पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कर्तबगार माणिकराव जगतापांची लेक स्नेहलदीदी

इमेज
  कर्तबगार माणिकराव जगतापांची लेक स्नेहलदीदी कोकणातील महाडचे राष्ट्रवादीचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे झालेले अकाली निधन त्यावेळी महाड - पोलादपूरकरांच्या मनाला चटका लावणारे होते.  बातमी घेऊन येणारी  त्या दिवसाची  स काळ अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक दुःख देणारी होती. माणिकराव यांच्यावर मुंबईत कोरोना आजारात रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. दुर्दैवाने आपल्यातला काळाने एक मोठी क्षमता असलेले नेता आपल्यातून हिरावून नेला होता.   माणिकराव जगताप यांच्या निधनाने एक स्वयंभू नेता काळाच्या पडद्याआड गेला होता. सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला, मतदारसंघाच्या विकासासाठी अभ्यासू वृत्तीने तळमळीने झटणारा लोकनेता होता तो. माणिकरावांचे आणि माझे व्यक्तिगत पातळीवर   संबंध अतिशय जवळचे मित्रत्वाचे होते. माणिकरावांची आणि माझी सामाजिक-ऐत्याहासिक प्रश्नावर अधूनमधून अनेकवेळा चर्चा व्हायची, एकमेकांची फोनाफोनी असायचीच. माझी आणि त्यांची पहिली भेट १९८८ मध्ये मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये झाली. आमच्या खडकवाडी गावच्या 'मालुसरे बंधू ऐक्यवर्धक मंडळाने' वर्धापन दिन...

शाहीर आत्माराम पाटील

इमेज
शाहीर आत्माराम पाटील आज शाहीर आत्माराम पाटील यांचे जन्मशताब्दी वर्षाचा समारोप. (९ नोव्हेंबर १९२४ ते १० नोव्हेंबर २०१०) काल त्यांच्या जन्मगावी एका कार्यक्रमात आत्मारायण या ग्रंथाचे प्रकाशन केले, त्या ग्रंथातील हा लेख.  शाहीर चंदू भरडकर आज हयात नाहीत, परंतु ३० वर्षांपूर्वी ते मला लोअर परेल रेल्वे वर्कशॉपच्या समोरील येथे एका चाळीत घेऊन गेले होते. शाहीर आत्माराम पाटील यांच्याशी माझी ती पहिली ओळख. सनमिल कंपाऊंडमध्ये मी नोकरीला असल्याने घरी येताना अनेकवेळा शाहिरांची भेट व्हायची आणि गप्पा होत असत. ते ज्या ठिकाणी राहत होते त्याठिकाणी म्युझिक रेकॉर्डिंगचे काम व अलीकडे टोलेजंग इमारत उभी राहते आहे, मी २ वर्षांपूर्वी या ठिकाणी गेलो होतो तेव्हा शाहिरांची प्रकर्षाने आठवण झाली होती. आज राष्ट्रकूटचे कार्यकारी संपादक राजन देसाई यांनी शाहिरांच्या जन्मशताब्दी निमित्ताने यासंबंधाने लिहावे असा आग्रह केला.  १८९० ते १९२० हा तमाशा कलेचा अत्यंत भरभराटीचा आणि उत्कर्षाचा कालखंड होय. याच काळात अनेक दिग्गज शाहीर उदयाला आले. शाहीर पट्ठे बापूराव, शाहीर अर्जुना वाघोलीकर, शाहीर दगडू साळी तांबे शिरोलीकर, हरिभा...