पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सार्वजनिक गणेशोत्सव

इमेज
सार्वजनिक गणेशोत्सव आनंदाची पर्वणी अन् जल्लोषाचा साज . उत्सवप्रियता हा मानवी जीवनाचा एक विशेष भाग आहे , भारतीय परंपरेतील एक धारा असलेली मराठी संस्कृती तर उत्सवप्रधान आणि उत्साहवर्धक आहे . श्रावण - भाद्रपद - अश्विन - कार्तिक या चातुर्मासात तर अनेक उत्सवांची रेलचेल असते . गणपती हे प्राचीन काळापासून मराठी माणसांचे लोकप्रिय दैवत आहे . मूलतः हि आर्येतर देवता . वैदिक मंत्र्यांच्या घोषात वैदिकांनीही ती स्वीकारली . आणि पाहता पाहता सर्व स्तरात ती विकास पावत गेली . ज्ञानाच्या क्षेत्रात तो बुद्धिदाता तर सकाम साधना करताना तो विघ्नहर्ता म्हणून ठरला . त्याची मनापासून भक्ती केली तर तो साधकाच्या मार्गातील सर्व विघ्ने दूर करतो आणि सर्व प्रकारची मनोवांछित सुखे प्रदान करतो अशीही श्रद्धा ह्या दैवताविषयी जनसामान्यात मनात दृढमूल झाली आहे . प्रत्येक मंगल कार्याच्या शुभ प्रसंगी त्याचे आवाहन करण्याची तसेच त्याचे प्रथम पूजन केले जाते . श्रीगणेशाची व्यक्तिगत पातळीवर किंवा कौटुंबिक पातळीवरील...