पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पोलादपूरकरांनी वारकरी संचित जोपासले - प्रविण दरेकर

इमेज
 पोलादपूरकरांनी वारकरी संचित जोपासले - प्रविण दरेकर मुंबई : (रवींद्र मालुसरे) महाराष्ट्राच्या वैभवशाली संत परंपरेचा मोलाचा वारसा या भूमीत जन्मलेल्या शेकडो संतांनी जोपासला. ज्ञानेश्वर ते तुकाराम या वारकरी संप्रदायातला महत्वाचा टप्पा. आणि हेच मराठी माणसाचे संचित आहे , त्याचबरोबर पोलादपूर तालुक्यात दुर्गम खेडोपाडी जन्मलेल्या वारकरी सांप्रदायातील धुरीणांनी गेल्या शंभर वर्षात आपल्या सुगंधित कार्याने तालुक्याला वारकऱ्यांचा तालुका ही ओळख संपूर्ण महाराष्ट्रात करून दिली आहे. त्यांचे ऋण पुण्यात राहणाऱ्या तुम्हा तालुकावसीयांच्या मनात असल्यानेच त्यांना अर्पण करणारी दिनदर्शिका तुम्ही प्रकाशित करीत आहात हा विचार मला मोलाचा वाटतो. असे उदगार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि पोलादपूरचे सुपुत्र प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले. पोलादपूर तालुका रहिवासी संघ पुणे या संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या धार्मिक दिनदर्शिकेचे प्रकाशन दरेकर यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. यावेळी पुण्यात बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित भवनासाठी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत तात्काळ जाहीर केली. यावेळी संघाचे अध्यक्ष किसनराव भोस...