पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठी भाषेची चिंता व्यक्त करण्याची वेळ आली आहे - पोलीस उपायुक्त संदीप भागडीकर

इमेज
मराठी भाषेची चिंता व्यक्त करण्याची वेळ आली आहे - पोलीस उपायुक्त संदीप भागडीकर  इंग्रजी भाषा ही खरं तर जगाच्या व्यवहाराची भाषा आणि जीवनात स्थैर्य येण्यासाठी ती उत्तमपणे सर्वाना यायला हवी. मात्र आपण मराठी माणसांनी गेल्या काही दशकात याचा गैर अर्थ काढला आणि आपल्या दोन पिढ्या कॉन्व्हेंटमध्ये शिक्षणासाठी घातल्या त्यामुळे त्यांची मराठी भाषेची तोंडओळखसुद्धा पुसली गेली आहे. यासाठी मराठी पालकांनी आपल्या पाल्याचे घरीच शिक्षक होऊन त्यांना मराठीचे धडे द्यायला हवेत. मराठी भाषेला भवितव्य नाही अशी ओरड सर्व व्यासपीठावरून अलीकडे होत असते मात्र संत ज्ञानोबा-तुकोबांपासून सर्व साधुसंत, समाजसुधारक, विचारवंत, साहित्यिकांनी समृद्ध केलेल्या शेकडो वर्षाच्या मराठी भाषेची गळचेपी होणार नाही, ती मरणारही नाही मात्र दिवसेंदिवस खंगत जाईल. मराठी भाषेच्या भविष्याचा असा चिंता व्यक्त करणारा विचार सहायक पोलीस आयुक्त संदीप भागडीकर यांनी व्यक्त केला.  प्रभादेवी येथील आगरी समाज सेवा संघाच्या हॉलमध्ये मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने आयोजित केलेल्या ४८ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक प्रदर्शनाचे उदघाटन त्यांच्या ह...

बैल दिवाळी इतिहास, संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण

इमेज
बैल दिवाळी इतिहास , संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण कोकणातला बैलपोळा म्हणजे देव दिवाळी म्हणजे थोरली दिवाळी. आपल्या कृषिप्रधान संस्कृती मधील महत्वाचा मोठे अप्रूप असलेला हा सण. ‘मार्गशीर्ष प्रतिपदा’ या दिवसाला कोकणात आगळेच महत्त्व आहे. कोणत्याही संस्कृती कोशात व धार्मिक व्रतवैकल्यांच्या ग्रंथात माहिती नसलेला सण म्हणजे देवदीपावली(बैलदिवाळी ). शेतक-यांची ही दिवाळी म्हणजे एक आनंदाचा, उत्सवांचा जल्लोष असतो. पोलादपूर तालुक्यात या बैल दिवाळी ला मोठी दिवाळी म्हणून संबोधले जाते.  सर्जा-राजा वा ढवळ्या-पवळ्या या बैलजोडीच्या शिंगांना रंग फासण्याचा त्यांना गोंडे बांधण्याचा हा दिवस. गाई, बैल, वासरे, म्हशी, रेडे यांच्या शिंगांना रंग लावून, त्यांना गोडधोड खायला घालून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. या देवदीपावलीचा  उत्साह आबालवृद्धांच्या अंगी संचारलेला असतो. दिवाळी या नावातच उत्साह आहे, आनंद आहे. दिवाळीच्या सणामागील आशय मात्र आपल्याला फार थोडा माहिती असतो. जरा विस्ताराने जाणून घेऊया दिवाळी सणाची माहिती -  कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही. हजारो वर्षांपासून मानवा...