पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठी भाषा चला ज्ञानभाषा करूया

इमेज
दादर धुरु हॉलमध्ये मराठी भाषा दिवस कार्यक्रम  काशिनाथ धुरु हॉल ट्रस्ट आणि दादर सार्वजनिक वाचनालय,  मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई  व मराठी विचारधारा प्रतिष्ठान गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ रोजी सायंकाळी ५. ३० वाजता छबीलदास रोड, धुरु हॉल येथे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन मराठी भाषा गौरवदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार सचिन परब, आमदार आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, कामगार नेते दिवाकर दळवी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. 'कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय ) तंत्रज्ञान मराठी भाषेसाठी किती उपयुक्त' या विषयावर ३० वर्षे संगणक क्षेत्रात अध्यापन करणारे सुप्रसिद्ध भानुदास साटम यांचे व्याख्यान होत आहे. त्याचप्रमाणे संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या आणि महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून व अमेरिका, शिकागो, सिंगापूर येथून आलेल्या ४९ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा तसेच "अभिजात मराठी भाषा चला ज्ञानभाषा करूया" या लेखस्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चितळे बंधू उद्योगाचे सहकार्य लाभले आहे. श्रीमती शु...

पराक्रमाची विजयगाथा

इमेज
पराक्रमाची विजयगाथा  नरव्याघ्र नरवीर सुभेदार तानाजी - सूर्याजी मालुसरे यांच्या शौर्यावर, स्वराज्य बांधणीसाठी केलेल्या योगदानावर आणि बलिदानावर समग्र माहिती देणारा मराठीतील पहिला आणि एकमेव ग्रंथ || सुभेदार नरवीर तान्हाजी-सूर्याजी मालुसरे             पराक्रमाची विजयगाथा || या नावाचा ग्रंथ मी प्रकाशित करीत आहे. मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील सर्वोच्च घटना म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. इतिहासाच्या प्रवाहाला नवे वळण देणारी घटना. यापूर्वी हिंदवी स्वराज्य निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक मावळ्यांनी रणागंणात समशेर पेलत साथ दिली. प्रसंगी रक्ताचा सडा शिंपत बलिदान दिले. नरव्याघ्र नरवीर सुभेदार तानाजी - सूर्याजी मालुसरे यांनी लढलेली आणि शर्थ करीत जिंकलेली कोंढाण्याची लढाई हा स्वराज्य स्थापनेच्या इतिहासातील सुवर्णक्षण ! या घटनेनेसुद्धा शिवकार्याच्या इतिहासाला वेगळे वळण दिले. १९-२० व्या शतकातील बखरकारांनी, इतिहासकारांनी, पोवाडे रचणाऱ्यांनी आजवर विविध अंगी लेखन केले आहे; पण इतक्या महत्त्वाच्या विषयावर समग्र असा ग्रंथ आता उपलब्ध झाला नाही. तो ...

सुभेदार तान्हाजी मालुसरेंच्या मुलुखातील इतिहासाच्या पाऊलखुणा

इमेज
  सुभेदार तान्हाजी मालुसरेंच्या मुलुखातील  इतिहासाच्या पाऊलखुणा  आज माघ वद्य नवमी.  नरवीर तान्हाजी मालुसरे यांची तिथीप्रमाणे पुण्यतिथी. तान्हाजीरावांची समाधी आणि भव्य पुतळा उमरठ येथे आहे. त्याठिकाणी नरवीर तान्हाजी-सूर्याजी मालुसरे यांचे वंशज आणि उमरठ येथील कळंबे परिवारासह पोलादपूर तालुक्यातील नागरिक-शिवप्रेमी १९३० पासून आजपर्यंत त्यांची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने साजरी करीत आले आहेत. पुरंदरच्या तहान्वये महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यापैकी २३ किल्ले मोगलांच्या ताब्यात गेले होते. शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील रयतेचे स्वराज्यावर काळे ढग दाटले होते. पुढे काय होणार असा प्रश्न सर्वांच्या मनात सलत होता. नजरेच्या टप्प्यात दिसणाऱ्या कोंढाणा किल्ल्यावर फडकणारा हिरवा ध्वज पाहून आई जिजाऊ अस्वस्थ होत होत्या, शिवाजी महाराजांना त्यांनी ही खंत बोलून दाखवली. आणि कोंढाण्याची मोहीम आखली गेली. सुभेदार नरवीर तान्हाजी-सूर्याजी मालुसरे यांनी महाराजांकडून ही मोहीम  आपल्या लेकाचे रायबाचे लग्न बाजूला ठेऊन हट्टाने मागून घेतली आणि घनघोर युद्ध करीत प्रसंगी रक्ताचा सडा शिंपत, स्वतःचे ...