मोडी लिपी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा
मुंबई ( रवींद्र मालुसरे ) : श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने शिवोत्सव - २०२६ निमित्त मोडी लिपी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, निबंध लेखनाचे विषय पुढील प्रमाणे आहेत.
शिवरायांचे दुर्गविज्ञान, आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज, शिवरायांची युद्धनीती,
हिंदूधर्मरक्षक शिवराय,शिवरायांचे बालपण असे आहेत. मोडी लिपीतील निबंधाचे देवनागरीतील
लिप्यंतर देखील ठवावे.https://forms.gle/mCj1XriJ1BsWHScR6 गूगल फॉर्म
मध्ये निबंध उपलोड करणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी पंकज भोसले - 9821009137 किंवा
अमित घाटये - 9833691856 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे प्रमुख हेमंतराजे गायकवाड यांनी केले आहे
शिवबावनी सादरीकरण राज्यस्तरीय स्पर्धा
मुंबई ( रवींद्र मालुसरे ) : शिवबावनी म्हणजे कवी भूषण यांनी रचलेली ५२ छंदांची (ओळींची) कविता, ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि हिंदू धर्माच्या रक्षणाचे तेजस्वी वर्णन आहे; ही कविता ब्रज भाषेत असून ती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि त्यांच्या सैन्याच्या पराक्रमाची कल्पना देते, थोडक्यात, 'शिवबावनी' हे शिवाजी महाराजांच्या गौरवाचे आणि त्यांच्या पराक्रमाचे वर्णन करणारे एक वीर रसपूर्ण काव्य आहे. श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने "शिवबावनी सादरीकरण स्पर्धा- २०२६"आयोजित करण्यात आली असून, ही स्पर्धा ऑनलाइन स्वरुपात घेण्यात येईल.प्रवेशिका व सादरीकरण व्हिडीओ पाठवण्यासाठी https://forms.gle/UvJbCHppaNHtgrRR9 संकेत स्थळावर जावे. विजेत्या स्पर्धकांना एका भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी पंकज भोसले - ९८२१००९१३७ सुलभा कोरडे - ८०९७३२६६९९ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे प्रमुख हेमंतराजे गायकवाड यांनी केले आहे



0 टिप्पण्या