उतेकर कुळाचा इतिहास आणि भाऊ -बहिणींना आवाहन

श्री राजा शाहू चरणी तत्पर कृष्णाजी सुत आनाजी उतेकर किल्ले प्रतागडावरील भवानी आईच्या पूजेचा मान छत्रपती शिवाजी महाराज यांनी उतेकर घराण्याला दिला होता तेव्हा हा शिक्का शाहू महाराज यांनी उतेकर घराण्याला सरंजाम दिला तेव्हा हा शिक्का मोर्तब दिला होता. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेत आणि मराठ्यांच्या इतिहासात "उतेकर" या आडनावाचा अर्थ म्हणजे निष्ठा आणि पराक्रम! मध्ययुगीन आणि शिवकालीन इतिहासाचा अभ्यास करताना याचे अनेक दाखले सापडतात. शिवचरित्र साहित्य खंड १० कोकणच्या इतिहासाची साधने मध्ये पान नं २१ वर याचा स्पष्टपणे उल्लेख सापडतो. उतेकर कुळ हे शिवरायांच्या स्वराज्यात गावाची पाटीलकी सांभाळत असत. शिवरायांशी प्रत्यक्ष संपर्कात असलेले महाड मधील वाळणच्या पाटलांचा उल्लेख इतिहासात अढळतो. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या परिसरात शिवरायांनी आपल्या विश्वासू मावळ्यांना वसवले होते. त्यात अनेक गावे उतेकरांची आहेत. उतेकर कुळीचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात आढळतो. साताऱ्यातील जावळीच्या खोऱ्यातून सुरु झालेला प्रवास आज रत्नागिरी, रायगड तसेच नाशिक, सांगली, ठ...