' ताठ कणा ' मूलमंत्र देणारा देवदूत म्हणजे डॉ. पी एस रामाणी - प्रमोद शिंदे मुंबई (रवींद्र मालुसरे) : जगभरातली आई आपल्या प्रत्येक मुलाला लहानपणी हेच शिकवते की , आयुष्यभर ताठ कण्याने जगत रहा. डॉ. प्रेमानंद म्हणजे पी एस रामाणी यांच्या आईने सुद्धा त्यांच्यावर तसेच संस्कार केले. त्यामुळे कुणासमोरही वाकायचं , झुकयाचं किंवा माघारही घ्यायची नाही हे अंगीकारल्याने जीवनातील प्रतिकूल परिस्थितीतही ते आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यूरो स्पायनल फ्लिप सर्जन म्हणून प्रसिद्ध होऊ शकले असे गौरवपूर्ण उदगार मन:शक्ती केंद्र लोणावळाचे प्रमुख विश्वस्त प्रमोद शिंदे यांनी दादर येथे काढले. डॉ रामाणींच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व शिष्यांच्या वतीने त्यांना नुकताच 'गुरु द्रोणाचार्य पुरस्कार' प्रदान करून गौरविले होते. याचे औचित्य साधून शांता सिद्धि चॅरिटेबल ट्रस्टच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांचा व प्रतिमा रामाणी यांचा विशेष सत्कार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमोद शिंदे पुढे असेही म्हणाले की , मनशक्ती केंद्रात लहान मुलांना शिकवताना आम्ही विद्यार्थ्याची सर्वांगीण प्रगती ...