भगवद्गगीता मोक्षाचा राजमार्ग : अंतराम्यांतील परमेश्वराची ओळख करून देते
भगवद्गगीता मोक्षाचा राजमार्ग : अंतराम्यांतील परमेश्वराची ओळख करून देते
- डॉ पी एस रामाणीमुंबई : मनुष्याचे जीवन सुखदुःखानी भरलेले आहे. यातून कोणीही सुटू शकत नाही. सुख तर प्रत्येकाला प्रिय असते. परंतु दुःखाचे चटके मात्र कोणालाच नको असतात. अशावेळी सर्वसामान्य माणूस दुःखाने निराश होतो. जगाशी भांडणे उकरून काढतो. ईश्वराला दोष देतो. येथेच गीतेची शिकवण उपयोगात येते. जीवनात येणाऱ्या कोणत्याही दुःखाचा स्वीकार करण्यास गीता सांगते आणि ते दुःख समर्थपणे पचविण्याचा उपायही शिकवते. श्रीमद भगवद्गगीता जितकी वाचावी तितकी ती वेगवेगळ्या पद्धतीने समजून येत राहते. त्याचप्रमाणे या शब्दाचा अर्थही विविध प्रकारे जाणून घेता येतो. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर शस्त्रसज्ज झालेला अर्जुन आपल्याच आप्तेष्टांना समोर पाहून हातपाय गाळतो आणि स्वजनांशी लढण्यापेक्षा संन्यास वा मरण पत्करलेले बरे अशी त्याची धारणा झाली. हे युद्धच करायचे नाही असा निश्चय करून हातातील शस्त्रे टाकून देतो. अशावेळी आपल्या नियत कर्मापासून दूर चाललेल्या अर्जुनाला त्याचा सारथी बनलेल्या भगवान श्रीकृष्णाने दिलेला उपदेश म्हणजे श्रीमद भगवदगीता. या गीतेच्या स्वरूपात तत्वज्ञानाच्या आधारे स्वधर्म व कर्तव्यपालनाचा उपदेश देऊन अर्जुनाच्या मनातील सर्व शंकांचे निरसन केले व त्याला युद्धाला प्रवृत्त केले. असे प्रतिपादन वरिष्ठ न्यूरो आणि स्पायनल सर्जन डॉ पी एस रामाणी यांनी केले. त्यांनी लिहिलेल्या 'श्रीमद भगवदगीता : जनसमान्यांसाठी ... जवळ असूनही दुर्बोध' या पुस्तकाच्या मराठी व इंग्रजी आवृतींचा प्रकाशन समारंभ आषाढी एकादशीच्या निमित्ताने रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित केला होता. पुस्तकाचे प्रकाशन कैवल्यधाम मुंबईचे योगगुरू रवी दीक्षित, बँकर आणि कंपनी डायरेक्टर श्रीमती अनुराधा ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. श्री विनायक प्रभू, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, उद्योजक आनंद लिमये हे प्रमुख पाहुणे व्यासपीठावर होते.
ते पुढे असेही म्हणाले की, वास्तविक गीता हा केवळ श्रीकृष्णार्जुनाचा संवाद नसून हा आपल्या सर्वांचा प्रतिनिधी आहे आणि गीतेचे ज्ञान हे केवळ अर्जुनापूरते मर्यादित नाही; तर ते कालातीत आहे, म्हणजे कुठल्याही युगात त्याचे महत्व नाकारले जाऊ शकत नाही. गीतेचे ज्ञान आसक्ती आणि अज्ञानामुळे ग्रस्त असलेल्या मनुष्याच्या जीवनात कर्तव्याचे वर्चस्व दर्शवते आणि भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असल्याचे वारंवार सांगते.
श्रीमती अनुराधा ठाकूर आपल्या भाषणात म्हणाल्या की, गीता हा असा ग्रंथ आहे की, तो आपल्याला प्रत्येकाच्या कुवतीनुसार समजतो. आयुष्य कशाप्रकारे जगायचे हे गीता आपल्याला सांगत असते. आपण वयाने जसजसे मोठे होत जातो तसतसा त्याचा वेगवेगळा अर्थ समजत जातो. म्हणून गीता ही तरुणपणातच वाचायला पाहिजे. आपला फक्त कर्मावर अधिकार आहे फळावर नाही. आजचा तरुण जबरदस्त स्पर्धेच्या वातावरणात काम करतो आहे.
श्रीमती अनुराधा ठाकूर आपल्या भाषणात म्हणाल्या की, गीता हा असा ग्रंथ आहे की, तो आपल्याला प्रत्येकाच्या कुवतीनुसार समजतो. आयुष्य कशाप्रकारे जगायचे हे गीता आपल्याला सांगत असते. आपण वयाने जसजसे मोठे होत जातो तसतसा त्याचा वेगवेगळा अर्थ समजत जातो. म्हणून गीता ही तरुणपणातच वाचायला पाहिजे. आपला फक्त कर्मावर अधिकार आहे फळावर नाही. आजचा तरुण जबरदस्त स्पर्धेच्या वातावरणात काम करतो आहे.
बेकारी वाढते आहे, त्याच्या कामात अनिश्चितता आहे स्पर्धेत मागे पडले याची मनात भीती असते तेव्हा या पिढीची ही गंभीर मानसिकता मला हतबल करते. त्यांचं जगणं हरवलेली ही स्पर्धा मला कोरडी वाटते. हे पुस्तक तरुण पिढीने वाचले तर डॉ रामाणि यांनी दोन लाख शस्त्रक्रिया करून माणसांचा कणा जसा ताठ केला तसा तरुणांचा अध्यात्मिक मनाचा कणा मजबूत होईल. ८४ वर्ष वय असलेल्या डॉक्टरांचे हे ७५ वे पुस्तकाबद्दल सर्व वक्त्यांनी त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शांता दुर्गा चॅरिटेबल ट्रस्टचे सेक्रेटरी भूषण जॅक यांनी केले, सूत्रसंचालन वृत्त निवेदिका स्मिता गवाणकर आणि घनश्याम दीक्षित यांनी तर आभार प्रदर्शन संजय दिवाडकर यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा