पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मुंबईतील आषाढी एकादशी परंपरा

इमेज
  ' मुंबईतील आषाढी एकादशी परंपरा ' रवींद्र मालुसरे   महाराष्ट्र राज्य संतांची भुमी म्हणुन ओळखली जाते ,  तर मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून पंढपूरच्या पांडुरंगाचा सोहळा म्हणजेच आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या आषाढी एकादशी वारीची फार मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. पंढपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशतके  सुरु आहे. देशासह जगभरातील लाखो भाविक पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी येत असतात. टाळ-मृदुंगाच्या  ठेक्यावर ,  ग्यानबा-तुकारामांच् या जयघोषात ‘विठुरायाचे’ नामस्मरण करीत वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात लीन होतात. मुंबईत विशेषतः मध्य मुंबईच्या गिरणगावात  विठ्ठल मंदिरासह काही ठिकाणी गेली अनेक वर्षे आषाढी एकादशी जल्लोषात साजरी केली जाते. बदलत्या काळासोबत मुंबई बेटावरच्या रूढी व परंपरा अस्तंगत होत आहेत. वाड्यावस्त्यांची मुंबई गगनभेदी होत आकाशाला भिडत चालली आहे. मुंबईची जीवनशैली बदलली तरी काही महाराष्ट्रीयन परंपरा अजूनही टिकून आहेत. त्यातील एक म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेली श्री विठ्ठलाची मंदिरे आणि ...

|| नारायण नामे होऊ जीवन्मुक्त ||

इमेज
 || नारायण नामे होऊ जीवन्मुक्त || वै. श्री सदगुरु रामकृष्ण भावे महाराज वै. श्री सदगुरु अर्जुनमामा साळुंखे महाराज वै. श्री सदगुरु नारायणदादा घाडगे महाराज महाराष्ट्रातील खेड्या-पाड्यासह श्रीक्षेत्र पंढरपूर व आळंदी येथे भागवत धर्माची पताका उंचावून हरिनामाचा गजर करणाऱ्या, गेल्या शतकातील या महान सत्पुरुष त्रयींच्या पारमार्थिक कार्याची संपूर्ण महती सांगणारा 'नारायण नामे होऊ जीवन्मुक्त' हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला आहे.  श्री क्षेत्र पंढरपूर येथे कार्तिक वारी ला तो आपल्यापर्यंत पोहोचेल ...रामकृष्णहरी.... स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा   | मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा || नारायण नामे होऊ जीवन मुक्त   | कीर्तनी अनंत गाऊ गीती || वैकुंठीचे जण सदा इच्छिताती | कइ येथे येती हरिचे दास || यम धर्म वाट पाहे निरंतर | जोडोनिया कर तिष्ठतसे || तुका म्हणे पावावया पैलपार | नाममंञ सार भाविकांशी || जगद्गुरू संत तुकोबाराय यांचा पाच चरणाचा नामाचा आणि मृत्युलोकाचा महिमा सांगणारा उत्कृष्ट असा हा अभंग आहे, या अभंगात  तुकोबाराय म्हणतात, स्वर्गातील अमरत्व प्राप्त असलेले  देव म्हणतात की, हे भगवं...