चित्रपट अभिनेत्रीची दुनिया
अभिनेत्री सीमा
देव चा इंग्रजीचा क्लास
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव गिरगावहून माहीमला राहायला आल्या होत्या तेव्हाची गोष्ट. चित्रपटात आहोत म्हणजे आपल्याला इंग्रजी बोलायला यायलाच पाहिजे या हेतूने त्यांनी शिकवणी लावायची ठरवली. एक ख्रिश्चन मुलगी त्यांना शिकवण्यासाठी आणि संभाषण करण्यासाठीचा सराव करून देण्यासाठी त्यांच्या घरी येऊ लागली. परंतु शूटिंगच्या व्यापामुळे त्यांना वेळ देता येत नसे. ती मुलगी दररोज येऊन जात असे . परंतु झाले मात्र असे सीमा देव याना इंग्रजीचा सराव देणे राहिले बाजूला ती मुलगीच छानपैकी मराठीचा सराव करून गेली.
झीनत अमानची 'मोलकरीण'
झीनत अमानला एकदा तिच्या घरी कपडे धुण्यासाठी एका मोलकरीणीची गरज होती. ही बातमी ऐकून एक जण तिच्याकडे आली. झीनतने तिची इंटरव्हियू घ्यायला सुरुवात केली. तिला प्रश्न विचारला, यापूर्वी तू कोठे नोकरी करत होतीस ?
ती म्हणाली ...राखी गुलजार कडे
झीनत म्हणाली,'मग ती नोकरी
सोडून माझ्याकडे नोकरी का करावीशी वाटतेय तुला ? राखीपेक्षा मी अधिक लोकप्रिय आहे म्हणून का ?
नाही मॅडम,
मग माझ्याकडे
नोकरी का मागायला आली आहेस
मला जेथे कामाचा
ताण कमी पडेल अशा नोकरीची गरज हवी आहे म्हणून. राखीबाईंच्या प्रमाणे तुम्ही अंगभर
कपडे काही घालत नाहीत. आणि राखीबाई अंगभर कपडे घालतात आणि बाहेर जाताना दिवसातून
तीन-चारदा सतत कपडे बदलतात. त्यामुळे त्यांच्याकडे धुण्याच्या कपड्यांचा ढीग पडतो.
तुम्ही तर पाच-सहा वेळा जरी कपडे बदललेत तरी तुमच्या तोकड्या कपड्यामुळे मोठा ढीग
पडणार नाही.
….हे ऐकून झीनतची काय अवस्था झाली असेल बरे.
नर्गिसजींचा 'स्विमिंग सूट'
नर्गिस यांच्यावर राज कपूर यांच्या 'आवरा' चित्रपटात स्विमिन्ग सूट घालून एक दृश्य द्यायचे होते. तेव्हा आता बंद करण्यात आलेला आर के स्टुडिओ तेव्हा उभा राहिलेला नव्हता. नर्गिसजींना चार भिंतीची मर्यादा सांभाळून हा सिन द्यायचा होता. यामुळे मास्तर भगवान दादांच्या ''आशा स्टुडिओत'' एक सेट लावून त्या सेटवर नर्गिसचे आवारातील तो स्विमिंगचा सीन चित्रित करायचे ठरले. त्यासाठी त्या सूटमधील तिचे दर्शन एकदम खुलेआम होणार नाही याची काळजी घेत राज कपूरने सर्व काळजी घेतली. त्यासाठी भगवानदादांचा स्टुडिओ त्यांनी खोदून खोदून स्टुडिओतच तलाव केला. आणि नर्गिस पडदानशिन अवस्थेतुनच डायरेक्ट त्या सूटमध्ये पडद्यावर आली.
मनोरुग्ण
परवीनच्या जीवनातील 'अर्थ'
काही चित्रपटात प्रेक्षक सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात. कागज के फुल या चित्रपटात गुरुदत्त-वहिदा-गीता दत्त यांच्यामधल्या नात्यांचा शोध घेतला, तसा ''अर्थ'' या महेश भट्ट यांच्या चित्रपटाबाबत घडले. या चित्रपटाची कथा महेश भट्ट यांच्याच जीवनातली. त्यांची पत्नी किरण आणि अभिनेत्री परवीन बाबी यांची. परंतु चित्रपटात महेशजींची भूमिका कुलभूषण खरवंदा यांनी त्यांच्या पत्नीची भूमिका शबाना आझमीने तर एक मनोरुग्ण नायिका स्मिता पाटीलने केली होती, अर्थ पडद्यावर आल्यानंतर स्मिताची व्यक्तिरेखा पाहून परवींन बाबीचा तोल ढळू लागला. त्यापूर्वीच तीच्याकडून काम करून घेणे अनेक निर्मात्यांना-दिग्दर्शकाना तिचा त्रास होऊ लागला होता. मात्र अर्थ प्रदर्शित झाल्यानंतर परिस्थिती अधिक बिघडली. यामुळे अनेकांनी तिच्याकडे पाठ फिरवली.चित्रपटाच्या दुनियेतून ती एकदम आउट झाली. आणि पुढे तर मनोरुग्ण होत या जगातून सुद्धा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा