लक्ष्मण उतेकरांचा छावा इतिहास घडवणार

लक्ष्मण उतेकरांचा छावा इतिहास घडवणार अचाट धैर्य,अजोड पराक्रम,असामान्य शौर्य गाजवणारे रणधुरंदर,धर्मवीर छत्रपती संभाजी राजांना मानाचा त्रिवार मुजरा ! फाड देंगे मुघल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरुरत की… हम शोर नही करते, सिधा शिकार करते है..! अग्नि भी वो, पाणी भी वो, तुफान भी वो, शेर शिवरायांचा छावा है वो ! राजे छत्रपती शिवरायांचे रयतेचे हिंदवी स्वराज्यआणि राजाभिषेक ज्या भूमीत स्थापन झाले आणि नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या कर्तृत्ववाने रक्ताने लाल झालेल्या महाड - पोलादपूरच्या भूमीत जन्म झालेल्या लक्ष्मण उतेकर यांचा स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी राजे यांच्या महापराक्रमाचा वेध घेणारा छावा हा चित्रपट येत आहे. ज्या खोऱ्यातील मावळ्यांनी शिवरायांना प्रसंगी जीवाचे बलिदान देत साथ दिली त्या मावळ्यांचा वारसा लक्ष्मण उतेकर यांना लाभला आहे. उतेकरांच्या रक्तात 'शौर्य आणि निष्ठा' हा रक्तगट असल्यामुळे आणि इतिहासावर असलेल्या वेडापायी एव्हढे मोठे धाडस त्यांनी केले आहे. कॅमेरा अटेंडंट ते सुपरस्टार सिनेम...