनी स्वतःशी
प्रामाणिक राहून समाजहित व
देशहिताला प्राधान्य द्यावे. देशसेवा
करण्यासाठी विविध सेवा मार्ग खुले
आहेत. त्यासाठी जिद्दीने
अभ्यास करा, आत्मविश्वासाने
व पूर्ण तयारीने
विविध स्पर्धात्मक परीक्षण
सामोरे जा. स्वतंत्र्य
भारताचे नागरिक म्हणून आपण
विविध हक्कांची मागणी
करतो. आपल्याला सुरक्षितता
हवी असते मात्र
देशाच्या सुरक्षिततेचा विचार आपण विशेषतः
युवा पिढी करणार
आहे की नाही.
देशाचे भविष्य घडविणे तुमच्या
हाती आहे असे
आवाहन शहिद कॅप्टन
विनायक गोरे यांच्या
मातोश्री वीरमाता अनुराधा गोरे
यांनी केले. शेकडो
युवा-युवतींना प्रेरित
करताना अनेक प्रासंगिक
उदाहरणे ओघवत्या शब्दात देऊन
त्यांनी विद्यार्थ्यांना दादर येथे
मार्गदर्शन केले.
महाड येथील फौजी आंबवडे ग्रामविकास मंडळाच्या वतीने पंचक्रोशीतील मुंबई निवासी युवा विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दादर येथील धुरू हॉल मध्ये केले होते. शिबिराच्या समारोप प्रसंगी श्रीमती अनुराधा गोरे यांनी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्या म्हणून मार्गदर्शन केले.
स्पर्धा
परीक्षा तज्ज्ञ आणि लक्ष्य
अकॅडमीचे सिनियर फॅकल्टी वसीम
खान यांनी प्रारंभीचे
सत्र गुंफताना म्हणाले
की, सरकारी नोकरीत
आर्थिक सुरक्षितता आहे, मानसन्मान
मिळतो, हाती अधिकार
येतात, हाती अधिकार
आल्यामुळे देशसेवा करायला मिळते,
चांगलं काम करता
येते .... एकूणच काय तर
आकर्षण ही अशी
गोष्ट आहे जी
लाखोंच्या संख्येने विद्यार्थ्यांना स्पर्धा
परीक्षेकडे आकर्षित करते. इंजिनिअरिंग आणि एमएमबीबीएचे
अभ्यास पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची
संख्या लक्षणीय असल्याचे दिसून
आली आहे, पहिल्याच
प्रयत्नात यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची
संख्याही वाढली आहे. काही
विद्यार्थी मात्र याला अपवाद
आहेत. ते केवळ
आकर्षणापोटी नव्हे तर मनाशी
ध्येय बाळगून आणि
त्यांच्यामध्ये क्षमता असते म्हणून
विचाराअंती स्पर्धा परीक्षेकडे आलेले
असतात. यूपीएससीमध्ये निवड होणाऱ्यांमध्ये
बीई, एमई, एमटेक,
डॉक्टर अशा व्यावसायिक
अभ्यासक्रमाची पदवी असलेल्या
उमेदवारांची संख्या वाढते आहे.
यंदाही निवड झालेल्यांमध्ये
अभियांत्रिकीतील पदवीधरांची संख्या लक्षणीय
आहे. स्पर्धा परीक्षेत
यश मिळवण्यासाठी जिद्द,
चिकाटी अथक परिश्रम
आवश्यक असतात,
लक्ष्य अकॅडमीचे डॉ. अजित पडवळ यांनी विद्यार्थ्यांना युपीएससी आणि एमपीएससी परीक्षेच्या तयारीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. आपली ध्येयनिश्चिती ही वास्तववादी असायला हवी. आपल्या सामर्थ्याची आणि मर्यादांची जाणीव असायला हवी. स्पष्टता असेल तर इकडे वळण्यात अर्थ आहे. घर, परिस्थिती, आईवडील, स्वतःचे महाविद्यालयीन शिक्षण या सर्वांचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यायला हवा. स्पर्धा परीक्षा देणे हे करिअर नव्हे. परीक्षा पास झाल्यावर आपल्या करिअरची खरी सुरुवात होत असते. पास झाल्यानंतर पुढे काय आणि नाही झाल्यास पुढे काय या दोन्हींचा विचार करायला हवा. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात करण्यापूर्वी आपण आपली लक्ष्मणरेषा आखायला हवी. म्हणजे मी किती वर्षे हा अभ्यास करणार आहे, हे ठरवायला हवे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आपल्याला आयुष्यात खूप काही देऊन जातो. परीक्षेमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होतात पण एका मर्यादेपेक्षा जास्त काळ आपण इथे राहिलो तर त्याचे नकारात्मक परिणामही होतात. परीक्षेत अपयश आले म्हणून सगळे संपले असे वाटून घेणेही चुकीचे आहे. परीक्षेतील अपयशाचा संबंध आपल्या आयुष्यातील कर्तृत्वाशी जोडता येत नसतो. परीक्षा म्हणजे संपूर्ण आयुष्य नाही. तो आपल्या आयुष्यातील एक टप्पा आहे. परीक्षेत अयशस्वी झालेल्या कितीतरी विद्यार्थ्यांनी इतर क्षेत्रांत नंतर देदिप्यमान यश मिळवले आहे.
बँकिंग
परीक्षा तज्ज्ञ ओंकार तपकीर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, बहुसंख्य
विद्यार्थ्यांना 'आयपीएस' आणि ‘आयएएस’च व्हायचे असते. तेच ध्येय त्यांनी बाळगलेले
असते. त्यामुळे इतर पोस्ट आणि परीक्षांकडे पाहण्यात त्यांना रस नसतो. 'एमपीएससी' देणारे
विद्यार्थीही काही ठराविक पोस्ट लक्ष्य ठेवून परीक्षा देत असतात. असे ध्येय असणे चांगले
असले तरी,परीक्षार्थींनी असे एकाच पदावर किंवा परीक्षेवर अडून राहता कामा नये. स्पर्धा
परीक्षेच्या अंतर्गत येणाऱ्या इतरही परीक्षांचा विचार करायला हवा, जेणेकरून त्यातून
अनेक संधी खुल्या होतील. म्हणूनच स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, त्या अंतर्गत किती परीक्षा
येतात हेही जाणून घेणे गरजेचे आहे.
मंडळाचे माजी सचिव नितीन पवार यांनी प्रास्ताविक करताना मंडळाचे कार्य, शिबीर आयोजनाचा हेतू सांगताना फौजी आंबवडे गावाचे ऐत्याहासिक महत्व आपल्या भाषणात सांगितले. ते आपल्या भाषणात म्हणाले की, मृत्यु समोर आहे हे माहित असुनही सैन्यातील नोकरीत स्वतला झोकून देणारे अनेक जण फौजी आंबवडे गावात दिसतात. फौजी आंबवडे गाव २३ लहान वाड्यांमध्ये वसलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या सैन्यात सुद्धा आमचे पूर्वज होते. पहिल्या महायुद्धात गावातील १११ जवानांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी सहा जवानांना युद्धात वीरगती प्राप्त झाली. याची साक्ष ब्रिटिश सरकारने गावात उभारलेला स्मृतिस्तंभ आजही देत आहे. दुस-या महायुद्धात २५० तरुणांनी भाग घेतला त्यातील ७० जणांना वीरगती प्राप्त झाली. एकाच दिवशी २१ धारातीर्थी पडल्याच्या तारा गावात आल्या होत्या. भारत- पाकिस्तान, बांगलादेश युद्धातही गावातील अनेक सुपुत्रांनी मर्दुमकी गाजवली. आज सैन्यात दोनशे जण सेवेत आहेत प्रत्येक घरातील एक जण सैन्यात आहेच. भारतीय सैन्यात अगदी शिपायापासून ते कॅप्टन पदापर्यंत गावातील अनेक जवानांनी पदे भूषवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. परंतु १९५६ साली स्थापन झालेल्या मंडळाने सरकारी पाठपुरावा करून गावात धरण बांधून घेतले. हायस्कुलसाठी प्रयत्न करून शिक्षणाची सोय केली. सामाजिक सुधारणासह मूलभूत सोयीसुविधांसाठी प्रयत्न केला.
संस्थेचे सचिव जयदीप पवार यांनी आभार प्रदर्शन केले. तर शेकडो विद्यार्थी उपस्थित असलेले हे शिबीर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र ना पवार यांच्या नेतृत्वाखाली महेंद्र पवार, शशिकांत पवार, सुशील पवार, विलास ता.पवार, संतोष जाधव, दाजी कदम, विश्वास पवार जयदीप पवार, प्रमोद पवार, सुरेश शिंदे, आत्माराम गायकवाड आदींनी विशेष प्रयत्न केले.
इतर पोस्ट वाचण्यासाठी समोरची 👉अनुक्रमाणिक clik करा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा