Ticker

6/recent/ticker-posts

जागल्यांचा लोकजागर

'जागल्यांचा लोकजागर' 

वृत्तपत्र लेखकांना आवाहन 

वृत्तपत्र लेखकांची प्रातिनिधिक संस्था असलेली मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ही संस्था २२ ऑगस्ट १९४९ रोजी मुंबईत स्थापन स्थापन झाली आहे. अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करणारी ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रम, उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत आहे. पत्रलेखक आपले निर्भीड मत पत्राद्वारे लिहीत असतो  आणि वर्तमानपत्रातील संपादकीय पानावर ते  छापले जाते. समाजमनाचा आरसा असेच या स्तंभाला म्हटले जाते. २२ ऑगस्ट २०२५ पासून डिजिटल प्लॅटफॉर्मवर हे व्यासपीठ सुरु होत आहे. महाराष्ट्रातील पत्रलेखकांना मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी हे व्यासपीठ २२ ऑगस्ट २०२५ पासून खुले होते आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ करताना "वृत्तपत्रलेखनाची व्यापकता आणि सामाजिक गरज" या विषयावर वृत्तपत्रलेखकांनी २५० शब्दात आपले पत्र पाठवावे.
'जागल्यांचा लोकजागर' साठी पत्र पाठवू इच्छिणाऱ्या वाचकांनी स्वतःचा फोटो आणि मोबाईल नंबरसह आपली पत्रे jagalyanchalokjagar@gmail.com या ई मेलवर युनिकोडमध्ये मराठीत टाईप करून पाठवावीत. तसेच, आपल्या परिचित वृत्तपत्र लेखकांना सांगावे
एक विनंती, दैनिकाकडे पाठवत असलेले पत्र इकडेही पाठवावे, त्याची लिंक आपल्या मोबाईलवर पाठवली जाईल. त्याचप्रमाणे व्हाट्सअँप ग्रुपवर सुद्धा ठेवली जाईल.
फक्त पत्र पाठवावे...लेख पाठवू नये तो प्रसिद्ध केला जाणार नाही.



आपले,
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या