पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चित्रपटांच्या दुनियेतला मराठा योद्धा : सुभेदार तान्हाजीराव मालुसरे

इमेज
  चित्रपटांच्या दुनियेतला  मराठा योद्धा   : सुभेदार तान्हाजीराव मालुसरे शिवरायांचे सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आणि स्वामीनिष्ठा ही कायमच शौर्यकथांचा विषय ठरली. आजवर कित्येक बखरकारांना, इतिहासाच्या अभ्यासकांना, लेखकांना, नाट्य-चित्रपटांंना या कथेनं आकर्षित केलंय. पुन्हापुन्हा सांगूनही ही कथा संपत नाही. नव्या दमाच्या कलाकाराला आपण ही कथा पुन्हा सांगावी अशी वाटते, हीच या कथेची जादू आहे. म्हणूनच आतापर्यंत तानाजींच्या आयुष्यावर पाच सिनेमे आले. सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचा पराक्रम आणि स्वामीनिष्ठा आजवरच्या बखरकारांना, इतिहासाच्या अभ्यासकांना, ललित लेखकांना, चित्रपट व नाट्य निर्माता- दिग्दर्शकांना आणि अभिनय करणाऱ्या कलाकांराना सतत प्रेरणादायी ठरला आहे, देशातील अनेक जण या अद्वितीय पराक्रमी सामर्थ्यवान पुरुषोत्तमाचे चरित्र अभ्यासून भारावले गेले आहेत, आणि ह्या वीरपुरुषाचे वेगवेगळे पैलू लोकांसमोर मांडले आहेत, यापुढेही ते मांडत राहाणार आहेत, कारण शिवचरित्र अखंड 'प्रेरणादायी' तर शिवरायांना जिवाभावाची साथ देणारे प्रसंगी बलिदान देणारे त्यांचे मावळे म्हणजे जगाच्या इतिहासात प...

डॉ गजानन शेपाळ यांच्या 'रंगासभा' ग्रंथाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

इमेज
* डॉ गजानन शेपाळ यांच्या ' रंगसभा ' ग्रंथाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन * * ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात सुरु करण्यासाठी केंद्र व राज्याकडे पाठपुरावा करण्याचे राज्यपालांचे आश्वासन * * सर्जनशील आणि सांस्कृतिक उद्योगातील संधींचा कलाकारांनी लाभ घ्यावा : राज्यपाल रमेश बैस *   मुंबई : ( रवींद्र मालुसरे ) -   नवी दिल्ली येथील ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी आपण व्यक्तिशः लक्ष घालू तसेच केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करु , असे आश्वासन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे दिले .   सर ज . जी . उपयोजित कला महाविद्यालय येथील प्राध्यापक डॉ . गजानन शेपाळ यांच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या दृश्यकला विषयक लेखांचे संकलन असलेल्या ' रंगसभा ' या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल बैस यांच्या हस्ते शनिवारी ( दि . १९ ) महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडले , त्यावेळी ते बोलत होते .  यावेळी प्रकाशन सोहळ्याला ललित कला अकाद...